मुख्य सामग्रीवर वगळा

शाळेतील वर्गही वाटू लागले हिंदू-मुसलमानात


नुकतच एका शाळेतील हिंदू-मुसलमान विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वर्गात वाटल्याचे प्रकरण समोर आले आहे.उत्तर दिल्लीच्या महानगर पालिकेची ही शाळा आहे वजीराबाद गावातील.या शाळेतील पहिली वर्गाच्या अ तुकडीत ३६ हिंदू आहेत तर ब तुकडीत ३६ मुसलमान.दूसरीच्या अ तुकडीत ४७ हिंदू,ब तुकडीत २६ मुसलमान आणि १५ हिंदू तर क तुकडीत ४० मुसलमान. तीसरीच्या अ वर्गात ४० हिंदू,ब तुकडीत २३ हिंदू आणि ११ मुसलमान,क तुकडीत ४० मुसलमान तर ड तुकडीत १४ हिंदू आणि २३ मुसलमान.चौथीच्या अ तुकडीत ४० हिंदू,ब तुकडीत १९ हिंदू आणि १३ मुसलमान आणि क तुकडीत ३५ मुसलमान.पाचवीच्या अ तुकडीत ४५ हिंदू,ब तुकडीत ४९ हिंदू,क तुकडीत ३९ मुसलमान आणि २ हिंदू तर ड तुकडीत ४७ मुसलमान.शाळांचे काम असते मुलांमध्ये सर्वधर्म समभाव आणि सामाजिक ऐक्याची भावना वाढीस लावणे.शाळांमध्येच असे प्रकार घडू लागले तर भारताचे भवितव्य काय असेल?
            शाळेमध्ये विद्यार्थी तुकड्यांमध्ये विभागले जातात ही मान्यताप्राप्त प्रक्रिया आहे आणि ती सगळ्या शाळांमध्ये राबविली जाते मात्र एकाच वर्गातील विद्यार्थ्यांच्या धर्माच्या आधारावर तुकड्या करणे कितपत योग्य आहे?या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक सी.बी.सहरावत यांनी दिलेले स्पष्टीकरण हास्यास्पद आहे.त्यांनी म्हटले की,आम्ही धर्माच्या आधारावर नाही तर आहाराच्या आधारावर तुकड्या निर्माण केल्या आहेत.हा प्रशासनाचा निर्णय होता की जे सर्वात चांगल असेल ते कराव ज्यामुळे शांती बनून राहिल.त्यांनी दिलेले हे स्पष्टीकरण पूरेशे आहे का?असजर असेल तर मग धर्माच्या नावावर नाही तर शाकाहारी आणि मांसाहारीच्या नावावर विद्यार्थ्यांची वाटणी व्हायला हवी होती कारण मांसाहारी मुले तर हिंदू धर्मात सुद्धा असतात.आपण कशा-कशाच्या आधारावर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या तुकड्यांत वाटणार याचा थोड थांबून विचार केला पाहिजे.
येथील लोकांचे असे म्हणने आहे की,जेंव्हा पासून हे नविन मुख्याध्यापक रूजू झाले आहेत तेंव्हा पासूनच अशा प्रकारे विद्यार्थ्यांची वाटणी करण्यात आली आहे.काही लोकांनी याची तक्रार सुद्धा केली मात्र ती लिखीत स्वरूपात नाही.अनेक तुकड्या स्पष्टपणे हिंदू-मुसलमानात स्वतंत्र वाटल्या गेल्या आहेत तर काही तुकड्यात दोन्ही धर्माच्या मुल आहेत मात्र त्यांना स्वतंत्र गटात बसवण्यात आले आहे जेणेकरून ते एकमेकात मिसळणार नाहीत.जरा विचार करा एवढ्या लहान वयात धर्माच्या आधारावर जर वाटणी केली जात असेल तर अशा प्रकारच्या राजकारणाने आपले जीवन चांगले होत आहे का?
राजकारण आपल्यात सतत फुट पाडत आहे.राजकारणी धर्माच्या नावावर एकजुट होण्याचे आव्हान करतात मात्र यांचा उद्देश केवळ मतं मिळवण हा असतो.एक प्रकारची असुरक्षितता निर्माण करण्यासाठी हे सर्व केले जाते.आपण जेंव्हा धर्माच्या नावावर एकजुट होता तेंव्हा घटनेने आपल्याला दिलेल्या अधिकारांपासून स्वत:ला वेगळे करता.आपण आपल्या नागरिकत्वापासून वेगळे होता.खरी विभागणी याच स्तरावर होते.एकदा का आपण आपल्या नागरिकतेला या धार्मिक तत्वांच्या हवाली केले की आपल्यावर यामुळे बनलेल्या जमावाचा कब्जा होतो,ज्या जमावावर कायद्याचा कसलाच परिणाम होत नाही.असाहय लोकांचा समूह धर्माच्या नावावर एकत्र येवून देशाचे कधीच भले करू शकत नाही,धर्माचे तर सोडूनच द्या.
आपणच सांगा की,शाळांमध्ये अशा प्रकारची विभागणी व्हायला पाहिजे का?अशा प्रकारची विभागणी करणा-या शिक्षकाची मानसिक तपासणी व्हायला पाहिजे ज्यामुळे कळू शकेल की,त्याच्यावर कोणत्या गोष्टींचा प्रभाव आहे.राष्ट्रीयतेचा कोणत्या धर्माशी काहीच देणे-घेणे नाही.जर धर्मात राष्ट्रीयता असती तर स्वत:ला हिंदू राष्ट्राचा हिंदू म्हणणारे लोक कधीच भ्रष्ट नसते.सर्व काही प्रामाणिकपणे केले असते.हि‌दू-हिंदू वा मुस्लिम-मुस्लिम केल्यानंतरही नगरपालिके पासून तहसिल पर्यंतच्या कार्यालयात भ्रष्टाचारच करतात.हे प्रश्न धर्माच्या आधारावर सुटणार नाहीत तर नागरिक अधिकारांनी सुटतील.आपल्यावर काही अन्याय झाला तर आपण धार्मिक संघटनांकडे जाल की कायद्याने मिळालेल्या अधिकारांचा उपयोग कराल?यामुळेच हिंदू संघटन असो वा मुस्लिम संघटन त्यांना धार्मिक कार्यांऐवजी राजकिय क्षेत्रात येवू दिल तर हिच अवस्था होईल.धर्माची भूमिका जर आहे तर ती फक्त व्यक्तीगत स्तरावरच आहे.धर्मामुळे नागरिक जीवनात नैतिकता येत नाही तर ती घटनात्मक कर्तव्यांमुळे येते.कायदा तोडण्याच्या भीतीमुळे येते.
अगोदरच अनेक स्वार्थी लोक या देशाचे तुकडे पाडू पाहत आहेत.शांळांचे काम असते विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची,एकजुटीची,समानतेची भावना वाढीस लावणे.शाळाच जर धार्मिक आधारावर विद्यार्थ्यांची अशा प्रकारची विभागणी करू लागल्या तर भविष्यात देशाची अखंडता निश्चितच धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.
-सुरेश मंत्री


टिप्पण्या

  1. शाळा हे शिक्षकाचे मंदिर, विदयार्थी हा दैवत व शिकवणे हे कर्तव्य आहे. पण असे शिक्षकच द्रोणाचार्यासारखे पक्षपाती व जातीवादी असतील तर देशाचे तुकडे का होणार नाहीत ? अशा अपप्रवृत्तींना वेळीच ठेचले पाहिजे.

    उत्तर द्याहटवा
  2. I request to government to close such schools and restrict such teachers.that dangerous for our land.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...