मुख्य सामग्रीवर वगळा

सावधान ! शाळकरी मुलांमध्ये तंबाखूचे व्यसन वाढतेय


 केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जागतिक युवा तंबाखू सर्वेक्षण- २०१९ ची राष्ट्रीय तथ्य जाहीर केली आहेत. हा अहवाल आपले डोळे उघडणारा आहे. आता अगदी लहान शाळकरी मुलं सुद्धा तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी जात असल्याचे यात नमुद करण्यात आले आहे. केवळ हा अहवालच नाही तर अनेक अभ्यास, शोध आणि सर्वेक्षणातून आलेली आकडेवारी आपली चिंता वाढवणारी आहे. तंबाखू व तत्सम मादक पदार्थांचे व्यसन केवळ युवक वर्ग करतात हा आपला भ्रम आपण आता दूर केला पाहिजे. हे सर्वेक्षण २०१९ मध्ये धूम्रपान देखरेख आणि तंबाखू नियंत्रणाबाबत करण्यात आले. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने केलेल्या या सर्वेक्षणाचे निष्कर्ष नुकतेच काही दिवसांपूर्वी जाहीर केले आहेत. 

ग्लोबल यूथ टोबॅको सर्वेने तंबाखूच्या वापराचे वय, अप्रत्यक्ष धूम्रपानाच्या प्रदर्शनाचे वयतंबाखूच्या जाहिराती इ.चा सुद्धा अंदाज लावला आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत १३ ते १५ वर्षांच्या तरुणांचाही समावेश करण्यात आला. हे सर्वेक्षण भारतातील ९८७ शाळांमधील एकूण ९७ हजार ३०२ विद्यार्थ्यांमध्ये करण्यात आले. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत मुंबईतील विज्ञान संस्थेने हे सर्वेक्षण केले. सर्वेक्षणात हे सुद्धा सांगितले आहे की, फक्त ३७.८ टक्के शाळकरी मुलांना तंबाखू वापराच्या हानिकारक परिणामांविषयी शिकवले गेले होते. हे देखील आढळून आले की १९.५ टक्के शाळकरी मुले सामान्यतः शाळेत धूम्रपान करतात जे खूप चिंताजनक आहे. भारतातील तरुणांमध्ये सिगारेटच्या वापराचे सरासरी वय ११.५ वर्षे, बिडी १०.५ वर्षे आणि धूम्रपान रहित तंबाखू वापराचे ९.९ वर्षे आहे. साहजिकच आपल्या १० व्या वाढदिवसाच्या अगोदरच शाळकरी मुले कोणत्या न कोणत्या स्वरुपातील तंबाखूजन्य पदार्थांच्या सहज संपर्कात येत आहेत. भारतातील एकूण ९.६ टक्के मुले आणि ७.४ टक्के मुली तंबाखूचा वापर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात करतात. हिमाचल प्रदेशमध्ये तरुणांमध्ये तंबाखूचे सेवन सर्वात कमी १.१ टक्के आणि अरुणाचल आणि मिझोराममध्ये तरुणांमध्ये तंबाखूचे सेवन सर्वाधिक असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले. तेथे १३ ते १५ वयोगटातील ५.९ टक्के तरुण तंबाखू वापरतात. तंबाखू वापराची सुरूवात ३८ टक्के सिगारेटने, ४७ टक्के विडीच्या धुम्रपानाने आणि ५२ टक्के धुम्रपानरहित तंबाखूचा वापर करण्याने झाली. बरेचशे दुकानदारही त्यांना या पदार्थांची मागणी केल्यावर मनाई करत नाहीत हे सत्य आहे. आता बालपण व्यसनाधिनतेणे कोमेजले जात आहे. 

तंबाखू नियंत्रणाच्या लक्षणीय प्रयत्नांमुळे तरुणांमध्ये तंबाखूचा वापर कमी झाला आहे, परंतु भारतातील तरुणांमध्ये तंबाखूचा एकूण वापर ८.५ टक्के आहे म्हणून आपण समाधानी राहू नये. आपली मुलं खूप वेगाने तंबाखूच्या घातक परिणामांची शिकार होत आहेत. खूप उशिर होण्यापूर्वीच आपल्याला या समस्येला रोखण्यासाठी वेगाने प्रयत्न केले पाहिजेत. अशा परिस्थितीत, तंबाखू आणि सिगारेटवर बंदी घालण्यासाठी अजूनही बरेच प्रयत्न आवश्यक आहेत. सध्या, इलेक्ट्रॉनिक सिगारेट आणि हुक्का पार्लर सारखी उदयोन्मुख उत्पादने एक मोठा धोका निर्माण करत आहेत. शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्डांच्या आत तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तसा मोठ्या अक्षरातील फलक शाळेच्या प्रवेशद्वारावर लावणे बंधनकारक केले आहे. या नियमांचे उल्लंघन करणा-या व्यक्तीविरूद्ध शिक्षापात्र गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र तरीही शाळा-महाविद्यालयाच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ सहज विकत मिळतात ही चिंतनिय बाब आहे. मुलांना सहजरित्या हे मिळत असल्याने मुले त्याकडे आकर्षित होतात. सर्वप्रथम शाळेला लक्ष्य करून तंबाखूमुक्त शाळा हा उपक्रम संपूर्ण देशात प्रभाविपणे राबविण्यात यावा. प्रत्येक शाळेत दर्शनी भागात दिसतील अशी तंबाखूचे दुष्परिणाम दाखवणारी चित्रे लावल्यास नक्कीच याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. तंबाखूजन्य पदार्थ आणि पान मसाला यांच्या आकर्षक जाहिरातींवर कठोर बंदी आणि हुक्का पार्लरवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. अनेक तंबाखू उत्पादक कंपन्या मुलांना आपल्या उत्पादनांकडे आकर्षित करण्यासाठी आपल्या उत्पादनांच्या जाहिराती चित्रपट अभिनेत्यांकडून पान मसाल्याच्या नावाखाली करत आहेत. आजकाल, दुकानाच्या आत आकर्षक तंबाखू जाहिरात फलक लावले जातात, जे थांबवणे आवश्यक आहे. याला दंडनिय अपराध मानले पाहिजे. किशोरांना वाचवण्यासाठी भारतीय तंबाखू नियंत्रण कायदा, इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे. सोबत या कायद्यांमध्ये अनेक त्रुटी आहेत, त्या दूर केल्या पाहिजेत. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने मुलांना मादक पदार्थांच्या वाचवण्यासाठी अधिसूचित औषधे आणि तत्सम पदार्थांच्या औषधी दुकानावरिल विक्रीवर बंदी आणली आहे. तंबाखू नियंत्रण व्यसनमुक्ती अभियानाचा एक भाग बनवणे अत्यावश्यक आहे.

- सुरेश मंत्री. 

     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...