जग काही काळासाठी ठप्प होणार आहे का?जगातील अनेक देशांना जगाशी असलेला संपर्क तोडावा लागेल का?जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना आजाराला जागतिक महामारी घोषित केले आहे.या अगोदर स्वाईनफ्ल्युला महामारी घोषित करण्यात आले होते.या विषाणुच्या संसर्गाने अनेक देशातील नागरिक बाधित झाले असुन नजिकच्या काळात याचा ताण आरोग्य व्यवस्थेवर पडणार आहे.या आजाराचा फटका शेअर बाजार,अनेक व्यवसाय,सार्वजनिक उत्सवांना बसला असून या विषाणुने जगासमोर मोठे आव्हान उभा केले आहे.
कोरोनामुळे चीनपेक्षा इटलीमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.ईथे १२,४६२ लोक कोरोनाने संक्रमित आढळले आहेत,८२७ लोकांचा मृत्यू झाला आहे.संपूर्ण ईटलीमध्ये टाळेबंदी सारखी अवस्था झाली आहे.६ कोटी लोकांना एप्रिल पर्यंत घराबाहेर निघण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.त्यांना घरातच रहावे लागेल.औषध आणि किराणा दुकाने सोडुन इटलीमध्ये सर्वकाही बंद आहे.जगाची आठवी अर्थव्यवस्था असणा-या इटलीतील दोन महत्वाची शहरं सेंट्रल मिलान आणि पीसा शहरांची स्थिती बघितली तर याचा अंदाज येतो की, ६ कोटी लोकांवर प्रतिबंध लागल्यानंतर तेथील रस्त्यांवर काय परिणाम झाला आहे.तेथील शाळा,महाविद्यालयं,रेस्टॉरंट,फुटबाल सामने सर्व काही बंद आहेत.रस्ते निर्जन आहेत.कारखाने बंद होत आहेत.जगातील पर्यटकांना आकर्षित करणारा देश इटली.या देशाचा सहा टक्के जीडीपी पर्यटन उद्योगातुन येतो,मात्र तो आता ठप्प झाला आहे.ईथे प्रतिवर्ष सहा कोटी पर्यटक येतात.सर्व उड्डाने रद्द करण्यात आली आहे.यामुळे ईथे हॉटेल आणि पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसला आहे.कोरोनाचा परिणाम कला,मनोरंजन,किरकोळ व्यापार,हॉटेल उद्योगांवर झाला आहे,ज्यांचा जीडीपीत २३ टक्के हिस्सा आहे.इटलीच्या जीडीपीत २०२० मध्ये २ टक्क्यांनी घसरण होईल असं म्हटल जात आहे.
इटली सरकारने कोरोना विषाणु विरुद्ध लढण्यासाठी २८ बिलियन अमेरिकन डॉलरचे बजट ठेवले आहे.भारतीय चलनात ही रक्कम दोन लाख कोटी होते.विचार करा एका विषाणु विरुद्ध लढण्यासाठी दोन लाख कोटी रूपये खर्च केले जात आहेत.जर्मनीने सुद्धा १ बिलियन युरो कोरोनावर खर्च करण्याची घोषणा केली आहे.ही रक्कम या विषाणुला रोखण्यासाठी आणि संशोधनासाठी खर्च केली जाईल.जर्मनीच्या चांसलर एंजेला मर्कल यांनी म्हटले आहे की,या विषाणुचा परिणाम जर्मनीवर जास्त होवू शकतो.जर्मनीची ७० टक्के लोकसंख्या यामुळे संक्रमित होवू शकते.त्यांनी हे अशावेळी म्हटले आहे जेंव्हा केवळ जर्मनीत कोरोनाची १,९६६ प्रकरणे समोर आली आहेत आणि केवळ ३ लोकांचा मृत्यू झाला आहे.ईथे १ हजार पेक्षा अधिक जमावाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.फुटबाल सामने होतील मात्र मैदानात गर्दी राहणार नाही.शाळा आणि महाविद्यालये एका आठवड्यासाठी बंद करण्यात आली आहेत.पोलंड मध्ये सुद्धा शाळा आणि महाविद्यालये दोन आठवड्यासाठी बंद करण्यात आली आहेत.
पोलंड मध्ये कोरोनाने संक्रमित लोकांची संख्या केवळ ४७ आहे आणि मृत्यू एकही नाही तरीसुद्धा ईथे शाळा,महाविद्यालये,चित्रपट गृह दोन आठवड्यासाठी बंद करण्यात आली आहेत.रुग्णांना दवाखाण्यात येण्यास बंदी लादण्यात आली आहे आणि व्हिडिओ कॉन्फरेसिंग द्वारे डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितल जात आहे. पोलंडचा आर्थिक विकास दर १ टक्क्यांनी कमी होवू शकतो.अमेरिकेत कोरोनाने संक्रमित लोकांची संख्या १, ३३६ झाली असुन ३८ लोकांचा मृत्यू झाला आहे.अमेरीकी काँग्रेसचे डॉ.ब्रायन मोनहन यांनी म्हटले आहे की,अमेरिकेत ७ ते १५ कोटी लोक या विषाणुने संक्रमित होवू शकतात.ब्रायन यांनी सिनेटला याची माहिती दिली आहे.न्यू जर्सी आणि न्यूयार्क मध्ये आणिबाणीची अवस्था लागू झाली आहे.न्यू जर्सीत भारतीयांची संख्या मोठया प्रमाणात आहे.
अमेरिकेचा शेअर बाजार गडगडला आहे.न्यूयार्कचा ब्रूकलिन ब्रिज रिकामा आहे.हा ब्रिज नेहमी पर्यटकांनी भरलेला असतो.न्यूयार्क मेट्रोत खूप कमी गर्दी आहे.येथील रस्त्यांवर कार पार्क करायला जागा मिळत नाही,आता मात्र रस्ते रिकामे आहेत.कार्यालयातील खुर्च्या खाली आहेत,लोकांना घरूनच काम करण्यास सांगण्यात आले आहे.मैनहैटन मध्ये १७ मार्चला होणारी सेंट पेट्रिक्स परेड रद्द झाली आहे.जगातील मोठया उत्सवांपैकी हा एक मानला जातो.२५० वर्षात हे पहिल्यांदाच होत आहे.या परेड मध्ये दिड लाख लोक मार्च करतात आणि ही परेड बघायला २० लाख लोक येतात.अमेरिकेत त्या युरोपियन देशांतुन येण्यावर बंदी लादण्यात आली आहे ज्या देशात कोरोनाचे संक्रमण झाले आहे.अमेरिकेतील निवडणूक सभांवरही याचा परिणाम झाला आहे.काही उमेदवारांनी आपल्या सभा रद्द केल्या आहेत.सियाटल शहरात २५० पेक्षा अधिक लोक जमा होवू शकत नाहीत.
कोरोना विषाणुमुळे होत असलेले नुकसान आणि याच्या विरुद्ध लढण्यासाठी ठेवलेले बजेट याचा अंदाज लागणे कठिण आहे.या विषाणुमुळे जगातील शेअर बाजार कोसळत आहेत.भारतीय शेअर बाजारात १२ मार्चला मोठी घसरण झाली.सेंसेक्स २९०० अंकांनी घसरला.या घसरणीमुळे ११ लाख कोटी रूपये पाण्यात गेले.२००८ नंतर झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे.डॉलरच्या तुलनेत रूपया अधिकच कमजोर झाला आहे.
भारतात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ७६ झाली आहे यातील १९ रुग्ण महाराष्ट्रात आहेत. कोरोनाचे भारतात आत्तापर्यंत २ बळी गेले आहेत.कोरोनाविरूद्ध लढण्याची तयारी भारताने केली आहे.दिल्ली मध्ये ३१ मार्च अखेर पर्यंत शाळा,महाविद्यालये आणि चित्रपटगृह बंद राहणार आहेत.कर्नाटक, बिहार,उत्तर प्रदेश,छत्तीसगड,ओडिशा मधील शाळा, महाविद्यालये मार्च अखेपर्यंत बंद राहतील.महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे येथील नाट्यगृह, जिम आणि स्विमिंग पूल बंद राहणार आहेत.भारतात बाहेरून येणा-या विदेशी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत.केंद्रीय मंत्र्यांचे विदेश दौरे रद्द करण्यात आले आहेत.पर्यटन आणि हॉटेल उद्योग संकटात आला आहे.६० ते ७० टक्के व्यापार घटल्याने या क्षेत्रातील नौक-या जाण्याचा अंदाज आहे.द.आफ्रिके विरूद्ध एक दिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका रद्द करण्यात आली आहे.आयपीएल स्पर्धा १५ एप्रिल पर्यंत पूढे ढकलण्यात आली आहे.कोरोनामुळे एकूण ८ क्रिकेट स्पर्धांना फटका बसला आहे.१०० वे मराठी नाट्य संमेलन पूढे ढकलण्यात आले आहे.खबरदारी म्हणून अनेक सार्वजनिक उत्सव ठिकठिकाणी रद्द करण्यात येत आहेत.मोठ-मोठया चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पूढे ढकलण्यात आल्या आहेत.सरकारच्या वतीने सर्व खबरदारी घेण्यात येत असून या रोगाच्या भितीने अर्धा भारत बंद स्थितीत आहे.लोकांनी घाबरून जाण्याच कारण नाही मात्र सतर्कता बाळगायला हवी.ज्या देशात कोरोना रुग्णांची संख्या सुरूवातीला कमी होती तिथे ति नंतर वाढु लागते.अफवांवर विश्वास ठेवू नये.अशा अफवांमुळेच कुक्कुटपालन व्यवसाय संकटात आला आहे.अफवा पसरविणा-यांनी आपले कलाचातुर्य कोरोना विरुद्ध जनजागृती करण्यासाठी वापरले तर फार बरे होईल.आवश्यक सावधानीच आपल्याला कोरोना पासुन वाचवु शकते.

-सुरेश मंत्री

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा