मुख्य सामग्रीवर वगळा

ऐतिहासिक! स्वातंत्र्याच्या दिशेने एक पाऊल

सर्वोच्च न्यायालयाने अगोदर स्त्रीला वारसा हक्क देवून तिला लैंगिक बरोबरीचा अधिकार प्राप्त करून दिला होता.आता नुकतेच सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यांच्या खंडपीठाने घटनेचे १५८ वर्ष जूने ४९७ कलम रद्द करून तिला लैंगिक स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे.सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिल्यानंतर समाज माध्यमातून या बाबतीत उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या.अगोदरच स्त्रीच्या बाबतीत संकुचीत भावना असणा-या समाजाने स्त्री आणि पुरुष यांचे विवाहबाहय संबंध हा आता गुन्हा ठरणार नाही म्हणून अनैतीक संबंधाला खुली परवानगी एवढाच घेतला आहे मात्र न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे स्त्री स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेले आणखीन एक पाऊल आहे.निश्चितच हा ऐतिहासिक निर्णय आहे.
न्यायालयाच्या हा निर्णय देताना स्पष्ट केले आहे की,देह ही स्त्रीची संपत्ती आहे आणि त्याबद्द्ल निर्णय घेण्याचा अधिकार तिला आहे.भारतीय दंड संहितेचे कलम ४९७ महिलेच्या सन्मानाच्या विरोधात आहे.महिलांचा नेहमीच सन्मान करायला हवा.महिलांना समाजाच्या इच्छेनूसार विचार करण्यास सांगता येवू शकत नाही.संसदेनेही महिलांवरिल अत्याचार रोखण्यासाठी कौटुंबीक हिंसाचार विरोधी कायदा मंजूर केला आहे त्यामुळे पती कधीही पत्नीचा मालक होवू शकत नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले.खरंतर स्त्रीच्या लैंगिक स्वातंत्र्याचा विषय छेडताच अनेक जण असे बघतात जणू स्त्रीसाठी लैंगिक स्वातंत्र्याची मागणी करणारे लोक विवाहबाहय संबंधाचा खुला परवाना मागत आहेत वा व्यभिचाराची वकिली करत आहेत.
आपण हे लक्षात घेतल पाहिजे की,पुरूषासारखी स्त्री सुद्धा स्वतंत्र आहे.लग्न व्यवस्था तिला नैतीक आणि सामाजिक बंधनात बांधते जरूर मात्र दोघांचे एक स्वतंत्र व्यक्तीमत्व सुद्धा आहे.आपल्या सामाजिक परंपरेचा विचार केला तर लैंगिक स्वातंत्र्य अलिखीत स्वरूपात समजाने अगोदरच पुरूषाला बहाल केलेले आहे.पूर्वी विवाहित पुरूषांचे वेश्यागमन सूद्धा सामाजिक स्तरावर स्विकार्यह होते.ज्या जमिनदार कुटुंबातील लोक या पासून स्वत:चा बचाव करित त्यांच्या पुरूषत्वावर प्रश्नचिन्ह उमटत असत.सर्वोच्च न्यायालयाने या धारणेला सुद्धा झटका दिला आहे कारण याच धारणेला अनूसरून पुरूष स्त्रीला आपली खाजगी मालकी समजत होता.त्याच्या मनात आले तर ती घरात राहिल,त्याच्या मनात आल तर ती नौकरी करू शकेल.स्त्री फक्त तिच्या पतीने दिलेल्या स्वातंत्र्याचा उपभोग घईल आणि त्याप्रती कृतज्ञ राहिल.नुकतच विवाहाच्या बोहल्यावर चढलेल्या प्रियंका चोप्राचा पति राहुल बोसने मोठ्या थाटात घोषणा केली की,त्याने तिला काम करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे यावर तिचा मित्र फरहान अख्तरने म्हटले की,चित्रपटात प्रियंकाला काम करण्यासाठी तिला तिच्या पतिच्या आदेशाची गरज काय आहे?आपल्या क्षेत्रात ठसा उमटवलेल्या स्त्रीची ही अवस्था असेल तर सामान्य स्त्रीची काय असेल?
सर्वोच्च न्यायालयात स्त्री स्वातंत्र्याच्या अनेक रुपांवर विचार सुरू आहे.न्यायालयाने तीन तलाकवर आणलेली बंदी हा सुद्धा याचाच भाग आहे.लैंगिक समानता आणि लैंगिक स्वातंत्र्य या दोन्ही आघाड्यांवर तिचा संघर्ष सुरू होता ज्यामुळे तिला सतत मार पडत होती मात्र हळू-हळू तिला यात विजय मिळताना दिसत आहे.सर्वोच्च न्यायालयाने कौटुंबीक संपत्तीत हक्क देवून लैंगिक समानतेसोबत कलम ४९७ रद्द करून लैंगिक स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे.
       अनेक कायदे आणि घटनेतील व्यवस्था यानंतरही स्त्रीला बरोबरीच स्थान वा तिच स्वातंत्र्य सुनिश्चित झाल आहे का?यात शंका नाही की,तिला मागील काळाच्या तुलनेत अधिक संधी मिळाल्या आहेत.शिक्षण,नौकरी,खेळ अणि नानाविविध क्षेत्रात तिचा वावर आणि स्विकार्यहता वाढली आहे.सरकारी जाहिराती या स्त्री समानतेचे जे गुलाबी रूप दाखवतात ते भलेही तेवढेसे खरे नसेल मात्र आपल्या सार्वजनिक जीवनात स्त्रीचे स्थान आणि तिच अस्तीत्व दोन्ही वाढले आहे.
मात्र दोन कडव्या गोष्टी वरिल सर्व बाबींवर भारी आहेत.पहिली गोष्ट म्हणजे सगळे कायदे मिळून सुद्धा स्त्रीला तिचा घटनात्मक अधिकार मिळवून देवू शकले नाहीत.हुंडा विरोधी कडक कायदा करूनही हुंडा प्रथा थांबलेली नाही,कौटुंबीक हिंसाचार विरोधी कायदा करूनही घरातील स्त्रीला होणारी मारहाण थांबलेली नाही.कार्यालयातील होणा-या तिच्या लैंगिक शोषनाविरूद्ध कायदा होवूनही अशा प्रकारात वाढ होतच चालली आहे.बलात्का-याला फाशी निश्चित करूनही दर दिवसाला हृद्याला हेलावून टाकणा-या अशा घटना घडतच आहेत.
दूसरी गोष्ट म्हणजे एवढ्या सगळ्या कायद्यानंतरही समाजात स्त्रीला बरोबरीच स्थान मिळत नाही कारण समाजाची मानसिकता अजूनही म्हणावी तेवढी बदललेली नाही.स्त्रीया बदलत आहेत,पुरूष बदलायला तयार नाही.स्त्री स्वातंत्र्याला घेवून त्यांच्या मनात एक प्रकारची सांशकता असलेली दिसते.महिला त्यांच्यासाठी एक सहकारी नाही तर एक गैरसोईची उपस्थिती आहे.यांच्याशी असलेल्या मैत्रीकडे संशय आणि कुत्सीकतेच्या भावनेने बघितले जाते आणि संधी मिळताच यांच्या लैंगिक शोषणाचा प्रयत्नही केला जातो.

       सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाकडेही याच कुत्सीकतेच्या भावनेने कदाचित बघितले जाईल.न्यायालयाने विवाहबाहय संबंधाला खुली परवानगी दिली आहे असे सोईस्करपणे पसरविण्याचा प्रयत्न केला जाईल जेंव्हाकी न्यायालयाने अस काहीच केलेल नाही.न्यायालयाने फक्त विवाहबाहय संबंधाला गुन्हा मानण्यास नकार दिला आहे.नायालयाने कलम ४९७ रद्द केले आहे ज्याच्या आधारे कोणी पुरूष आपल्या पत्नीच्या विवाहबाहय संबंधाला घेवून त्या पुरूषावर खटला दाखल करू शकत होता.गमतीची बाब म्हणजे अशा प्रकरणात स्त्रीवर खटला दाखल होत नव्हता कारण ती व्यक्ती नाही तर तिच्या पतीची खाजगी मालकी समजली जायची.
खरंतर न्यायालयात विवाहबाहय संबंधात स्त्रीलाही दोषी मानले जावे म्हणून दाद मागण्यात आली होती.मात्र न्यायालयाने यापूढे जावून दोघांनाही अशा प्रकरणात दोषी मानण्यास नकार दिला आहे.व्यभिचार हा गुन्हा नसला तरी विवाहबाह्य संबंधाच्या आधारावर स्त्री किंवा पुरूष दोघेही घटस्फोट घेवू शकतात असेही न्यायलयाने म्हटले आहे.
जी लोक न्यायालयाच्या या निर्णयाला पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव सांगून विवाह संस्थेला धोका असल्याचे म्हणत आहेत त्यांनी हे समजल पाहिजे की,विवाह संस्थेला खरा धोका स्त्री-पुरूष असमानतेचा आहे.जर विवाह संस्थेत स्त्रीला बरोबरीचा अधिकार नसेल आणि ती तिच्या पतीची खाजगी मालमत्ता असेल तर या संस्थेचे असण्याला काहीच अर्थ उरत नाही.जर दोघात परस्पर विश्वास आणि बरोबरीच नात असेल तरच लग्नात सार्थकता आहे.न्यायलयाचा निर्णय हेच सुनिश्चित करतो.स्त्रीयांना बरोबरीच्या अधिकार फक्त न्यायालयाच्या निर्णयांनी मिळणार नाही.इतर लढायांसारखी ही लढाईही त्यांनाच लढावी लागेल.त्यांना संपत्तीत अधिकार आणि समाजात आपल स्थान स्वत: मिळवाव लागेल.जी लोक पाश्चिमात्य संस्कृतीचा हल्ला म्हणून त्यांना घाबरवत आहेत ती आणखीन घाबरवण्याचा प्रयत्न करतील मात्र या भीतीच्या पूढे जावून त्यांना आपला बरोबरीचा घटनात्मक अधिकार मिळवावा लागेल.
-सुरेश मंत्री

टिप्पण्या

  1. अगदी बरोबर आहे सर.सर्वोच्च न्यायालयाने हे कलम रद्द केले. स्त्रियांना स्वातंत्र्य दिले आहे, पण समाजाने दिलेले नाही.आज आपल्या समाजात एक पुरुष दोन स्त्रियांसोबत विवाह करून सर्वांसमक्ष घरात संसार करतो. समाजाला हे दिसतं. समाज गप्प बसतो. पण एक स्त्री दोघां पुरुषासोबत एकाचवेळी जर संसार करू लागली, तर ह्या समाजाला ते रुचेल का ? केवळ कायदे करून स्त्रियांना स्वातंत्र्य मिळणार नाही. तर समाजाने मानसिकतेत बदल करणं आवश्यक आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...