मुख्य सामग्रीवर वगळा

ईच्छामृत्यूवर निर्णय आवश्यक

फ्रान्स मध्ये एका दुर्धर आजाराने ग्रस्त रूग्णाला तेथील सरकारने ईच्छामृत्यूची परवानगी दिल्यानंतर या विषयावर जागतीक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे.ईथे विसेंट लैंबर्ट नावाचा एक व्यक्ती २००८ मध्ये कार दुर्घटनेचा शिकार झाला होता.त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो स्मृतीभ्रंश होवून कोमात गेला.तेंव्हापासून आजपर्यंत तो कोमातच आहे.फ्रान्सच्या कायद्याप्रमाणे डॉक्टरांनी लैंबर्टची पत्नी आणि कुटुंबियांच्या परवानगीने त्याची जीवरक्षक प्रणाली काढण्याचा निर्णय घेतला मात्र लैंबर्टच्या आई-वडिलांनी याला विरोध केला आणि प्रकरण संयुक्त राष्ट्राच्या न्यायालयात घेऊन गेले.सुनावणी नंतर संयुक्त राष्ट्राच्या न्यायालयाने फ्रान्स सरकारला लैबर्टला सध्यातरी जीवरक्षक प्रणालीवरच ठेवण्याचे निर्देश दिले कारण त्याच्या आई-वडिलांना आशा आहे की उपचारानंतर आपला मुलगा ठिक होईल.
लैंबर्टच्या आई-वडिलांच्या मनात ही ईच्छा यामुळे जागली कारण मागील काही वर्षात अशी काही प्रकरणे समोर आली आहेत ज्यात दशकांपर्यंत कोमात राहिलेले रुग्ण उपचारानंतर ठिक झाले आहेत.मागिल महिन्यात संयुक्त अरब अमीरातमध्ये मुनिरा अब्दुलाह नावाची महिला २७ वर्षे कोमात राहिल्यानंतर भानावर आली.अशाचप्रकारे अमेरिकचा टेली वैलिस १९ वर्षानंतर,जर्मनीचा कार शर्यतीचा प्रसिद्ध खेळाडू माइकल शूमाकर चार वर्षे कोमात राहिल्यानंतर तंदुरुस्त झाला.२०१० मध्ये अहमदाबादमध्ये गुंडांच्या हल्ल्यानंतर डिंपल पटेल नावाची महिला चार वर्षे कोमात राहिल्यानंतर केवळ तंदुरुस्तच झाली नाही तर तिने तिच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांची ओळख सुद्धा पटविली.
ईच्छामृत्यूवर गेल्या कित्येक वर्षांपासून जगात विचार विनिमय सुरू आहे.भारतही या चर्चेत सहभागी आहे.सर्वोच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक निर्णयात ईच्छामृत्यूला या तथ्यावर मान्यता दिली की,असाध्य रोगाने ग्रस्त रोगी ईच्छा-पत्र लिहून ठेवू शकतो.सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय असाध्य रोगाने ग्रस्त रूग्णाची जीव रक्षक प्रणाली काढून टाकण्याची परवानगी देतो.न्यायालयाने सांगितले आहे की,जगण्याची इच्छा नसणा-या रूग्णाला निष्क्रिय वा मुर्छीत अवस्थेत शारीरिक पिडा सहन करु देवू नये.जोपर्यंत ईच्छामृत्यूवर संसदेत कायदा बनत नाही तोपर्यंत न्यायालयाने याबाबतीत दिलेले दिशानिर्देश प्रभावी राहतील.
भारतात हा मुद्दा तेंव्हा चर्चा आणि वादविवादचा विषय बनला जेंव्हा मुंबईची परिचारिका अरुणा शानबागच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात ईच्छामृत्यूसाठी दाद मागण्यात आली होती.बलात्कार आणि हिंसेची शिकार झाल्यानंतर कोमात गेलेली अरुणा गेली ४२ वर्षे जीवरक्षक प्रणालीच्या आधारावर जगुन शारीरिक यातना सहन करत आहे.तिला सामान्य अवस्थेत आणण्यासाठीचे सर्व वैद्यकीय उपचाराचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर ईच्छामृत्यूसाठी न्यायालयात याचिकेद्वारे दाद मागण्यात आली होती मात्र न्यायालयाने त्यावेळी यास योग्य मानले नाही.
धर्म,संस्कृती,परंपरा आणि नैतिकतशी जुडलेला हा मुद्दा निश्चितच जटिल आहे.मात्र ईच्छामृत्यूच्या या वादाला तार्किक परिणामापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे.आधुनिक चिकित्सा पद्धतीत अशा काही जीवरक्षक प्रणाली विकसित झाल्या आहेत ज्या रुग्णाला जीवन आणि मृत्यूच्या दरम्यान ताटकळत ठेवतील.चिकित्सेत अशाप्रकारचे उपाय खाजगीकरणाला प्रोत्साहन देतात.केवळ जीवरक्षक प्रणालीच्या आधारावर रुग्णामध्ये केवळ एका क्षमतेपर्यंत प्राणवायूचा संचार बनून राहतो.वर्षानुवर्ष कोमात गेलेल्या अशा रुग्णांवर उपचार करताना एक तर त्यांच्या नातेवाईकांचे आर्थिक दिवाळे वाजत आहे किंवा नाईलाजाने ते त्यांना रुग्णालयात बेवारस सोडण्यास विवश होत आहेत.सध्या जगात स्वित्झर्लंड एकमेव असा देश आहे जिथे काही अटींची पुर्तता केल्यानंतर ईच्छामृत्यूची परवानगी दिली जाते.भारतात ईच्छामृत्यूसाठी ईच्छापत्र देण्याची सुविधा याच दिशेने टाकलेले एक पाऊल आहे असे म्हणता येईल.
-सुरेश मंत्री.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...