मुख्य सामग्रीवर वगळा

सुजाण पितृत्व


पित्याला आपल्या मुलाचा मित्र झाल पाहिजे अस शास्त्रात लिहिल आहे. ‘प्राप्ते षोडशेवर्ष पुत्रापि मित्रवत समाचारेत’ या श्लोकाचा अर्थ पुत्र १६ वर्षाचा होताच पित्याला आपल्या पुत्राला मित्राच्या रुपात बघितल पाहिजे असा होतो. यात मुलीचा मात्र उल्लेख नाही. अर्थात भारतीय संस्कृतीत एकीकडे मुलीला देवतेचे स्थान देवून तिला महान बनवले असताना दुसरीकडे मात्र तिला मुलाच्या तुलनेत दुय्यम स्थान दिल जात ही सुद्धा परंपरेनेच चालत आलेली बाब आहे.
        वर उल्लेखीत श्लोकात सांगितल्यापेक्षा उलट बाब असलेली आपल्याला दिसुन येईल. पुत्र आणि पित्यामध्ये संवादाचा अभाव बहुतांश कुटुंबात आहे. संवादाऐवजी मुलांसाठी पित्याची उपस्थिती ही भयाचे प्रतिक असते. वयात आलेला मुलगा घरात असेल तर त्याला पाहुन बाप घराबाहेर आणि बाप घरात असेल तर मुलगा बाहेर. पिता घरात असेल तर गंभीर शांतता. आई नजरेचा कटाक्ष टाकुन मुलांना शांत बसवते आणि पतीच्या सेवेला लागते. सुरूवातीपासून शहरी भागात राहणा-या आणि कामकाज करणा-या दांम्पत्याच्या कुटुंबात कदाचित दृश्य वेगळे राहत असेल मात्र ग्रामिण भागात आजही हिच स्थिती आहे. पित्याकडे कुटुंब प्रमुख म्हणुन बघितले जाते. एकप्रकारे त्याच्याकडेच सर्व सत्ता केंद्रित असते. मात्र आदर्श आणि यतार्थ यात खूप मोठी दरी असलेली दिसून येते. जर आई-वडिल आणि मुलांमध्ये स्नेह आणि सन्मानावर आधारित नातं असेल तर त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या व्यक्तीगत, सामाजिक आणि कौटुंबीक समस्या ब-याच हद्दीपर्यंत कमी होतात. प्रत्येकामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते.
     बालपणात आलेल्या अनुभवांमुळे हिंसा, मानसिक तणाव आणि आजाराची पाळेमुळे घट्ट होतात आणि हे सर्व आई-वडिल आणि मुलांमधिल संवादाच्या अभावाने घडत. जे पिता आपल्या मुलांच्या गरजा ओळखतात आणि त्यांच्या भावभावनांचा सन्मान करतात ते खरेच समजदार असतात. आज अनेक अविवाहित तरूणांशी संवाद साधला असता असं दिसून येत की, त्यापैकी अनेक जण लग्न करू ईच्छित नाहीत, पालक बनण्यास तयार नाहीत. याऐवजी लिव्ह ईन रिलेशनशिपकडे त्यांचा कल वाढलेला दिसून येतो. अशा प्रकारची विचारधारा कदाचित या तरूणांमध्ये दोन कारणांनी बनलेली असेल. पहिल कारण म्हणजे त्यांना घरात सुखद अनुभव अभावानेच मिळाले असतील, दुसरे कारण आपल्या आई-वडिलांना बघुन कुठे न कुठे त्यांच्या मनात पालकत्वाची जबाबदारी ही एक ओझ वाट असेल.
कामात व्यस्त असलेले आई-वडिल, मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलताना होणारी त्यांची ओढाताण,स्वत:चा अभ्यासाचा ताण हे सर्व पाहून बालपणातच मुलांना सुखद अनुभव मिळण दुरापस्त होवून जात आणि त्यामुळेच कदाचित त्यांना असं वाटु लागत की, या झंझटीच्या मुळात लग्न आणि मुलांचा जन्म होण हे कारण आहे. समजदार पिता आपल्या मुलांना बोलतं करून त्यांना शिकवतो. तो हे विसरून जाईल की, मुलांचे प्रश्न आणि त्यांची जिज्ञासा त्याच्या सत्तेला कमजोर करू शकते. मुलांशी संवाद साधताना त्याच्यात अधिकाराच्या भावनेऐवजी विनम्रता असेल. तो आपले विचार मुलांवर लादण्याऐवजी आपल्या मुलांच्या विचारांचाही सन्मान करेल. पित्यात हा विश्वास जागेल की, ही मुलं ही नविन पिढीची आहेत, ती नविन उर्जा घेवून आलेली आहेत. त्यांच्यावर जुन्या विचारांचा प्रभाव जेवढा कमी राहिल तेवढ त्यांच्यासाठी चांगल असेल. आमच्या काळात असं नव्हत असं तो आपल्या मुलांना म्हणणार नाही. तो मुलांना अपयशातही खचून न जाता त्याचा सामना कसा करायचा हे शिकवेल. एक चांगला पिता  आपल्या मुलांचा चांगला मित्र, सल्लागार, त्यांच्या सोबत शिकणारा आणि वेळ प्रसंगी कसलाही क्रोध न करता आपल्या मुलांच्या चुका दाखवणारा असेल.
ईतिहास पाहिला तर असं दिसून येईल की, सृजनशिल लोकांनी पित्याला प्रश्न विचारून, प्रसंगी त्यांच्या विरोधात बंड पुकारून आपल्या जीवनयात्रेला सुरूवात केली होती. भगवान गौतम बुद्धांनी पिता शुद्धोधनची गोष्ट मानली असती तर त्यांनी राज्यकारभारच सांभाळला असता. अमिताभ  बच्चन नी हरिवंशराय बच्चनच ऐकलं असत तर कारकुनीच करत राहिले असते. एकदा क्राईस्ट लोकांसोबत चर्चा करत होते तेंव्हा कोणीतरी त्यांना सांगितले की, जोसेफ आले आहेत. तेंव्हा क्राईस्टचे उत्तर होते ‘ माझा पिता ( ईश्वर ) केवळ स्वर्गात आहे याशिवाय कोणी माझा पिता नाही. आदि शंकराचार्य निर्वाण षटकम् मध्ये लिहितात कि जेंव्हा कोणीतरी त्यांना विचारले की ते कोण आहेत? तेंव्हा त्यांनी अनेक गोष्टी सांगताना हिही गोष्ट सांगीतली कि, त्यांचे कोणीच माता वा पिता नाहीत. जर या महामानवांनी आपल्या पित्याच्याच जीवनशैलीचा अंगिकार केला असता तर ते यशस्वी परंतु सामान्यच राहिले असते. ज्या पित्याला असं वाटत कि, त्याचा मुलगा अथवा मुलगी त्याच्या सारखीच बनावी तो मानवी विकासात अडथळा असतो. बदलाची सुरूवात पित्याला केलेल्या विरोधापासुनच होते.
जास्तीत जास्त पिता आत्ममुग्ध अवस्थेत राहतात. ते आपल्या मुलाला सुद्धा आपल्यासारख बनवू ईच्छितात. जर मुल कमी आज्ञाकारी असते तर हुंडयासारख्या अनेक प्रथा कमी झाल्या असत्या आणि प्रेम विवाह अधिक झाले असते असं तुम्हाला वाटत नाही का? मुलांनी त्या विषयांचा आवडीने अभ्यास केला असता ज्यात त्यांना रूची आहे. आणखीन बरच काही झाल असत. यामुळेच आपण या जगात आपल्या मुलांवर खूप मोठा उपकार केला आहे, आता त्यांना स्वत: बहरू द्या, त्यांच्यावर आपल्या संस्कारांच अनावश्यक ओझ टाकु नका. संबंधातही थोडस अंतर राखा. प्रेम सुद्धा मोठ ओझ आणि कैदेसारख बनु शकत,याच्याप्रती सजग रहा. मी सुद्धा एक पिता असल्याने हे सर्व सांगण्याचा मला अधिकार आहे. तुमची मुल तुमच्या जवळ राहतात. तुम्ही त्यांना तुमच प्रेम देवू शकता पण आपले विचार नाही. जरी दिले तरी ते त्यांच्यावर थोपवू नका कारण त्यांच्याकडे स्वत:चे विचार आहेत.
-सुरेश मंत्री

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...