मुख्य सामग्रीवर वगळा

दीपावली साजरी करताना !

आपल्या देशातील दीपावली हा अतिशय महत्वाचा सण. हा सण जणू एका पॅकेजच्या स्वरूपात येतो. धनत्रयोदशी, लक्ष्मी पुजनआणि भाऊबीज या सणांसोबत संपूर्ण महिना एखाद्या उत्सवाच्या स्वरूपातच निघून जातो. या सणाचे पौराणिक आणि सामाजिक महत्व आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने माहित आहे मात्र या गोष्टीचे दु:ख होते कीकित्येक वेळा सणांचे नकारात्मक चित्रण आपण आपल्या मनात करून बसतो. न केवळ आपण नकारात्मक चित्रण करून बसतो तर याला आपल्या जीवनात अंगिकारून दूस-यांचे नूकसान करण्यात प्रमुख भागिदारही बनतो. दीपावलीच्या वेळी जे सण येतात त्यांची नकारात्मक व्याख्या आणि चूकीच्या परंपरा आपल्यासाठी कशा प्रकारे हानीकारक असतात हे समजून घेणे खूप आवश्यक आहे.

वस्तूंची खरेदी करताना -

या सणाच्या वेळी सर्वात अगोदर येणारा सण म्हणजे धनत्रयोदशी. या वेळी लोक नव्या वस्तूंची खूप मोठया प्रमाणावर खरेदी करतात. बाजारपेठ ही भरलेली असतेवेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू खरेदी केल्या जातात. 

अनेक ऑनलाईन संकेतस्थाळांवर वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स दिल्या जातात. एकूण ग्राहकांना खरेदी करण्यासाठी जबरदस्त पद्धतीने प्रोत्साहित केले जाते. ठिक आहे, खरेदी ही केलीच पाहिजे मात्र हे आपल्याला माहित आहे का कीअनेक धूर्त व्यापारी या सणांच्या मानसिकतेचा फायदा उठवतात. ही लोक खाद्यपदार्थांमध्ये केवळ भेसळच करत नाहीत तर लोकांचे आर्थिक नुकसान करून त्यांच्या आरोग्याला हानी पोहचवितात. खव्या मध्ये होणारी भेसळ आपल्याला माहित आहेच. एवढंच नाही तर बाजारात चांदीचे नकली शिक्के सुद्धा विकले जात असल्याची बातमी एका न्युज चॅनलने दाखविली होती. आपल्या सराफामार्फत आपल्याला शुद्ध चांदीच्या नावावर नकली माल लादला जात असेल तोही असली चांदीची किंमत वसूल करून ज्यात ५० टक्के पेक्षा कमी चांदी आहे तर खरेदीदारांची किती लूट होत असेल. या न्युज चॅनलने पडताळणी करण्यासाठी या चांदीच्या शिक्क्यांचे परिक्षण केले. आपल्याला विश्वास बसणार नाही ५ मागे ४ शिक्के नकली निघाले.

हे उघड आहे कीआपल्याला काही ना काही खरेदी करायची घाई आहे, दुकांनांमध्ये खूप गर्दी आहे तर याचा गैरफायदा उठवणारेही हजारो लोक आहेत. अशात आपल्याला सल्ला आहे कीआपण खरेदी करताना खूप सावध रहावे. जर आपल्याला किमती वस्तू खरेदी करावयाची आहे तर ती धनत्रयोदशीला खरेदी करू नये. आपण ही खरेदी धनत्रयोदशीनंतर पूर्ण चौकशी करून करू शकता. या सणाच्या वेळी अनेक कंपन्या ऑफर्स देतात किंवा खरेदीवर कूपन देतात मात्र आपण विना काही चौकशी करता खरेदी केल्यास आपल्याला नकली वस्तूही दिली जावू शकते. या व्यतीरिक्त दीपावलीला महागड्या भेटवस्तू ज्यात कधी-कधी उंची मद्याचाही समावेश असतो यांची देवाण-घेवाण निसंदेह चूकीची पंरपरा आहे. या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत.   

चीनी वस्तूंबाबत –

दीपावलीशी संबंधीत चीनी वस्तूंच्या खरेदीचा सोशल मीडीयावर आजकाल खूप विरोध केला जात आहे. चीनी वस्तू भारतीय वस्तूंच्या तूलनेत स्वस्त असल्याने चीनी झालरफटाकेमिठाई आणि कपडयांनी भारतीय बाजारपेठ व्यापली आहे. व्यापारात चीनने आपले पाय मजबूतीने रोवल्याने आपला पैसा चीनमध्ये जातो आणि आपल्या दुर्दैवाने चीन याच पैशाने पाकिस्तानला भारतात दहशतवाद पसरविण्यासाठी अप्रत्यक्षरित्या मदत करतो. अशा प्रकारे आपण चीनी वस्तूंची खरेदी करून अप्रत्यक्षरित्या दहशतवादाला हातभार लावतो. यासाठी होईल तेवढ चीनी वस्तूची खरेदी करणे आपण टाळले पाहिजे त्याऐवजी भारतीय लघू उद्योगांना प्रोत्साहन दिले पाहिजे मग या वस्तू काही प्रमाणात महागड्या का असेना.

फटाक्यांच्या बाबतीत-

खरेदीच्या नंतर आपल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने बघीतले तर देशातील अनेक मोठया शहरात वायू प्रदूषणाचा धोका वाढलेला आहे तोही ठिक दीपावलीच्या अगोदर. आपल्याला हे चांगले माहित आहे कीमोठया प्रमाणावर फटाके वाजवल्याने कशा प्रकारे वायू प्रदूषण होते. हे प्रदूषण वृद्ध आणि नवजात बालकांसाठी एक प्रकारचे विषच आहे. आता या बाबतीत लोकांमध्ये काही प्रमाणात जागरूकता निर्माण झाली आहे तरीही याबाबतीत खूप काही करणे गरजेचे आहे. दीपावलीच्या आसपासच पिकांची कापणी होते. पिकांची कापणी झाल्यानंतर राहिलेले अवशेष उघड्यावर जाळल्याने जो धूर हवेत मिसळतो त्यामुळे अनेक प्रकारचे आजार होतातअनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. अशात ऐन दीपावलीच्या अगोदर वायू प्रदूषण धोकादायक स्तरापर्यंत पोहचते आणि जेंव्हा दीपावलीला फटाक्याच्या धूराने आकाश झाकून जाते तेंव्हा परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर होवून जाते.

श्वसनाचे आजार असणा-या रुग्णांसाठी हा धूर जीवघेणा ठरू शकतो. खरंतर या गोष्टी अनेक वर्षांपासून सांगितल्या जात आहेतशोध केला जातो,सर्व्हे केला जातो, शोध निबंध बनवला जातो मात्र तरीही आपले केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच वागण भावशून्य आहे. शेवटी याची जबाबदारी घेणार तरी कोण ? अशात आपण या भारताचे नागरिक म्हणून वायू प्रदूषण कमी करण्यासाठी फटाक्यांचा खूप नियंत्रीत वापर केला पाहिजे. अस म्हणन योग्य ठरणार नाही कीदीपावलीचा सण आहे आणि आपण फटाके फोडू नयेतमात्र केवळ औपचारिकता म्हणून खूप कमी प्रमाणात ! अगोदरच शहरात वाहनांची संख्या खूप वाढली आहे त्यात फटाके फोडल्याने आरोग्याशी संबंधीत किती प्रश्न निर्माण होतात आपण याची कल्पना नाही करू शकत. काही लोक या गोष्टीचा विरोध करतात किंवा याला अन्य धर्माशी जोडतात आणि म्हणतात की आपण भरपूर फटाके फोडले पाहिजेतहे आपले स्वातंत्र्य आहे. ठीक आहे याला नाकारले नाही जावू शकत मात्र आपण कोण्या लहान मुलाच्या दृष्टीनेकोण्या वृद्धाच्याह्रदय रोगाच्या रुग्णाच्या दृष्टीने त्याच्या स्वास्थ्यावर फटाक्यांच्या धूराचा होणारा परिणाम पाहिले तर एक वेळेस आपल्याही मनात हा विचार आल्याशिवाय राहणार नाही कीआपण फटाके का फोडत आहोत ? वास्तविकदृष्ट्या आपण एक हजारापासून दहा हजार रुपयांपर्यंत जे पैसे फटाक्यांवर खर्च करणार आहोत त्यातून कोणा गरजवंताची मदत नाही का करता येवू शकत ? खरंतर फटाके फोडणे म्हणजे पैशाचा सरळ-सरळ अपव्यच आहेआरोग्याचे प्रश्न निर्माण करणारा आहे आणि यातून अनेक वेळा दूर्घटनाही होतात जसे आग लागणेडोळ्यांना दूखापत होणेभाजणे इत्यादी. तसंतर सणांच्या बाबतीत सकारात्मक बाबी खूप आहेत. खासकरून दीपावलीच्या संबंधीत अनेक लेखांमध्ये या पर्वाचे अनेक फायदे आपण वाचले असतीलचमात्र या जगातील प्रत्येक बाबीत काही वाईट गोष्टीही असतात ज्यात आपण सुधारणेकडे अग्रेसर होवू शकतो.

जुगार खेळणे टाळा-

दीपावलीच्या दिवशी जुगार खेळण्याची प्रथाही आपल्या समाजात काही ठिकाणी आहे. काही लोक असा तर्क देतात कीजर आपण या दिवशी जुगारात जिंकलो तर पूढे नशीब खूप साथ देते. यामुळे अनेक ठिकाणी कवडी, पाश्यांसोबत अनेक प्रकारचे पंरंपरागत आणि आधुनिक प्रकारचे जुगार खेळले जातात. जुगार आणि त्याच्या परिणामाबद्दल जास्त काही बोलण्याची गरज नाही कारण याचा परिणाम काय होतो ते महाभारतात खूप चांगल्या पद्धतीने सांगितले आहे. अनेक शकुनीमामा सारखे जुगारी आपल्या कपटी डोक्याने कित्येक लोकांना पशू बनविण्याचे कार्य करित आले आहेत. यापैकी ३५ टक्के लोक केवल शुभ शकुन म्हणून जुगार खेळतात तर उर्वरित १० टक्के लोक शकुनीमामा आणि युद्धीष्टीरच्या जुगारासारख खतरनाक जुगार खेळातात जिथे आर्थिक नुकसानीशिवाय काही हाती येत नाही. तसं बघितल तर सट्टेबाजी हा सुद्धा जुगाराचे आधुनिक रूप आहे आणि जुगाराच्या विभिन्न वाईट गोष्टींना दूर करण्यासाठी सामाजिक जागरूकता करणे अत्यंत गरजेचे आहे. जुगार हा कायद्यानेही गुन्हा आहे. भलेही याद्वारे काही अवैध्य कमाई होत असेलही मात्र आहे शेवटी वाईटच. जर आपण वाईट गोष्टींपासून दूर राहिलोसावधगिरीने खरेदी केलीखूप फटाके फोडून वायू प्रदूषण केले नाही तर काही कारण नाही की, आपले हे सण सामाजिक समरसता आणणार नाहीत, सुख-समृद्धी आणणार नाहीतआपल्यासाठी उज्वल भवितव्याची आशा निर्माण करणार नाहीत.

तर चला दीपावलीत आपण या वाईट बाबींपासून दूर राहूसावधान राहू तेंव्हाच ख-या रूपाने लक्ष्मीगणेश आणि सरस्वतीचे आपण पूजन करू शकू आणि ख-या अर्थाने सणांचा अर्थ समजू शकू. 

 -सुरेश मंत्री. 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...