मुख्य सामग्रीवर वगळा

कमला हॅरिस यांची उमेदवारी ट्रंपसाठी डोकेदुखी

 

मेरिकेत डेमोक्रेटिक पक्षाकडून भारतीय वंशाच्या कमलादेवी हॅरिस यांना उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी देण्यात आली आहे ही एक ऐतिहासिक घटना आहे. जर आपण असं मानून चाललो की,नोव्हेंबर मध्ये होणा-या राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत बाइडन आणि कमला हॅरिस विजयी होतीलच आणि जर डेमोक्रेटिक पक्षाचे हे दोन्ही उमेदवार जिंकले तर अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणात आणि तिच्या विदेशी धोरणात गंभीर परिवर्तन होण्याची शक्यता प्रबळ होईल. डेमोक्रेटिक पक्ष जर ही निवडणूक जिंकला तर कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या कृष्णवर्णिय महिला उपराष्ट्रपती बनतील.

अमेरिकेच्या इतिहासात आत्तापर्यंत महिला मंत्री तर बनल्या आहेत मात्र उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणा-या महिला उमेदवार आत्तापर्यंत कधीच जिंकलेल्या नाहीत. हिलरी क्लिंटन अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्रपती जवळपास झाल्याच होत्या. त्यांना डोनाल्ड ट्रंप यांच्यापेक्षा अडीचेक लाख मतं जास्त मिळाली होती. पण इलेक्टोरल मतांमध्ये त्या हरल्या. जगात इतरत्र जे घडतय आणि घडू घातलय याची रंगीत तालीम अमेरिकेत होतेय. अमेरिका हा देश कोणाचा आहे आणि तो कोणी चालवायचा, असं कमला हॅरिस विचारत आहेत. जर कमला हॅरिस यात यशस्वी झाल्या तर यात काही आश्चर्य नाही की त्या चार वर्षांनंतर राष्ट्रपती पदाची निवडणूक लढतील आणि अमेरिकेच्या राष्ट्रपती बनतील. बाइडन यांचे वय आत्ता ७८ वर्षे आहे, त्यामुळे ते पुन्हा राष्ट्रपती बनण्यास ईच्छुक नाहीत. अशात कमला यांची राष्ट्रपती पदाची दावेदारी अधिक प्रबळ बनेल. 
कमला हॅरिस सतत स्वत:ला कृष्णवर्णिय मानतात कारण त्यांचे पिता डॉनल्ड हॅरिस हे कृष्णवर्णिय होते. मात्र त्यांच्या व्यक्तीमत्वावर कुणाची मोठी छाप असेल तर ती त्यांच्या आईची. त्यांच्या आईचे नाव श्यामला गोपालन होते. श्यामला आणि हॅरिस यांचा घटस्फोट फार पूर्वीच झाला आहे. श्यामला यांनीच आपल्या दोन्ही मुली कमला आणि माया यांचे पालन-पोषण केले. कमला आपल्या तमिळभाषी आईचे शहर मद्रासला कित्येकदा येवून गेल्या आहेत. त्यांना जेवणात आजही इडली,वडा,डोसा आणि सांभर खूप आवडत. म्हटलं तर त्यांच्या घरात हिंदू ,खिस्ती आणि ज्यू असे तीनही धर्म आहेत. पित्यामुळे त्या चर्चमध्ये जात आल्या आहेत, मात्र मंदिरात जावून नारळ अर्पण करणे आणि पूजा करणे सुद्धा त्यांना प्रिय आहे. ट्रंप यांचे पाठीराखे त्यांचा धर्म शोधण्याचा प्रयत्न करतील. ओबामांचा उल्लेख ट्रंप आजही बराक ओबामा हुसेन असा करतात. ओबामांचे वडील आफ्रिकन होते आणि आई मुस्लिम याकडे ट्रंप यांच लक्ष असत. ओबामा स्वत: खिस्ती आहेत  आणि अमेरिकन आहेत हे त्यांना मान्य नाही. वर्ण आणि धर्म या मुद्दयावर जावून मुख्य प्रश्न टाळण्याची एक लाट अमेरिकेत आणि जगात आली आहे.
             कमला हॅरिस यांना अमेरिकेत कृष्णवर्णियच समजल जात. त्यांच्या आईने ओकलैंडच्या कृष्णवर्णियांच्या आंदोलनात सक्रीय भूमिका निभावली होती. वास्तवात मात्र कमला कृष्णवर्णिय नाहीत न गो-या. त्या या दोघांचे मिश्रण आहेत. त्यांचा रंग सावळा आहे. हा  सावळा रंग आता अमेरिकेत वादळ आणणार आहे. यात काही आश्चर्य नाही की, उपराष्ट्रपतीचे  कमी महत्वाचे असलेले पद यावेळी राष्ट्रपती पदापेक्षा अधिक प्रचारात असेल. कमला या व्यवसायाने वकिल आहेत. असं नाही की, ५५ वर्षांच्या कमला यांनी राजकारणात अचानक उडी घेतली आहे. त्या सीनेटर आहेत. अमेरिकेत सीनेट आपल्या राज्यसभेसारखी उच्च सदन समजली जाते, मात्र यात निवडून येणे हे आपल्या लोकसभेत निवडून येण्यापेक्षा कठिण असते. त्या एक लोकप्रिय नेत्या सारख निवडून सीनेट मध्ये आल्या आहेत. यापूर्वी त्या कॅलिफोर्नियाच्या अ‍ॅटर्नी जनरल राहिल्या आहेत. कमला यांनी डेमोक्रेटिक पक्षात सुद्धा राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करून बाइडन यांच्या विरोधात बंड केले होते. बाइडन यांनी मात्र कमला यांना आपला निवडणूकीतील जोडीदार बनवून स्वत:ला अधिक प्रबळ केले आहे.
          कमला हॅरिस या डेमोक्रेटिक पक्षाच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार आहेत याचा परिणाम हा झाला की, यावर्षी भारताचा स्वातंत्र्य दिन अमेरिकेत मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. खरंतर डेमोक्रेटिक पक्षात भारत समर्थकांची संख्या अगोदरच जास्त आहे त्यामुळे या १५ ऑगस्टला भारताच्या समर्थनात अशा गोष्टी बोलल्या गेल्या ज्यामुळे ट्रंप यांची ‘भारतमित्र ट्रंप’ ही छबी सुद्धा मागे पडेल. कमला हॅरिस यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीची बातमी बाहेर येताच ट्रंप प्रशासन हडबडून गेले. त्यांनी भारतियांच्या व्हिसावर लावलेले प्रतिबंध मागे घेतले. ट्रंप यांनी मागील साढे तीन वर्षात एवढी नाटकं केली आहेत कि भारत मानु लागला आहे कि ट्रंप काळ हा भारत-अमेरिका संबंधाचा सुवर्णकाळ आहे. मात्र हे सर्वांना माहित आहे की, ट्रंप आपल्या संकुचीत राष्ट्रीय स्वार्थाला सिद्ध करण्यात कधीच चुकत नाहीत. त्यांनी भारत-अमेरिका अणू कराराला अधांतरी लटकवून ठेवल, भारताच्या व्यापारी हितांवर आघात केला, गो-या अमेरिक्यांची मत पक्की करण्यासाठी भारतीयांवर व्हिसा प्रतिबंध लावले.
असं नाही की, बाइडन आणि कमला हॅरिस व्हाइट हाउस मध्ये बसले तर ते भारताच्या पारडयात झुकतील. त्यांना सर्वप्रथम राष्ट्रहित लक्षात घ्यावे लागेल. मात्र १५ ऑगस्टच्या दिवशी डेमोक्रेटिक पक्षाने भारताला आश्वस्त केले आहे की, सत्ता परिवर्तनानंतरही अमेरिकेची भारतासोबत सामरिक भागिदारी सुदृढ राहिल. जिथपर्यंत प्रशांत महासागराचा प्रश्न आहे, भारत तिथे नायकाच्या भूमिकेत आहे. चीनच्या बाबतीत तो आपले मागील नेता ओबामांचे धोरण चालवणार नाही तर त्याच्या विस्तारवादाचा विरोध करेल. दक्षिण आशियाई देशांना तो विस्तारवाद आणि दहशतवादाशी लढण्यासाठी मदत करेल. डेमोक्रेटिक पक्षाकडून भारताचे स्पष्ट आणि दृढ समर्थन यासाठी पूढे येत आहे कारण कमला हॅरिस या पक्षाच्या उपनेता आहेत.
              कमला हॅरिस यांच्या उमेदवारीचा प्रभाव भारतीय, कृष्णवर्णिय आणि लॅटिन अमेरिकी मतदारांवर अवश्य पडेल. कमला यांनी आपल्या आई प्रमाणेच कृष्णवर्णिय जॉर्ज फ्लॉयडच्या हत्या प्रकरणाला खूप उचलून धरले होते. त्यांच्या रंगभेद विरोधी भूमिकेने त्यांना  अमेरिकेच्या प्रगतीशील समुहात खूप लोकप्रियता मिळवून दिली. यामुळे ट्रंप गटात एवढा जळफळाट झाला की, डोनाल्ड ट्रंप यांचा मुलगा एरिक ट्रंप याने कमला यांच्या बाबतीत खूप अश्लील टिपण्णी केली. कमला यांच्या उमेदवारीला केवळ कृष्णवर्णियच नाही तर गो-यांनी सुद्धा पसंद केले आहे.
हे ठिक आहे की, कमला यांनी कित्येक प्रकरणात मोदी सरकारच्या धोरणांचे समर्थन केले नाही. मात्र आता त्या जुनेच धोरण अवलंबतील यात शंका आहे. जर त्या काही मुद्दयांबाबतीत आपल्याशी असहमत असतील तर असु द्या. शेवटी त्या अमेरिकी नेत्या आहेत. मात्र त्यांच्या उमेदवारीने ४० लाख अमेरिकी भारतीयांमध्ये आनंद आणि उत्साह निर्माण झाला आहे. कमला यांची उमेदवारी ट्रंप यांच्यासाठी नविन डोकेदुखी बनली आहे. ट्रंप यांना आशा  असेल की, ते रंगभेदाच्या लाटेवर स्वार होवून निवडणूकीची नौका पार करतील मात्र कमला हॅरिस यांचा मध्यम मार्ग यात मोठा अडथळा बनु शकतो. पाहू या येत्या ३ नोव्हेंबरला नक्की काय घडत ते.
               -सुरेश मंत्री

टिप्पण्या

  1. It's my pride to read your articles Sir! You have written very nice and secular article. In india, Woman's leadership is hardly accepted . Indira Gandhi and Soniya Gandhi are two women exceptions! Most of the Indian politicians hate Soniya Gandhi by raising her Italian origin!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...