मुख्य सामग्रीवर वगळा

नाटू - नाटू... च यश


 जागतिक पातळीवर सन्मानाचा असा पुरस्कार सोहळा म्हणजे ऑस्कर. ऑस्कर पुरस्कार जिंकण्यासाठी जगभरातील चित्रपटांमध्ये चुरस रंगलेली असते. नुकत्याच झालेल्या ९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा खोवला गेला आहे. आरआरआर या चित्रपटातल्या ‘नाटू नाटू’ या गाण्याला ‘बेस्ट ओरिजनल साँग’चा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. भारतीय प्रोडक्शनमध्ये बनलेलं हे पहिलं गाण आहे ज्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. याआधी स्लमडॉग मिलेनिअरच्या वेळी अशीच चर्चा झाली होती. तेव्हा जय हो गाण्याला हा पुरस्कार मिळाला होता. तो चित्रपट पूर्णपणे भारतीय नव्हता. त्याच्या चित्रपटाचं दिग्दर्शन डॅनी बॉयल ने केलं होतं. ‘नाटू’ शब्दाचा अर्थ अस्सल देशी आहे. इथल्या मातीच्या सुगंधाची अभिव्यक्ती आहे. या गाण्यातील प्रत्येक शब्द त्या गोष्टीशी नातं सांगतो, ज्या गोष्टींना इथल्या मातीचा गंध आहे. हे गाणं खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचं गीत आहे. यात एक कमकुवत लोक नाचता नाचता अजिंक्य समजल्या जाणाऱ्या ब्रिटिशांना आव्हान देतात आणि नमतं घ्यायला लावतात. याबाबत कुणाचंच दुमत नाहीय की, आरआरआरच्या यशाचं एक कारण सिनेमातील नाटू नाटू हे गाणं आहे. अमेरिकेतील व्हरायटी या वृत्तपत्राने ‘सिनेमा आणि संगीताच्या नसा पकडणारं गाणं’ म्हणून नाटू नाटूचा गौरव केला होता. नाटू नाटू गाण्यानं तेव्हाही इतिहास रचला, जेव्हा रिहाना, टेलर स्विफ्ट आणि लेडी गागा यांना मागे टाकत बेस्ट ओरिजनल गाण्याचा गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला होता. गोल्डन ग्लोब मिळणारे हे पहिले भारतीय गाणे आहे. तसेच आशिया खंडातील नाटू नाटू हे पहिले गाणे आहे ज्याला ऑस्कर मिळाला आहे. भारतीय सिनेसृष्टीसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.

ऑस्करच्या बेस्ट ओरिजिनल साँगसाठी ‘अप्लॉज’ (टेल इट लाइक अ वुमन), ‘होल्ड माय हँड’ (टॉप गन मॅव्हरिक), ‘लिफ्ट मी अप’ (ब्लॅक पाथेर वाकांडा फॉरेव्हर), आणि ‘दिस इज ए लाइफ’ (एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल  अॅटवन्स) या गाण्यांना नामांकन मिळालं होतं. यापैकी एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटामधील ‘नाटू नाटू’ गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर मिळाला. आरआरआर चित्रपट २४ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. यात रामचरण आणि ज्युनियर एनटीआर सोबत अजय देवगण, आलिया भट्ट आणि श्रिया सरन यांच्याही मुख्य भूमिका आहेत. ५५० कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने १२०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. ज्युनियर एनटीआर आणि रामचरण तेजा या दाक्षिणात्य सुपरस्टार्सवर चित्रित केलेल्या या गाण्याच्या लोकेशनचीसुद्धा आता जगभर चर्चा होताना दिसत आहे. नाटू नाटू गाण्याचं चित्रीकरण एका विशाल कॅनव्हासवर झालं आहे. राजवाड्याच्या सेट न उभा करता, खऱ्याखुऱ्या राजवाड्यामध्ये हे गाणं चित्रित केलं गेलं. हे गाणं २०२१ मध्ये युक्रेनची राजधावी कीव्हमध्ये असलेल्या राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की च्या घरासमोर झालं आहे. हे गाणे २० दिवसात सुमारे ४३ रिटेकनंतर शुट करण्यात आले आहे. या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी, युक्रेनमध्ये रशिया-युक्रेन युद्धाची ठिणगी पेटली नव्हती, म्हणून या गाण्याचे चित्रीकरण करण्याची परवानगी राष्ट्र्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी राजामौली यांना दिली होती. रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर, ऑस्कर पुरस्कारासह भारतीय सिनेमाच्या युक्रेन कनेक्शनची आता जगभरातील चित्रपट रसिकांमध्ये चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.

याआधी पाच भारतीयांनी ऑस्कर पुरस्कार जिंकून भारताची मान वाढवली आहे. भानू अथैया हे ऑस्कर विजेत्या भारतीयांच्या यादीतील पहिले कॉस्च्युम डिझायनर आहेत. ज्याला गांधी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनचा पुरस्कार मिळाला होता. सत्यजित रे यांना १९९१ मध्ये, त्यांना मानद जीवनगौरवसाठी ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आला. २००८ च्या स्लमडॉग मिलेनियर चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट साउंड मिक्सिंग श्रेणीमध्ये रेसुल पुकुट्टी यांना ऑस्कर प्रदान करण्यात आला होता. एआर रहमान यांना स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत श्रेणीत ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटातील जय हो हे गाणे ए आर रहमानने गायले होते. स्लमडॉग मिलेनियरसाठीच गीतकार गुलजार यांना ऑस्कर मिळाला होता. यंदा या सोहळ्यात भारताला दोन ऑस्कर मिळाले आहेत. बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या 'द एलिफंट व्हिस्पर्स'ने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ 'आरआरआर' या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. लगान, स्वदेश यासारख्या अनेक भारतीय सिनेमांना ऑस्करचे नामांकन जरूर मिळाले आहे, पण भारतीय सिनेमाला मात्र पूर्णांशांने ऑस्कर जिंकण्याचा मान अद्याप मिळालेला नाही. आता देखील नाटू नाटू या गाण्याच्या रूपाने आणि द एलिफंट व्हिस्पर्स या शॉर्ट फिल्मच्या रूपाने भारताने ऑस्कर वर आपली मोहोर जरूर उठवली आहे, पण संपूर्ण सिनेमाला ऑस्कर मिळवून ही मोहोर अद्याप उमटवायची आहे. त्याची आशा करोडो भारतीयांना उत्तम कला निर्मितीसाठी प्रेरणा देत राहील. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या गाण्याचं कौतुक करत या चित्रपटाच्या टीमला मनापासून शुभेच्छा दिल्या. यावर्षी दोन ऑस्कर पुरस्कार मिळणं ही भारतीयासाठी अभिमानास्पद बाब आहे.

- सुरेश मंत्री

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...