आपले सहा नगरसेवक शिवसेनेने फोडल्याने राज ठाकरे खूप अस्वस्थ झाले आहेत. दुसरीकडे भाजपा सुद्धा बैचेन आहे की त्यांना ही संधी का मिळाली नाही? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी, शिवसेना आणि भाजप यातील संबंध दिवसेंदिवस खूप खराब होत असल्याने खूप आनंदी आहेत मात्र हे पक्ष स्वतः घाबरलेले आहेत त्यांना भीती वाटत आहे की, शिवसेनेला प्रतिउत्तर देण्यासाठी कदाचित भाजप त्यांचे नगरसेवक फोडणार तर नाही ना? सत्ता मिळवण्याच्या या स्पर्धेत आपले कोण आणि परके कोण काही समजायला मार्ग नाही, सर्व काही अविश्वसनीय होत चालले आहे.आता एक प्रश्न निर्माण होतो की, जे लोक आपल्या पक्ष आणि नेत्यांच्या प्रती प्रामाणिक नाहीत लोक त्यांच्यावर विश्वास कसा काय ठेवतात? राजकारणात पक्षांतर करणे ही काही नविन गोष्ट नाही आणि कोणताही पक्ष यापासून वाचलेला नाही माञ ज्या पक्षाचा नेता पक्षांतर करतो तो पक्ष टिका व्यक्त करित असतो तर हा नेता ज्या पक्षात जातो तिथे त्याच्यासाठी पायघड्या आंथरल्या जातात.
राज ठाकरे आज दु:ख व्यक्त करित आहेत. त्यांनी सांगितल की, मी त्यांना काय कमी केल? राज ठाकरे हे विसरताहेत की, कधी काळी त्यांनी सुद्धा शिवसेनेला तोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती.त्यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत जे मनसेत आले ते शिवसेनेचेच होते. राज यांनी त्यांना फक्त टिकीट देण्याशिवाय दूसरे काय केले? मनसेला सोडून शिवसेनेत गेलेले दिलीप लांडे हे मनसेच्या बळावर नाही तर स्वबळावर निवडणूक जिंकतात.भाजपाचे किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर सौदेबाजीचा आरोप केला आहे, हे म्हणजे आपल ठेवायचे झाकून आणि लोकांचे पहायचे वाकून असे झाले. नारायण राणेंसहित काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदार आणि नगरसेवकांना पक्षामध्ये सामावून घेणा-या भाजपला या पक्षांतरावर टिका करणे आणि सौदेबाजीचा आरोप करणे शोभत नाही. खर तर या सर्व कारस्थानामागे भाजपाचीच मुख्य भूमिका राहिली आहे. भांडूप उपनिवडणूक जिंकल्यानंतर भाजपला महापौर पद मिळवण्याचे स्वप्न पडत होते. भाजपला हे स्वप्न पूर्ण करण्यापासून रोखण्याचे काम शिवसेनेन केले. मुंबई महापालिकेची सत्ता हा शिवसेनेचा प्राण असल्याने आत्मरक्षणासाठी उचलेले कोणतेही पाऊल चूकीचे मानले जावू शकत नाही.
शिवसेनेला जो डाव खेळायचा होता ती आता खेळून गेली आहे.आता प्रश्न हा आहे की, याचा भावी राजकारणावर काय प्रभाव पडेल? शिवसेनेच्या या डावपेचाने राज ठाकरे निश्चितच शिवसेनेवर भडकलेले आहेत. याचा फायदा उचलण्यासाठी त्यांच्या या जखमेवर मलम लावण्याचा प्रयत्न भाजपकडून होवू शकतो. नारायण राणे यांना एनडीएत आणून भाजपाने कोकणात शिवसेनेची घेराबंदी करण्याची व्यवस्था करून ठेवली आहे. २०१९ च्या आगामी लोकसभा निवडणूका शिवसेनेच्या विरोधात भाजप-राज-राणे असे समीकरण राहिल. या विरोधाचा सामना एकट्या शिवसेनेला करावा लागेल कारण भाजपच्या विरोधात असूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सेनेला मदतीची अपेक्षा केली जावू शकत नाही. काँग्रेसच्या आपल्या सीमा असल्याने ती शिवसेनेची कधीच साथ देवू शकत नाही. राहिली गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसची तर मोदी-शाह जोडीसोबत पवार-पटेल जोडीने जे सबंध बनवून ठेवले आहेत ते गेल्या तीन वर्षांपासून शिवसेनेसाठी अदृश्य खतरा बनून राहिले आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांचा विचार करता शिवसेनेला स्वत: एकट्याने भाजपाचा चक्रव्यूह भेदण्याची रणनीती आखावी लागेल.नांदेड मनपा निवडणुकीतील विजय,पंजाब उपनिवडणूकीतील विजय आणि गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला असलेल्या पोषक वातावरणाचे जे परिणाम समोर येतील त्याचा फटका महाराष्ट्रात भाजपपेक्षा शिवसेनेलाच जास्त बसण्याची शक्यता नाकारता येवू शकत नाही.
दिवाळीनंतर लगेच राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार होणार आहे. भाजपाने याची तयारी पूर्ण केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला विदेश दौरा पूर्ण केला आहे. नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश निश्चित आहे.मुख्यमंत्री निश्चित शिवसेनेचा प्रभाव कमी करु ईच्छीतात.ज्या मंञीमंडळात राणे आहेत त्या मंत्रिमंडळाचा शिवसेना हिस्सा बनने पसंद करेल का हे पहाण औत्सुक्याचे ठरेल.हे निश्चित आहे की, नजीकच्या काळात राज्याच्या राजकारणात महत्वपूर्ण घडामोडी घडतील.सध्यातरी केवळ प्रतिक्षा आहे ती मंञीमंडळ विस्ताराची कारण यानंतर पुढील महिन्यात विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे.या अधिवेशनात काँग्रेस- राष्ट्रवादीच्या हल्ल्याला नेस्तनाबूत करण्यात शिवसेना भाजपाची मदत करते की भाजपाच्या अडचणी वाढवण्याची भूमिका घेते हे मंत्रिमंडळाच्या विस्तारावर अवलंबून आहे.
सध्या जनसामान्यात भाजपविरोधी भावना निर्माण होवू लागली आहे. यातच सोशल मीडियातून भाजपविरोधी मते पोष्ट केली जात आहेत. ज्या सोशल मीडियाच्या बळावर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप सत्तेत आली त्याच सोशल मीडियाने भाजपमध्ये धडकी भरण्यास सुरुवात केली आहे.याला रोखण्यासाठी भाजप सरकार कायदा करण्याचा विचार करीत आहे अशी चर्चा सुरू आहे.याचा सकारात्मक परिणाम होण्याऐवजी नकारात्मक परिणामच भाजपवर होण्याची शक्यता आहे.
-सुरेश मंत्री

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा