कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टेंसिंग राखणे खूप महत्वाचे झाले आहे.अशा काळात आपण घरामध्ये बंद असताना सोशल मीडिया हा समाजाशी जुडण्याचा एकमेव आधार झाला आहे.भारतात कोरोनाविरूद्ध युद्ध सुरू झाल्यानंतर अगदी सुरूवातीला अनेक महाभागांनी सोशल मीडिया मार्फत समाजात अफवा,सामाजिक व्देष निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र सरकारने याची दखल वेळीच घेतल्याने या महाभागांच्या आसुरी आनंदावर जणू पाणी फेरले गेले.सर्वांकडे सध्या खूप फावला वेळ असल्याने सोशल मीडियावर खूप लिहिल जात आहे.कोणी कोरोनावर कविता केल्या,कोणी लॉकडाऊन मधिल आपले अनुभव शेअर केले तर कोणी यापूर्वी जगात आलेल्या नैसर्गिक आपत्तींविषयी लिहिल.अशातच आता नविन ट्रेंड सोशल मीडियावर आला आहे तो म्हणजे विविध प्रकारचे चॅलेंज देण्याचा.कुणा महिलेकडे साडी चॅलेंज आहे तर कुणाकडे जोडी चॅलेंज.मग यात पुरूषही कसे मागे राहतिल बरे.त्यांच्यातल कोणी दाढी चॅलेंज देत आहे तर कोणी गॉगल चॅलेंज.दिवसभर सोशल मीडियावर असच काहीस सुरू असत.अर्थात यामागे कुणाला हानी पोहचविण्याचा उद्देश नसून केवळ आणि केवळ मनोरंजन हाच आहे.मात्र कोरोनाच्या या अभूतपूर्व संकटात सोशल मीडियाचा वापर केवळ मनोरंजन म्हणून करणे योग्य आहे का? हा प्रश्न महत्वाचा आहे.
नक्कीच काही जणांना लॉकडाऊनचा हा काळ मनोरंजनासारखा वाटतोय.आपण दिवसभर घरात आहोत,विशेष अस काही काम नाही.अशात आपण आपला वेळ एकतर टि.व्हि.पाहण्यात घालवतोय किंवा फेसबुक,ट्विटर वर आपण सक्रिय आहोत.कोणी महिला घरात बनवलेल्या नविन पक्वान्नाचे ताट सजवून फेसबुक वर पोस्ट करतेय तर कोणी पुरूष घरात स्वयंपाक बनवत असल्याचे फोटो पोस्ट करण्यात धन्यता मानतोय.मात्र आपण हे लक्षात घेतले पाहिजे की,फेसबुकची तुलना व्हॉटसअॅप ग्रुपसोबत होवू शकत नाही.यावर टाकलेली प्रत्येक पोस्ट केवळ कुटुंबियांपर्यंतच मर्यादित राहू शकत नाही.त्यावर मिळालेल्या लाईक आणि कॉमेंटसमुळे ती दूर पर्यंत पोहचते.त्यामुळे सध्याच्या काळात घरात बनवलेल्या विविध पक्वान्नांचे फोटो फेसबुकवर पोस्ट करणे ही बाब आपली असामाजिकता दर्शवत नाही का?कारण लॉकडाऊनमुळे देशातील मोठया वर्गाच्या दोन वेळेसच्या भाकरीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.तो आपल पोट भरण्यासाठी संघर्ष करतोय.कधी लांबलचक रांगेत उभा राहून तर कधी पोलीसांच्या लाठया खावून.
ही आत्ममुग्धतेच्या प्रदर्शनाची वेळ निश्चितच नाही.नाही ही वेळ कोरोनाच्या महामारीला धार्मिक वा राजकिय रंग देण्याची आहे.महामारी न धर्म पाहते न राजकिय पक्ष.तरीपण कोरोनाच्या या जागतिक संकटात टि. व्ही चैनल आणि सोशल मीडियावर तू-तू,मी-मी सतत सुरू आहेच.व्हाटसअॅपवर तर कोरोनावरिल कथित उपचारांच्या पोस्टचा भडिमार होत आहे.प्रत्येक जण जणू डॉक्टर बनला आहे.
एकीकडे विविध प्रकारचे चॅलेंज तर दूसरीकडे अफवा काही थांबण्याच नाव घेत नाहीत.टाळी-ताट आणि दिवे-मेणबत्यांनी कोरोनाविरुद्ध लढाई जिंकण्याचे दावे काही थांबत नाहीयेत.टाळया वाजवण्याची,दिवे लावण्याची गोष्ट आता खूप जुनी झाली आहे,मात्र आजही याची वैज्ञानिकता सिद्ध करणारे तर्क आजही मोबाईल ते मोबाईल प्रवास करतच आहेत.काळ असा आला आहे की,आपण या मुद्दयांवर कोणाशी ना वाद घालू शकतो न कोणावर टिका करू शकतो.तर्काचे उत्तर कुतर्काने देण्यातच लोक आपली धन्यता मानतात.सोशल मीडिया मार्फत मिळणारे ज्ञानच त्यांच्यासाठी अंतिम सत्य आहे.सगळे मिळून अंधारात गोळ्या झाडत आहेत.मग ही गोळी स्वत:मार्फत का झाडली गेली असेना,चिंता नाही.
याच वाईट तेंव्हा अधिक वाटत जेंव्हा स्वत:ला बुद्धीवंत म्हणणारा हा वर्ग सुद्धा अशा प्रकरात सहभागी होतो.फेसबुकवर-ट्विटर वर चालु असलेले साडी,जोडचॅलेंज तथाकथित फेमीमिस्टांची देन आहे.अशा चॅलेंजचा विरोध करणे ही बाब ‘महिला विरोधी’ होईल.मात्र पुरूष तरी कुठे मागे आहेत.त्यांच्याकडे दाढी चॅलेंज आहेच ना.आपण एक लक्षात घेतल पाहिजे की,सोशल मीडिया हे सामाजिक क्रांतीचे सशक्त माध्यम आहे.कोरोना विरूद्धच्या या युद्धात एकटेपणा कमी करण्यासाठी आणि हे युद्ध सोपे करण्यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियाचा वापर करण्याचा शुद्ध उद्देश या मागे असेलही मात्र प्रश्न हा निर्माण होतो की,हे युद्ध आणखीन चांगल्या पद्धतीने लढण्यासाठी सोशल मीडियाचा वापर अधिक प्रभावीपणे नाही का करता येणार?असा उपयोग जो आपली सकारात्मकता वाढवेल सोबत दोन धर्मातील वाढत चाललेली दरी कमी करून त्यांना एकमेकांच्या जवळ आणेल.कुणाला आपल्या वर्तमानकालीन अवस्थेची चेष्टा केली जात आहे अस वाटणार नाही.जो पर्यंत अशी पद्धत सुचत नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या चॅलेंजेसला तरी निदान आपण टाळु शकतो.सोशल मीडियाचा कोरोना विरूद्धच्या युद्धात आपण प्रभावीपणे वापर जरी करू शकत नसलो तरी एवढही केल तरी पुरेस आहे.चला तर मग,कोरोना विरूद्ध युद्ध लढत असताना आपण कोणतीही पोस्ट खात्री केल्याशिवाय फॉरवर्ड करणार नाहीत,अजानतेपणी का होईना आपल्या मार्फत अफवा पसरविली जाणार नाही,दोन वेळेसच्या भाकरीची भ्रंत असणा-यांची भावना दुखावली जाणार नाही याची काळजी घेवु या.सोशल मीडियाचा वापर करताना सामाजिक भान राखु या.
-सुरेश मंत्री.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा