मुख्य सामग्रीवर वगळा

मित्रहिनता

एकदा मी आणि माझ्या सहका-याची चर्चा सुरू होती.गोष्ट या मुद्द्यावर येवून थांबली होती की,कोण खरा मित्र असतो आणि कोण नाही ?मी त्याला विचारले,तुझा कोण विश्वासू मित्र आहे?त्याने तात्काळ उत्तर दिले,अनेक आहेत.मी त्याला चार नावे सांगावयास सांगितले.बराच वेळ विचार केल्यानंतर त्याने कसेबसे एकच नाव सांगितले.मला असे वाटले की,त्याने हे ही नाव लाजून सांगितले कारण त्याला भीती होती की,तुझा तर एकही खरा मित्र नाही असे मी म्हणेल.
            चर्चा पूढे चालू राहिल्यानंतर त्याने मला विचारले की,खरा मित्र कोण असतो?मी त्याला सांगितले की,आपण संकटात असताना सर्वप्रथम ज्याचे नाव आपल्याला आठवते तोच आपला खरा मित्र.मजेची गोष्ट अशी की,कित्येक वेळा ती ही व्यक्ती असते जिला आपण आपला शत्रू समजत असतो.मात्र आपण या ख-या मित्रासोबत ना जास्त हसत-बोलत असतो ना सोबत फिरत असतो.त्याच्या सोबत आपण कमीत-कमी वेळ घालवत असतो.हे ऐकल्यानंतर तो माझ्याकडे बघतच राहिला जणू मी त्याच्या मनातील गोष्ट सांगितली आहे.
इंटरनेट मुळ जग जवळ आल आहे मात्र माणस दूरावत चालली आहेत.या गर्दीतही माणुस एकटा फिरत आहे.प्रत्येकाला एका ख-या मित्राचा शोध आहे.मी अनेक कार्यालयात पाहतो की,लोक मान खाली घालून येतात आणि कार्यालयाची वेळ संपली की चूपचाप निघून जातात.त्यांना या ठिकाणी अस कुणीच वाटत नाही ज्याच्यासोबत चार क्षण हसाव-बोलाव,गप्पा माराव्यात.आजकालच्या मित्रतेत तर आपला कुणावरच विश्वास राहिलेला नाही.मित्रता तर तेंव्हा आहे जेंव्हा अंतरंगातील गोष्टी एकमेकांना बेधडक सांगता येतील.मात्र आज आपल्याला प्रत्येक माणसापासून भीती वाटते की,जर आपण आपल्या मनातील गोष्ट सांगितली तर तो त्याचा आधार घेवून कुठे आपली चाडी तर करणार नाही ना वा गैरफायदा तर घेणार नाही ना?काय विडंबना आहे,ज्याला आपण आपला खरा मित्र म्हणतो त्यालाच भीत असतो.ज्याच्या सोबत आपण वेळ घालवत असतो त्याच्या सोबत आपण मनमोकळ बोलू शकत नाहीत,मनातील गोष्टी सांगू शकत नाहीत.मानवी स्वभाव आहे की,मनातील गोष्ट कुणाकडे तरी सांगितल्याशिवाय मनाला चैन पडत नाही मात्र असा अपवादानेच भेटतो.कोणी तरी म्हटल आहे,हर तरफ,हर जगह बेशुमार आदमी,फिरभी तनहाईयोंका शिकार आदमी.
काही लोक अस म्हणतात की,मित्रापेक्षा शत्रूवरच जास्त विश्वासू आहे कारण आपल्याला माहित असत की,तो कुठपर्यंत हानी पोहचवू शकतो.अनेक जणांचे हे दु:ख आहे की,त्यांच्याकडे असा कोणीच नाही ज्याला मनातील सर्व गोष्टी मनमोकळेपणाने बोलता येतील.मनातील गोष्टी बोलायला आहे तर ती पत्नीच आहे पण तिला सर्व गोष्टी सांगता येत नाहीत नाहीतर मोकळ वाटण्याऐवजी वाद झलाच समजा.अशा अनेक गोष्टी सांगण्यासाठी ना भाऊ जमतो ना बहिण,फक्त खरा मित्रच लागतो.
आपण मित्रहिन का आहोत याचे कारण आपल्याला माहित आहे का?आपणच आपल्या मुलांना एकलकोंडेपणा शिकवतो,दूस-याच्या एक पाऊल पूढे जाण्याच्या स्पर्धेत ढकलून देतो.तो मित्रासोबत बाहेर जावून आला तर त्याला कोणी पैसे खर्च केले हे विचारतो.त्याला आपण स्वत: पैसे खर्च न करता,दूस-यांचे पैसे खर्च करण्यास शिकवतो.जर तो कुणासाठी पैसेच खर्च करणार नाही तर त्याचे मित्र कसे बनतील?तो जर मित्राची मदत करण्यास गेला तर तो तुझ्या काय कामाला येतो म्हणून रागावतो आणि त्याचा मित्र मदतीला धावून आला तर प्रशंसा करतो. आपण त्याला मित्रत्वात फायदा शोधण्याचे संस्कार देत नाही आहोत का?
मित्रतेत एकमेकांना वेळ द्यावा लागतो आणि असावा लागतो तो निस्वार्थ त्याग.मित्रता तेंव्हा वाटते जेंव्हा दूस-याला वाटते की,आपल्याला त्याची काळजी आहे.मित्र जर एखाद्या मदतीच्या अपक्षेने आला तर आपण त्याला एखादे तांत्रिक कारण सांगून वेळ काढण्याचा प्रयत्न करतो.आपल्याला अस वाटत की,त्याला आपण बहाना बनवत आहोत हे समजणार नाही.मात्र नंतर आपण त्याच्याकडे मदतीच्या अपक्षेने गेल्यानंतर त्याच्याकडूनही तांत्रिक कारण पूढे केले जाते.मित्र तर तो असतो जो योग्यला योग्य म्हणेल आणि अयोग्यला अयोग्य.तो आपली नुसती प्रशंसा करणार नाही तर चूकीच्या गोष्टीसाठी आपले कान धरण्यास मागे पूढे पाहणार नाही.मात्र आपण एखाद्याला मित्र ही म्हणतो आणि त्याची ईर्ष्या सुद्धा करतात की,तो आपल्या पूढे तर निघून जाणार नाही ना?किती असे मित्र आहेत जे आपल्या मित्राला स्वत:च्या पूढे जाताना पाहून आनंदी होतात?
मित्रतेत आपल्या संस्कारांची भूमिका महत्वाची असते.ज्यांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांकडून सगळा हिशोब घेतला ते आपल्या मित्राला कशे सोडतील ? मला आज पर्यंत असे एकही उदाहरण भेटले नाही ज्यात एखाद्या मित्राने आपली मालमत्ता आपल्या त्या मित्राच्या नावे केली ज्याने आपल्या मुला आणि भावांपेक्षा जास्त जीवनभर साथ दिली असेल.
अनेक जण म्हणतात की,मित्रता त्याच्याशी होते ज्याच्याशी आपले काम नसते.माझे म्हणने याउलट आहे.मित्रता एकमेकांची मदत केल्याने निर्माण होते,त्यातून जवळीकता निर्माण होते.कोणी आपली मदत केली तर त्यातून तो आपले वाईट कधीच करणार नाही हा विश्वास निर्माण होतो.शेवटी एक तरी सच्चा मित्र असायलाच हवा.हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा जो हजार पण तुमच्या विरूद्ध असताना तुमच्या सोबत असेल.
-सुरेश मंत्री



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...