मुख्य सामग्रीवर वगळा

आपली परंपरा आणि क्वारंटाईन

जगात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे.त्यामुळे संपूर्ण जगच जणू काही ठप्प झालय.उपचारापेक्षा प्रतिबंध हाच चांगला उपाय म्हणून जगातील सगळे लोक आपापल्या घरात बसले आहेत.अर्थात प्रत्येकाने स्वत:ला क्वारंटाईन केल आहे.कोरोना महामारी सोबत क्वारंटाईन हा शब्द जो काही काळापूर्वी आपल्याला माहित नव्हता तो सगळीकडे प्रचलित झाला आहे.नव्या पिढीसाठी क्वारंटाईन ही पद्धत नवखी असेल मात्र जगात हिचा वापर फार पूर्वी पासुन होत होता,अगदी आपल्या भारतीय संस्कृतीत सुद्धा.आपल्या परंपरेत संक्रामक रोगांपासून वाचण्याचा योग्य आणि खात्रीशीर उपाय स्वत:ला दूस-यांच्या शारीरिक संपर्कापासून वेगळे ठेवणे हाच राहिला आहे.रोगी आणि निरोगी,दोघांना रोगापासून बचाव आणि आपले आरोग्यहिताच्या दृष्टीने एक उपाय म्हणून क्वारंटाईन मान्यताप्राप्त आहे.
विज्ञानाच्या भाषेत प्रतिबंध हा उपचारापेक्षा योग्य पर्याय आहे.कोरोनावर तर सध्यातरी कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नसल्यामुळे केवळ प्रतिबंध हाच उपचार आहे.त्यामुळेच जगातील जवळपास ९० देश मागिल अनेक दिवसांपासून लॉकडाऊन आहेत.रस्ते निर्मनुष्य आहेत,प्रत्येकाने स्वत:ला क्वारंटाईन केल आहे.भारतीय जीवनशैलीत हजारो वर्षांपासून जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रचलित सूतक हेच आत्ताचे क्वारंटाईन आहे.क्वारंटाईन हा मुळ लॅटीन भाषेतील शब्द आहे.तसंतर शब्दकोशांनुसार याचा शाब्दीक अर्थ चाळीस असा आहे पण व्यावहारिक अर्थ संक्रामक रोगाने ग्रासित वा अशा रोग्याच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या बाहेर फिरण्यावर,ईतर लोकांच्या संपर्कात येण्यावरिल प्रतिबंध हाच घेतला जातो.
         शंभर वर्षांपूर्वी जल वाहतुक हाच लोकांच्या येण्या-जाण्याचा आणि व्यापाराचा प्रमुख मार्ग होता.ज्या जहाजांवर गंभीर रोगाने ग्रासलेल्या व्यक्ती किंवा त्यावर लादलेल्या मालामध्ये गंभीर रोगाचे रोगजंतु असण्याची सुचना मिळायची वा शंका असायची त्या जहाजाला ४० दिवसांपर्यंत बंदरात यायला मनाई केली जायची.समुद्रामध्ये नांगर टाकुन उभा असलेल्या अशा जहाजावरिल संक्रमित रोग्याची पूर्ण तपासणी आणि जहाजाला रोगजंतु मुक्त केल्यानंतरच बंदरात आणले जात असे.क्वारंटाईनच्या या ४० दिवसांच्या काळात त्या जहाजाला समुद्र तटापासून दूरच वेगळे रहावे लागे.
क्वारंटाईनची सुरूवात ब्रिटन मध्ये प्लेगची साथ पसरल्यानंतर झाली होती आणि आता याला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे.दोन देशांच्या जलसीमांवर क्वारंटाईन झाल्यानंतरच एक-दूस-याच्या जलसीमेत जहाजाला प्रवेश देण्याची तरतुद आहे.जहाजाचा कप्तान तपासणीच्या वेळी जहाजावरिल सर्व यात्री,कर्मचारी किंवा माल रोगमुक्त असल्याचे प्रमाणपत्र सादर करतो.जर त्याने सत्य लपवले तर जहाजाच्या कप्तानाला कडक दंड देण्याची तरतुद आहे.ज्या जहाजावर संक्रमित रोगी किंवा माल असतो त्यावर क्वारंटाईनची अवधी संपेपर्यंत पिवळा झेंडा फडकवला जातो,जो ईतर जहाजांना स्वत:पासून दूर राहण्याचा आणि क्वारंटाईन मध्ये असल्याचा सूचक आहे.हवाईयात्रे संबंधीही असेच नियम आहेत.अनेक देशांमध्ये संक्रामक रोगांची लस घेतल्यानंतरच यात्रेकरूंना प्रवेश करण्याची परवानगी आहे.
विसाव्या शतकाच्या सूरूवातीला महात्मा गांधी पत्नी कस्तुरबा आणि दोन मुलांसोबत ४४ दिवस समुद्री वादळाला झेलत दक्षिण आफ्रिकेतील डरबनला पोहचले तेंव्हा त्यांना सुद्धा क्वारंटाईन अंतर्गत जहाजावरून खाली उतरू दिले गेले नव्हते.इंग्रजांनी भारतात प्लेगची साथ पसरल्यानंतर दक्षिण आफ्रिकेत पोहचलेल्या महात्मा गांधीजींना क्वारंटाईन मध्ये टाकले.गांधीजींनी संक्रामक रोगाचा प्रतिबंध म्हणून वापरल्या जाणा-या या क्वारंटाईन पद्धतीचा स्विकार केला आणि मोठया धेर्याने एकांतवासात राहिले.अशा पद्धतीने दुस-यांदा गांधीजींना दक्षिण आफ्रिकेत प्रवेश मिळु न देण्याचा इंग्रजाचा कट यशस्वी झाला.
भारतीय जीवन शैलीत बाळाचा जन्म झाल्यानंतर सूतक लागु करून नवजात बालक आणि त्याच्या आईला एक महिन्यापर्यंत क्वारंटाईन मध्ये ठेवण्याची प्रथा आजही प्रचलित आहे जेणेकरून नवजात बाळ आणि त्याची आईला संक्रामक रोगांपासून वाचवता येईल.या काळात नवजात बाळाला औषधीयुक्त पाण्याने स्नान घालुन शुद्धीकरण केले जाते.या संपूर्ण क्वारंटाईन महिन्यात माता आणि बाळाचे जेवण आणि सर्वकाही वेगळे केले जाते.अशाच पद्धतीने मृत्यू नंतर  १० ते १२ दिवस सूतक पाळण्याची आपली परंपरा आहे.मृतकाच्या शवात रोगजंतु असु शकतात.त्यामुळे अंतिम क्रिया करणा-या व्यक्तीने १२ दिवस घरातील वेगळ्या खोलीत राहणे,ज्या कुटुंबात मृत्यू झाला आहे त्या कुटुंबाशी १२ दिवस कमीत-कमी संपर्क ठेवणे,त्याच्या कुटुंबीयांनी समाजात या कालावधीत न मिसळणे म्हणजेच सूतक आवश्यक मानले जाते.या काळात मृतकाच्या घरात धार्मिक पूजा करणे वर्जित असते.,तसेच त्यांच मंदिरात,सार्वजनिक उत्सवात,लग्नात जाणेसुद्धा वर्जित असते.ज्या घरात मृत्यू सूतक असते त्या घरातील अन्न-पाणी लोक ग्रहण करत नाहीत.यामागे संक्रामक रोगापासून बचाव हेच शास्त्रीय कारण आहे.
गंभीर आजार असलेल्या व्यक्तीला स्व्तंत्र ठेवणे आणि त्याची सेवा-श्रुषा करणा-या व्यक्तीला अन्य लोकांपासून दूर राहण्याची ताकीद देणे याचे पालन करणे भारतीय जीवनशैलीत अनिवार्य आहे.आजारी व्यक्तीचे कपडे आणि अंथरून बदलत राहणे आवश्यक आहे.तसेच पुजाविधी करताना धुतलेले स्वच्छ कपडे घालणे आवश्यक आहे.
पाश्चिमात्य संस्कृती नुसार हात मिळवून अभिवादन आणि स्वागत करण्याऐवजी हात जोडुन अभिवादन आणि स्वागत करण्याची आपली भारतीय संस्कृती स्विकारण्यासाठी संपूर्ण जग कोरोनाच्या या महामारीत विवश झाल आहे.हात-पाय धुवुनच पुजाविधी,जेवण करण्याची प्रक्रिया दैनंदिन जीवनात सर्वमान्य आहे.कोरोनाच्या या जागतीक संकटात भारतीय संस्कृतीची महत्ता संपूर्ण जगाच्या लक्षात पुन्हा एकदा आली आहे.
-सुरेश मंत्री


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...