मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ज्येष्ठ अभिनेत्रीचा उचित सन्मान

भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रदान केला जाणार आहे. वहिदा रहमान यांनी ६०–७० च्या दशकात बॉलिवूडवर राज्य केलं. इतकंच नाही तर, वहिदा यांनी १९६४ ते १९६९ या काळात हिंदी सिनेसृष्टीती सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री असा त्यांचा नावलौकिक आहे. त्यांचे चित्रपट आजही प्रेक्षक आवडिने बघतात. अमिताभ बच्चन यांची आवडती अभिनेत्री वहीदा रहमान असून, त्यांनी अनेक चित्रपटात बिग बींच्या आईची भूमिका साकारली आहे. वहिदा रहमान आणि देव आनंद यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. ‘सीआयडी’ पासून ‘गाईड’ पर्यंत या दोघांनी अनेक उत्तम चित्रपट एकत्र केले आहेत. नेमकं देव आनंद यांच्या वाढदिवशी वहिदा यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा झाली याचा आनंद स्वतः वहिदा यांनी व्यक्त केला.                    वहिदा यांचा जन्म जन्म तामिळनाडूतील चेंगलपेट गावात एका उच्चविभूषीत मुस्लीम कुटुंबा...

भारत-कॅनडा मधील वाढता तणाव

 मागच्या काही वर्षांपासून भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडत चालले होते. खलिस्तानी समर्थकांना कॅनडामध्ये आश्रय दिला जातो, हे दोन्ही देशातील संबंध बिघडण्यामागच मुख्य कारण आहे. आता दोन्ही देशातील तणाव टिपेला पोहोचला आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या जी २० परीषदेसाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो भारतात आले होते. कॅनडाला पोहोचल्यावर त्यांनी भूमिका बदली असून भारता विरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली आहे. जस्टिन ट्रुडो यांनी दहशतवादी संघटना खलिस्तानी टायगर फोर्सचा प्रमुख दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्या प्रकऱणी मोठं विधान केलंय. जस्टीन ट्रुडो यांनी सांगितलं की, भारत सरकार आणि खलिस्तानी दहशतवादी निज्जर यांच्या कनेक्शनचा तपास देशाच्या सुरक्षा संस्था करत आहेत. ओटावात हाउस ऑफ कॉमन्सला संबोधित करताना जस्टीन ट्रुडो म्हणाले की, कॅनडाची सुरक्षा संस्था भारत आणि निज्जरच्या हत्या प्रकरणाचे कनेक्शन आहे का याचा वेगाने तपास करत आहे. भारत सरकारचे म्हणणे आहे की कॅनडा आपल्या भूमीवरुन खलिस्तानी कारवायांना आळा घालण्यात अपयशी ठरला आहे. इतकंच नाही तर त्यांना उघडपणे पाठिंबाही दिला आहे. ट्रूडो यांनी केलेल्या आरोपा...

'एक देश एक निवडणूक' किती व्यवहार्य

  केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबरला संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात अतिशय महत्त्वाचा अध्यादेश काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्र सरकार या विशेष अधिवेशनात ‘एक देश एक निवडणूक’ याबाबतचं विधेयक मांडू शकतं. संसदेच्या दोन्ही सभागृहात त्यामुळे या विशेष अधिवेशनाला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची योजना असं या प्रस्तावाचं स्वरूप आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २०१४ मध्ये सत्ता आल्यानंतर एक देश एक निवडणूक याबाबतची चर्चा समोर आली होती. त्यानंतर वारंवार याबाबत चर्चा होत राहिल्या. एक देश एक निवडणूकसाठी भाजप आग्रही आहे. त्यामुळे याचबाबतचा अध्यादेश सरकार आणण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे देशात सर्व निवडणूका या आगामी डिसेंबर महिन्यातच होण्याची शक्यता आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. देशात एकाच वेळी निवडणूका घेण्याचं समर्थन करणा-यांनी दिलेली कारणे आणि खरंच ही कारणे व्यवहार्य आहेत का याचा आढावा घेणारा हा लेख. देशात १९५१-५२ मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली आणि तिच्या बरोबरच सर्व राज्यांमध्ये त्य...

इतिहास घडला... चंद्र कवेत आला

२३ ऑगस्ट हा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरला. भारताचे चांद्रयान-३ मिशन संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर लँड झालं. चांद्रयान-३ लँड होण्याच्या काही दिवसांआधी रशियाचं लुना-२५ हे यान चंद्रावर उतरण्याआधीच कोसळलं. रशियाची मोहिम अपयशी ठरली. जे रशियाला जमलं नाही ते भारताने करून दाखवल. भारतासह जगातील प्रत्येकाच्या नजरा या ऐतिहासिक घटनेकडे लागल्या होत्या. जसजसा लॅण्डिंगचा क्षण जवळ येत होता, तसतशी धाकधूक वाढत गेली... श्वास रोखले गेले... हात जोडले गेले आणि डोळे मिटले गेले... आणि बातमी आली... चांद्रयान-३ मोहीम फत्ते झाली... प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले... आणि मनात आनंदाचे धबधधबे फुलून गेले... "मी यशस्वीपणे चंद्रावर पोहोचलो आहे, आणि माझ्यासोबत संपूर्ण भारत याठिकाणी पोहोचला आहे"; असा आशयाचा संदेश चांद्रयानाने पाठवला आहे. भारताच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या इतिहासात, जिथं जगातलं कुणीच गेलेलं नाही, अशा दक्षिण ध्रुवाच्या उंबरठ्याला भारताने गवसणी घातलीय. त्यामुळे हा क्षण फक्त भारताच्याच नाही तर, अखंड जगाच्या इतिहासात नोंदवला जाणार आहे. १४ जुलै २०२३ रोजी चांद्रयान-३ हे यशस्वी...

भरड धान्य : काळाची आवश्यकता

संयुक्त राष्ट्रांच्या सर्व साधारण सभेने २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. पंतप्रधानांची दूरदृष्टी आणि पुढाकारामुळेच हा संयुक्त राष्ट्रांचा ठराव जगभरातील ७० हून अधिक राष्ट्रांच्या पाठिंब्याने स्वीकारला गेला. शाश्वत शेतीमध्ये भरड धान्याची महत्त्वाची भूमिका तसेच स्मार्ट आणि सुपरफूड म्हणून त्याचे फायदे याबद्दल जगभरात जागरूकता निर्माण करण्यात त्यामुळे मदत होईल. भरड धान्ये सुमारे १३१ देशांमध्ये घेतली जातात. आशिया आणि आफ्रिकेतील सुमारे ६० कोटी लोकांचे हे पारंपरिक अन्न आहे. आशियातील ८० % पेक्षा जास्त भरड धान्याचे उत्पादन भारतात होते. १७० लाख टनांहून अधिक उत्पादनासह भारत भरड धान्याचे जागतिक केंद्र बनण्याच्या तयारीत आहे.                                                                              ज्वारी , बाजरी , नाचणी , भगर , राळ ,...

बेपत्ता महिला व मुलींची वाढती संख्या चिंताजनक, सक्षम यंत्रणा व जनजागृतीची गरज

तुम्ही देशातील कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये गेलात तर बाहेर दारावरच्या बेपत्ता असलेल्या लोकांची माहिती नजरेस पडते. मात्र, ते पाहून देशात आणि महाराष्ट्रात बेपत्ता असलेल्यांची संख्या किती मोठी आहे याचा अंदाज येत नाही. एनसीआरबीच्या एका अहवालानुसार, २०२१ या वर्षात देशातील सुमारे ४ लाख महिला तर ९० हजाराहून अधिक मुली बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा अद्यापही शोध लागलेला नाही. ही आकडेवारी जरी २०२१ ची असली तरी सद्यस्थितीत यामध्ये फारसा बदल नसून, कदाचित महिला बेपत्ता होण्यात वाढ झालेली असणार आहे. २०१९, २०२० आणि २०२१ या तीन वर्षांमध्ये मुली आणि महिला हरवण्याच्या प्रकरणांची सर्वाधिक नोंद झाली आहे. विशेष म्हणजे या तीन वर्षांमध्ये इतर राज्यांपेक्षा मुली आणि महिला बेपत्ता होण्याच्या सर्वाधिक प्रकरणांची मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये नोंद झाली आहे. बेपत्ता महिला व मुलींची ही संख्या तर डोळ्यात अंजन घालणारी आहे. महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना या नव्या नाहीत. राज्यातील विविध भागांमधून महिला अत्याचाराच्या घटना समोर येत असतात. पोलीस महिला अत्याचाराच्या घटनांवर आळा घालण्या...

हवालदिल नेते आणि गोंधळलेले मतदार

पूर्वी राजकारणाला त्यागाचे अधिष्ठान होते, आता ते भोगाचे झाले आहे. आजची राजकीय परिस्थिती अशी झाली आहे की, ‘राजकारण आणि राजकारणी’ हे दोन्ही इतके बदनाम झाले आहेत की, त्यांचा वापर शिवीसारखा होऊ लागला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या झालेली उलथापालथ जाहीरपणे हेच सिद्ध करते की, भाजप सत्त्ता उपभोगण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. शिवसेना पक्षात फुट घडवुन आणुन भाजपने सत्ता स्थापित केली असल्याची घटना ताजी असतानाच त्यात भरीस भर म्हणून राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी सत्तेत सहभाग घेतला. महाराष्ट्रातील राजकारणाला लागलेले हे अनपेक्षित वळण निश्चितच भाजपच्या छुप्या हेतुबद्दल चिंता दर्शविते. मोदींनी गेल्या नऊ वर्षात जे पेरले त्याला कोमारे फुटले आहेत. राहुल गांधींच्या खालुन वर झालेल्या पायपीटीने मोदींच्या पायाखालची वाळु घसरली आहे. बिहार आणि कर्नाटकात भाजपची पिछेहाट झाली. मोदींच्या एकहाती सत्तेच्या विरोधात अनेक प्रादेशिक नेत्यांनी हातात हात काय घेतला, मोदींची सदर थरथरताना दिसत आहे. मोदींची आश्वासने, फसलेली नोटबंदी, वाढता धार्मिक तणाव, वाढत्या दंगली, जळते मणिपुर आता राष्ट्रीय चैतन्याचे भांडवल होवून ब...