मुख्य सामग्रीवर वगळा

क्रिडा क्षेत्र कोरोनाच्या सावटाखाली

 

     भारतासोबत संपूर्ण जगात कोविड-१९ महामारीला सुरुवात होवुन एक वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे. या दरम्यान या महामारीने संपूर्ण क्रिडा क्षेत्राला सुद्धा ठप्प केले होते. या महामारीचा प्रभाव कमी झाल्यानंतर खेळाडू परत मैदानात उतरले होते मात्र जगात काही ठिकाणी या महामारीची दुसरी आणि काही ठिकाणी तीसरी लाट सुरू झाल्यामुळे परत एकदा याचा परिणाम खेळ आणि खेळाडूंवर होत आहे. काही स्पर्धा परत एकदा रद्द करण्यात आल्या आहेत तर काही स्पर्धांमधुन खेळाडूंना माघार घ्यावी लागत आहे.

याच ताज उदाहरण मुष्टियोद्धाचे आहे. मागील आठवड्यात स्पेनच्या कैस्टेलियोन मध्ये झालेल्या ३५ व्या बोक्साम आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताच्या तीन मुष्टियोद्ध्यांना अंतिम फेरीत पोहचल्यानंतरही कोरोनामुळे रजत पदकावर समाधान मानावे लागले होते. अॉल्मपिकसाठी क्वालीफाय केलेला आशिष कुमारचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यासोबत एका रुममध्ये राहणारे मोहम्मद हुसामुद्दीन आणि सुमित सांगवानला सुद्धा अंतिम फेरीतुन माघार घ्यावी लागली. असं मानलं जात की, या खेळाडूंच सुवर्ण पदक जिंकण पक्क होत. केवळ मुष्टियोद्धेच नाही तर दिग्गज बेडमिंटन खेळाडू सानिया नेहवालला सुद्धा कोरोनामुळे अॉल्मपिकसाठी क्वालीफाय करणे अवघड झाले आहे. असं यामुळे की, अनेक बेडमिंटन स्पर्धा एकतर रद्द करण्यात आल्या आहेत तर ज्या शिल्लक आहेत त्यापैकी बहुतेक स्पर्धा रद्दच होतील असं दिसतं आहे.

ज्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत त्यापैकी पाकिस्तान सुपर लिग महत्वाची आहे. या लिग मध्ये सहभागी सहा खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ पैकी एकजण कोविड पॉझिटिव्ह झाल्याने ही स्पर्धा अनिश्चित कालावधीसाठी रद्द करावी लागली. स्थगित झालेल्या स्पर्धांमध्ये युएस ओपन, कॅनडा ओपन बेडमिंटन सोबत अॉल राउंड जिम्नॅस्टिक वर्ल्डकप आणि गोल्फच्या काही महत्त्वाच्या स्पर्धा आहेत. भारताच्या बाबतीत म्हणायचे झाले तर कोविड-१९ रुग्ण संख्येत वाढ झाल्याने या महिन्यात तामिळनाडूच्या नागरकोईल मध्ये होणा-या पुरुष आणि महिलांच्या सिनियर नैशनल वेटलिफ्टिंग चैंपियनशिपला अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आले आहे. ही स्पर्धा १४ ते १७ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा या ठिकाणीच होईल मात्र नवीन तारखांची घोषणा पूढील महिन्यात म्हणजेच एप्रिल मध्ये करण्यात येईल. 

भारत फीका वल्ड कप  क्वालीफायर्सचे शिल्लक तीन सामने कतार मध्ये खेळणार आहे. पूर्वीच्या नियोजनानुसार कतार आणि अफगाणिस्तान विरूद्धचे सामने मायभूमीत तर बांगलादेश विरुद्धचा सामना त्या देशात खेळण्याचे नियोजन होते. जागतिक महामारीमुळे यात बदल करावा लागला. अशात आता झालेल्या बदलामुळे मायभूमीत खेळण्याचा लाभ आता भारताला मिळणार नाही. फुटबॉलचा वेडा देश ब्राझील मध्ये कोरोनामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे की, साओ पाउलो राज्याने व्यावसायिक खेळांवर ३० मार्च पर्यंत बंदी घातली आहे. या निर्णयाचा परिणाम स्थानिक फुटबॉल चैंपियनशिपवर सुद्धा होईल जी दोन आठवड्यांपूर्वीच सुरू झाली होती. याच प्रमाणे भारत आणि अर्जेंटीना तसेच महिला वर्गातील जर्मनी आणि अर्जेंटिना मधील सामने सोडून एप्रिल महिन्यात होणारे हॉकी प्रो लीगचे सर्व सामने कोरोनामुळे रद्द करण्यात आले आहेत. 

              खरंतर आता सर्वांच्या नजरा टोकियो अॉल्मपिकवर खिळल्या आहेत. मागील वर्षी कोरोनामुळे स्थगित झालेल्या या अॉल्मपिक स्पर्धेला या वर्षी २३ जुलैपासून सुरूवात होणार आहे. याच भवितव्य २५ मार्च पासून सुरू होणाऱ्या टॉर्च रिले स्पर्धेच्या यशस्वितेवर अवलंबुन असेल. आयोजकांच्या मतानुसार टॉर्च रिलेचे यशस्वीपुर्ण आयोजन अॉल्मपिकच्या यशस्वीपुर्ण आयोजनाची दशा आणि दिशा निश्चित करेल. कोरोनाने अॉल्मपिकच्या आयोजकांसाठी विदेशी प्रशंसकांवर बंदी आणल्याने आव्हान उभे केले आहे. जापानच्या कित्येक मिडिया रिपोर्ट मध्ये अज्ञात सुत्रांच्या हवाल्यावरुन असं म्हटलं आहे की, टोकियो अॉल्मपिकमध्ये विदेशी प्रशंसकांना प्रवेशाची परवानगी मिळणार नाही. दरम्यान आयोजकांच्या या निर्णयाला विरोधही सुरु झाला आहे. अस यामुळे की, लोकांनी या खेळाच्या तिकिटासोबत हवाई तिकिटे आणि हॉटेल्स सुद्धा बुक केली आहेत. या मुद्दयावर निर्णय काही दिवसात होईलच मात्र यात काही शंका नाही की, कोरोनाचा परिणाम खेळ आणि खेळाडूंवर अद्यापही सुरुच आहे. 

-सुरेश मंत्री.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...