२०१८ चा ६ सप्टेंबर
हा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहायला पाहिजे. यासाठी नाही की,या दिवशी सवर्णांनी एससी/एसटी कायदयाच्या विरोधात
भारत बंद केला होता. सर्वोच्च न्यायालयाने मार्च महिन्यातच सांगितले होते की, अनुसुचित जाती आणि जमातीच्या अत्याचार निवारण
कायद्याअंतर्गत होणा-या गुन्हयात आरोपीला वरिष्ठ पोलीस अधिका-याच्या परवानगी वा
प्राथमिक तपासानंतरच अटक करता येईल मात्र संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र
सरकारने वटहुकुम आणला आणि अगोदरच कायदा निश्चित केला. सवर्णांना हा अन्याय
वाटल्याने सरकारच्या या वटहुकुमाच्या विरोधात भारत बंद होता.
या दिवशी एकीकडे
भारत बंद होता तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकांना समाजाची दारे उघडून
दिली. अशा समाजाची ज्यात याच समाजाचा एक हिस्सा गुलाम बनून राहिला होता. नव्हे तो
समाजाचा भागच नव्हता.समाजाने यांना तर कधी आपल मानलच नव्हत. समाजाला वाटत की हे
निसर्गाच्या विरोधात आहे. म्हणून त्यांनी स्वत:ला लपवून ठेवले
पाहिजे. यांना तर तो समाज पाहिजे ज्यात बलात्कारी, खुनी, लुटमार करणारे आणि दुस-यांचा हक्क हिरावून घेणारी
सन्मानीत पुरुष आहेत जी उच्च पदावर बसतात. यांना तर तो समाज पाहिजे जिथे जातीच्या
आधारावर हे निश्चित केले जाते की, कुणी अस्वच्छतेची
कामे केली पाहिजेत, कुणी खुर्चीवर बसाव आणि कुणी त्यांच्या पायाजवळ. हा
तोच समाज आहे जो निसर्गाची पुजा तर करतो मात्र याच निसर्गाचा एक भाग असलेल्या
समलैंगिकांबद्दल संकुचित भावना ठेवतो.या समाजाला स्त्रीवर होणारे बलात्कार दिसत
नाहीत, होणारे खुन दिसत नाहीत तर याच तथाकथित समाजात
अब्रु जाईल म्हणून घरातील बलात्काराची शिकार झालेल्या स्त्रीचे तोंड बंद केले जाते.
सर्वोच्च
न्यायालयाने समलैंगिकतेला मान्यता दिल्यानंतर सर्व काही ठिक झाल असत तर ठिकच झाल
असत मात्र निर्णय आल्यानंतर सुद्धा समाजाने कायद्यापासून मुक्त झालेल्या या गटाला
शिव्या द्यायला सुरुवात केली. असे शब्द लिहिले गेले जे भांडण झाल्यानंतर एक पुरुष
दुस-याच्या आई-बहिणी विषयी उच्चारतो. माणूस आपल्या दु:खाने त्रस्त होत नाही तर
दुस-याला सुखी बघून त्याला त्रास होतो. सवर्णांच्या भारत बंद मध्ये हे नाही दिसले
की, त्यांचे दु:ख काय आहे तर हे दिसले की, त्यांना दलितांच्या सुखात दु:ख आहे. जर आपण
दलितांना तुच्छ्तेच्या नजरेने बघीतले नाही तर कायदा आपले काय बिघडवेल? खुन, लुटमारी
करणा-यांच्या विरोधात किती तरी कायदे बनले आहेत मात्र आपण ना लुटमार केली ना खुन
तर मग आपल्याला भिती कशाची? आपण
खोट्या आरोपाखाली फसवले जावू या भितीने जर हे कायदेच संपुष्टात आणण्याची मागणी करत
असू तर मग खुनी आणि लुटमार करणारे सुद्धा बेलगाम होवून जातील. अशाच पद्धतीने
एस्सी/एसटीचे शोषण करणारे सुद्धा बेलगाम होवून जातील त्यामुळे दलित तुच्छ असतात ही
युगानुयुगे चालत आलेली समाजाची विचारधारा बदलणार नाही. त्यांना माणुस समजल जाणार
नाही.
असच समलैंगिकांबद्दल आहे.जर त्यांना सामाजिक
मान्यता मिळाली नाही तर त्यांना माणुस म्हणून नाही तर सर्व समलैंगिकांना तृतीयपंथी
म्हणून समजल जाईल. आजही आपला मीडियासुद्धा फक्त तृतीयपंथीयांना दाखवण्यात व्यस्त
असतो.टाळ्या वाजवत हाय-हाय करणा-या लोकांना दाखवल जात जेंव्हाकी समलैंगिकात गे,लेस्बियन, बायसेक्स्युअल, क्वीर
सुद्धा असतात. यापैकी काही चांगल्या घरातील सुद्धा असू शकतात.शिकलेले, नौकरीपेशा लोक असू शकतात. डॉक्टर, इंजीनीअर असू शकतात
मात्र यांना तर सहानुभूतीसाठी रेडलाईट भागात टाळ्या वाजवणारे तृतीयपंथीच दिसतात.
आता यांना कायद्याची मान्यता मिळाल्याने ती मोकळेपणाने
जगू शकतील. आपल्या आसपास राहतील. यामुळे ही अपेक्षा जागते की, काही तरी बदलेल.नाहीतर आत्तापर्यंत आपल्या कुटुंबात तृतीयपंथीयापासून दूर
रहा हेच शिकवल जायच. ते अश्लील असतात, नाराज झाले तर कपडे
काढतात हेच सांगितले जायचे. एवढच काय जर कुणी मुलाने सैल--ढिल्ले कपडे घातले तर त्याला
तृतीयपंथी म्हणून चिडवल जात कारण यांच्या नजरेत तृतीयपंथी ही एक शिवी आहे. तो माणुस
नाही.एखाद्या मुलाच चालण बदलल,त्याचा आवाज नाजुक असला की
त्याला मुलीची उपमा दिली जाते. असच काहीस मुलींच्या बाबतीतही होत.
सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकतेला मान्यता दिली
आहे मात्र समाजाची विचारधारा या बाबतीत बदलणे ही दूरची गोष्ट आहे कारण आता तर कुठे
देशात शौचाला कुठ बसल पाहिजे हे शिकवल जात आहे. अशात समलैंगिकतेबद्दल विचारधारा
तात्काळ कशी बदलेल? जाती घटना बनल्यापासून आजपर्यंत
सन्मानासाठी संघर्ष करित आहेत. या नव्या समलैंगिकांच्या जातीलाही संघर्ष करावाच
लागेल. खुलेपणाने लोकात रहावे लागेल.यांच्या राहण्या, खाण्या
आणि पेहरावाच्याबाबतीत अडचणी येतील मात्र घाबरण्याची गरज नाही कारण या अडचणी तर
जातीच नाही तर धर्माच्या सोबत सुद्धा येत आहेत. कुठ जाती वा धर्माच्या आधारावर रहायला
घर मिळत नाही. कुठ खाण्यावरून जमाव खून करतो.हा लेख एक प्रयत्न आहे. जर आपण
स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आहात तर दुस-यांना सुद्धा सांगा.केवळ शिव्या देण्याने
काहीच मिळणार नाही. त्या शिव्या देणा-याच अस्तित्व किती आहे ते दाखवतात. समोरच्याच
यामुळ काहीच बिघडत नाही. स्वतंत्र रहा आणि स्वतंत्र राहु द्या. तुम्ही जे आहात ते
रहा. जे बनू ईच्छीता ते बना मात्र कुणावर बंदी आणू नका.आपण ज्या समाजात जगता तो
समाजही सुखी राहिल.
-सुरेश मंत्री.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा