मागिल काही दिवसात दिल्ली आणि काही अन्य विधानसभा निवडणूकांचे निकाल जर बघितले तर हे प्रश्न निर्माण होतात की,काँग्रेसचे स्थान प्रादेशिक पक्षांनी घेतले आहे?भाजपाचा सामना करण्यासाठी प्रादेशिक पक्ष अधिक सक्षम आहेत का आणि त्यांना निवडणूकीच्या मुद्दयांची अधिक चांगली माहिती आहे?लोकांनी आता काँग्रेसची साथ सोडली आहे?गांधी परिवाराची जादू आता संपली आहे?काँग्रेसने कधीच प्रादेशिक पक्षांना किंमत दिली नाही.एक काळ असा होता ज्यावेळी काँग्रेसला संपूर्ण देशात मोठा जनाधार होता.आता याच काँग्रेसला प्रादेशिक पक्षांचा आधार घ्यावा लागत आहे.काँग्रेसचे स्थान आता भाजपाने घेतले आहे का?नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या सुरूवातीलाच काँग्रेसने जणू आपला पराभव स्विकारला होता.तिला तिथे सलग दूस-यांदा एकही जागा जिंकता आली नाही.भाजपाने मात्र शेवटपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले.भाजपा कुठे जिंकत आहे तर कुठे तिला मोठया पराभवाला सामोरे जावे लागत आहे.मात्र ती देशातील अधिकाधिक राज्यात लढताना दिसत आहे.भारतीय राजकारणात झालेला हा खूप मोठा बदल आहे.
राजकारणाच्या रणांगणात अनेक रथी-महारथी आले आहेत,जे रस्त्यावर येवून लोकांसाठी संघर्ष करत आहेत,आपल्या राजकिय विरोधकांशी लढत आहेत.यातील अरविंद केजरिवाल सारख्या काही नेत्यांना एवढे यश मिळाले आहे की,त्यांना तेवढयाच ताकदीने प्रतीउत्तर देणारा नेताच राज्यात शिल्ल्क राहिला नाही.प्रत्येक ठिकाणी हे प्रादेशिक पक्ष भाजपाला कडवी झुंज देत आहेत.दिल्ली विधानसभा निवडणूका नंतर हे स्पष्ट होते की,काँग्रेस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकात प्रियंका गांधींच्या प्रचारानंतरही काँग्रेसचा सफाया झाला तर दिल्ली मध्ये त्यांच्या ६३ पेक्षा अधिक उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले,हे आश्चर्यजनक नाही का?
देशाच्या राजकारणात मोठा बदल होत आहे याकडे अलीकडील निवडणूकांचे निकाल ईशारा करतात.आत्ताही देशातील १२ राज्यात प्रादेशिक पक्षांची सत्ता आहे.मागिल दोन वर्षात भाजपाने अर्ध्या डझन राज्यात आपली सत्ता गमावली आहे.मात्र तरीही केंद्रामध्ये भाजपा मजबुत आहे.नरेंद्र मोदींना राष्ट्रीय स्तरावर कडवे आव्हान उभे करेल अशी क्षमता आजतरी एकाही विरोधी नेत्यात नाही.भाजपाने दिल्ली विधानसभा निवडणूकात मोठा पराभव हाती आल्यानंतर आपला पराभव स्विकारताना आपाला जनाधार बराच सुरक्षित ठेवल्याचे म्हटले आहे.
काँग्रेस मात्र प्रत्येक ठिकाणी परावलंबी होत आहे.महाराष्ट्रात शरद पवार आणि झारखंड मध्ये हेमंत सोरेन यांच्या कृपेमुळे काँग्रेसला जागा मिळाल्या.ज्या-ज्या राज्यात स्थानिक प्रादेशिक पक्षांची साथ मिळाली ते राज्य सोडता अन्य ठिकाणी काँग्रेसला जबरदस्त हार पत्करावी लागली.भाजपाला पर्याय म्हणून आता काँग्रेसकडे बघून चालणार नाही.त्यांची जागा आता प्रादेशिक पक्षांनी हिसकावून घेतली आहे.
जम्मु-काश्मीर,महाराष्ट्र,दिल्ली,तेलंघाणा,उत्तर प्रदेश,आंध्र प्रदेश पासून तामिळनाडू पर्यंत काँग्रेसची हिच अवस्था आहे.उत्तर प्रदेश मध्ये लोकसभा निवडणूकीदरम्यान काँग्रेसला असे वाटले की,तिथे ती भाजपाला मजबुत पर्याय म्हणून उभा राहु शकेल,मात्र हा तिचा भ्रम ठरला.होता तोही जनाधार तिथे काँग्रेसला गमवावा लागला.आज काँग्रेसकडे ना चिंतन आहे,ना निर्णय घेण्याची क्षमता आहे.काँग्रेस नेतृत्वहिन झाली आहे.दिल्ली मध्ये आपच्या झाडूने भाजपा आणि काँग्रेसचा सफाया केल्यानंतर काँग्रेस आपल्या पराजयावर चिंतन करण्याऐवजी उलट अरविंद केजरीवाल यांचे गुणगान करण्यात गुंतली आहे.भाजपाचा सामना करणारे काँग्रेसी नेते कमी आणि शरद पवार,अखिलेश यादव,हेमंत सोरेन,चंद्रशेखर राव,ममता बॅनर्जी,अरविंद केजरिवाल,एम.के.स्टॅलिन सारखे नेते अनेक,ही गोष्ट काँग्रेसी नेत्यांना सतावणारी आहे.या नेत्यांमध्ये प्रतिकुल परिस्थितितही भाजपाशी दोन हात करण्याची क्षमता आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणूकांच्या काही महिन्यांपूर्वी काँग्रेसने राजस्थान,मध्य प्रदेश आणि छ्त्तीसगड ही राज्ये भाजपाकडून हिरावून घेतली होती.यामुळे गैर भाजपा पक्षांमध्ये लोकसभा निवडणूकीत मोदी सत्तेचा अंत होणार असा विश्वास जागा झाला होता.मात्र यानंतर काही महिन्यानंतर झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत याच राज्यांमध्ये काँग्रेसला दारूण पराभव स्विकारावा लागला.कोण्या राज्यात एवढया छोटया अंतराने एखादया सत्तारूढ पक्षाच्या विरोधात मोठा जनादेश निर्माण होणे ही बाब क्वचितच दिसून येते.काँग्रेसचे नेता आता गांधी-नेहरू परिवाराचे आश्रित झाले आहेत.या परिवाराविना काँग्रेस ना चालू शकते,ना मजबुत होवू शकते असे त्यांना वाटत आहे.
काँग्रेसच्या ज्या नेत्यांमागे मजबुत जनादेश आहे ते काँग्रेसला सोडून गेले आणि राहिले ते केवळ गांधी परिवाराच्या प्रति निष्ठा दाखवण्यात धन्यता मानत आहेत.लोकशाही मध्ये विरोधी पक्षही तेवढाच प्रबळ असायला हवा.काँग्रेसला जर भाजपाशी प्रबळ निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी स्थानिक प्रादेशिक पक्षांवर विश्वास ठेवायला हवा.निवडणूकीच्या मैदानात तोच बाजी मारून जाईल,जो सतत लोकहिताचे मुद्दे घेवून मैदानात उतरेल.
भाजपाचा सामना करणा-या शरद पवार,अखिलेश यादव,हेमंत सोरेन,चंद्रशेखर राव,ममता बॅनर्जी,अरविंद केजरिवाल,एम.के.स्टॅलिन सारख्या नेत्यांवर नजर टाकली तर हा प्रश्न निर्माण होतो की,केंद्रात भाजपाची जागा घेण्याची ईछाशक्ती या नेत्यांमध्ये आहे का?यांचा संबंध संपूर्ण देशाच्या राजकारणाशी आहे,की ते केवळ आपापल्या राज्यात सत्ता स्थापन करू ईच्छितात.अस तर नाही ना की,ते प्रादेशिक सत्ता टिकवून ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर भाजपाला मंजुरी देण्याचा खेळ खेळत आहेत?हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण येत्या काही दिवसांमध्ये भाजपाला राष्ट्रीय पर्याय असण्याची गरज खूप प्रकर्षाने जाणवेल.काँग्रेसच्या अनुपस्थितीत ही गरज प्रादेशिक पक्ष मिळुन पूर्ण करू शकतील?जर त्यांना हे करायच असेल तर विदेश धोरण,अर्थ धोरण,संरक्षण,नागरिकता,गृह धोरण,बेरोजगारी,वाढती महागाई यासारख्या राष्ट्रीय मुद्दयांपासून ते फार काळ पाठ फिरवू शकणार नाहीत.
-सुरेश मंत्री
संपर्क- ७०२००३३०८५

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा