एकदा मी आणि माझ्या सहका-याची चर्चा सुरू होती.गोष्ट या मुद्द्यावर येवून थांबली होती की,कोण खरा मित्र असतो आणि कोण नाही ?मी त्याला विचारले,तुझा कोण विश्वासू मित्र आहे?त्याने तात्काळ उत्तर दिले,अनेक आहेत.मी त्याला चार नावे सांगावयास सांगितले.बराच वेळ विचार केल्यानंतर त्याने कसेबसे एकच नाव सांगितले.मला असे वाटले की,त्याने हे ही नाव लाजून सांगितले कारण त्याला भीती होती की,तुझा तर एकही खरा मित्र नाही असे मी म्हणेल. चर्चा पूढे चालू राहिल्यानंतर त्याने मला विचारले की,खरा मित्र कोण असतो?मी त्याला सांगितले की,आपण संकटात असताना सर्वप्रथम ज्याचे नाव आपल्याला आठवते तोच आपला खरा मित्र.मजेची गोष्ट अशी की,कित्येक वेळा ती ही व्यक्ती असते जिला आपण आपला शत्रू समजत असतो.मात्र आपण या ख-या मित्रासोबत ना जास्त हसत-बोलत असतो ना सोबत फिरत असतो.त्याच्या सोबत आपण कमीत-कमी वेळ घालवत असतो.हे ऐकल्यानंतर तो माझ्याकडे बघतच राहिला जणू मी त्याच्या मनातील गोष्ट सांगितली आहे. इंटरनेट मुळ जग जवळ आल आहे मात्र माणस दूरावत चालली आहेत.या गर्दीतही माणुस एकटा फिरत आहे.प्रत्येकाला एक...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.