मुख्य सामग्रीवर वगळा

एकाचवेळी निवडणूका देशहिताच्या

लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकाचवेळी घेण्याच्या मुद्द्यावरून काही दिवसांपूर्वी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.१७ व्या लोकसभेच्या पहिल्या संयुक्त सत्रात राष्ट्रपतींद्वारे या प्रस्तावावर गंभीरतेने विचार करण्याची केलेली अपिल त्यांची आणि केंद्र सरकारची प्राथमिकता जाहिर करते.१९  जून रोजी आयोजित सर्वपक्षीय बैठकीत यावर विचार करण्यासाठी एक समिती बनवण्याची घोषणा अवश्य झाली मात्र या बैठकीत या विषयावर एकमत झाले नाही.या मुद्द्यावरून विरोधी पक्ष दोन गटात विभागले गेले.काँग्रेस,समाजवादी पार्टी,बहुजन समाजवादी पार्टी,टीडीपी आणि डीएमकेसह १६ पक्षांचे या बैठकीपासून दूर राहणे या मुद्द्याला पूर्णपणे नाकारणे आहे तर दूसरीकडे बैठकीला उपस्थित एनडीएच्या घटक पक्षांसहीत २१ पक्षांचे समर्थन या विचाराला वेग प्राप्त करून देण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न आहे.
       देशाच्या कोणत्याही मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षात चर्चा हे लोकशाहीचे लक्षण आहे मात्र पंतप्रधानांकडून एवढ्या महत्वपूर्ण मुद्यावर आयोजित बैठकीपासून काही पक्षांचे दूर राहणे ही लोकशाहीच्या मूल्यांची अवहेलना आहे.सीपीआई आणि सीपीएमने एकाचवेळी निवडणूका घेणे अवघड असल्याने चिंता दर्शविली आहे मात्र वैचारिक रूपाने ते एकाचवेळी निवडणूकांच्या समर्थनात आहेत.लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकाचवेळी घेणे आव्हानात्मक आहे मात्र यावर तपशिलवार विचार करून अमलात आनणे देशाच्या हिताचे आहे.विरोधी पक्षांना ही भिती वाटत आहे की,दोन्ही निवडणूका एकाचवेळी घेतल्यास आपल्या प्रभावाचा फायदा करून घेण्यात सत्ताधारी पक्ष विधानसभा निवडणूकात सुद्धा यशस्वी होईल.अशात स्थानिक मुद्दे गौण होतील.मात्र त्यांचा हा विचार चूकीची धारणा आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणूकीच्या वेळी भाजपाला प्रचंड बहुमत मिळाले होते मात्र त्यानंतर लगेच झालेल्या कित्येक विधानसभा निवडणूकात त्यांना हार पत्करावी लागली.१७ व्या लोकसभेसाठी नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणूकीच्या वेळी ओरिसामध्ये भाजपाला ७ जागांवर अधिक्य मिळाले,विधानसभेत मात्र बीजेडीला बहुमत मिळाले यावरून हे स्पष्ट होते.
खरंतर देश आणि राज्यांचे मुद्दे संबंधित निवडणूकांवर प्रभाव टाकत असतात.नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणूकीचा खर्च ६०,००० कोटी रूपये आहे.ही रक्कम कोण्या एका राजकिय पक्षाने खर्च केलेली नाही तर यामुळे देशाच्या तिजोरीवर मोठा भार पडला आहे.राजकिय पक्षांच्या खर्चावर कसलाच लगाम नसल्याने निवडणूकीच्या खर्चात सतत वाढ होत आहे.निवडणूका एकाचवेळी घेतल्यास रॅली,रोडशो,मतदारांना आकर्षित कराण्यासाठी केलेला खर्च तसेच बूथ आणि अन्य व्यवस्थापन यावरिल खर्चात मोठी कमी येईल.यामुळे जनतेकडून कररूपाने वसूल केलेल्या रक्कमेचा उपयोग विकास कामांसाठी करता येईल.
अस नाही की,एकाचवेळी निवडणूका घेण्याचा विचार नविन आहे.१९५१ ते १९६७ पर्यंत सर्व निवडणूका एकाचवेळी झाल्या होत्या.१९६८-६९ च्या दरम्यान काही विधानसभांचा कार्यकाळ पूर्ण न झाल्याने या प्रक्रियेत अनियमितता आली.वर्तमान परिस्थितीत पंचायत पासून लोकसभेपर्यंत निवडणूका एकाचवेळी करण्याच्या विचाराला भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुरूवात मानून विरोधी पक्षांनी विरोधी स्वर आवळला आहे मात्र याकडे भाजपा वा काँग्रेसने केलेली सूरूवात म्हणून बघून चालणार नाही.
१९९९ मध्ये न्यायमुर्ती बी.पी.जीवन रेड्डींद्वारे निवडणूक सुधारणेवर आधारित १७० व्या अहवालात एकाचवेळी निवडणूका घेण्याची शिफारस करण्यात आलेली होती.२०१५ मध्ये संसदेच्या स्थायी समितीने सुद्धा याची शिफारस केली होती.माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सुद्धा देशात वर्षभरात कोणती न कोणती निवडणूक असल्याने सरकारचे सामान्य कामकाज प्रभावित होत असल्याने चिंता व्यक्त केली आहे.एक देश एक निवडणूक हा प्रस्ताव यासाठी तर्कसंगत आहे कारण सध्याच्या निवडणूक संरचनेत देशातील कोणते न कोणते राज्य व्यस्त असते.
            निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने सरकार आणि मतदाता दोघांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होतो.या दरम्यान सरकारला कोणताही महत्वाचा धोरणात्मक निर्णय घेता येत नाही.मंत्र्यांसोबत प्रशासनातील अधिकारी निवडणूकीत व्यस्त असल्याने विकास आणि जनकल्याणाची कामे ठप्प पडतात.सतत निवडणूका झाल्याने उमेदवारांमार्फत केला गेलेला अतिरिक्त खर्चही देशातील काळ्या संपत्तीच्या संचयनाला वेग देतो.एका अहवालानूसार राजकिय पक्षांना प्राप्त होणा-या देणगीच्या ७० ते ८० टक्के हिस्सा अज्ञात स्त्रोतांकडून प्राप्त होतो.
         देशात एकाचवेळी निवडणूकीची व्यवस्था लागू करने तेवढी सोपी गोष्ट नाही.या दिशेत सर्वात व्याव्हारिक प्रश्न हा आहे की,जर एखादे बहुमतातील सरकार अल्पमतात आले तर काय पर्याय असेल?या स्थितीत पुन्हा निवडणूक घेण्याची कसरत करणे ही पद्धत सध्या प्रचलनात आहे.यास्थितीत एकाचवेळी निवडणूका घेण्यासाठी भंग विधानसभा अथवा लोकसभेला स्थगित ठेवणे किंवा बहुमत गमावलेल्या सरकारला सत्तेत ठेवणे जनमताचा अनादर केल्यासारखे होईल.घटनेच्या ३५६ कलमाचा उपयोग आणि त्यानंतरची दिशा हा सुद्धा चिंतेचा विषय होईल.
घटनेत दुरुस्ती करून या नविन व्यवस्थेला गती द्यायची असेल तर यामध्ये संशोधन करण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता लागेल जी सद्यस्थितीत आव्हानात्मक आहे.जर देशात एकाच वेळी निवडणूका घ्यायच्या असतील तर अनेक राज्य सरकारांचा ५ वर्षांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच बळी द्यावा लागेल.यासाठी प्रस्तावित शिफारशींसाठी एकमत होणे अनिवार्य आहे.ही सुरूवात ऐतिहासिक आहे मात्र यासाठी दूरगामी आव्हानांकडे सुद्धा लक्ष देणे आवश्यक असेल.
-सुरेश मंत्री. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...