मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

उद्योग जगतातला तारा निखळला

ब जाज उद्योग समूहाला पाच दशकांहून अधिक काळ आघाडीवर ठेवण्यात मोलाचा वाटा असणारे बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांचे नुकतेच वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. भारतीय वाहन उद्योग क्षेत्रातील एक आघाडीचं नाव म्हणून राहुल बजाज यांचं नाव घेतलं जातं. ऑटोमोटिव्ह उद्योगात बजाजचा विकास करण्यात राहुल बजाज यांचा मोलाचा वाटा आहे. राहुल  हे स्वातंत्र्यसेनानी व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जमनालाल बजाज यांचे नातू होते. त्यांच्या निधनामुळे बजाज उद्योग समुहाचे वैयक्तिक नुकसान तर झाले आहेच सोबत भारतीय उद्योग समुहात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते तरुण उद्योजकांसाठी एक प्रेरणास्रोत होते. राहुल यांनी उद्योग व वाणिज्य क्षेत्रात केलेली महत्वाची कामगिरी नेहमीच सर्वांच्या लक्षात राहिल. त्यांच्या जाण्याने देशाने एक महान उद्योजक गमावला आहे.    बजाज उद्योगाचा इतिहास राहुल बजाज यांच्या नावाला वगळून लिहिताच येणार नाही. पश्चिम बंगालमधील मारवाडी कुटुंबात १० जून १९३८ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील कमलनयन बजाज यांच्याकडून उद्योगाचा वारसा त्यांना मिळाला. सेंट स्टिफन्स कॉलेजमधून त्यांनी अर्थशास्त...

स्वर्गीय स्वर हरपला

  गेल्या आठ दशकांहून अधिक काळ संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘स्वर्गीय सुरांनी’ विराम घेतला. भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांचे रविवारी वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. लता मंगेशकर यांना ८ जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली. सोबतच त्यांना न्यूमोनियाही झाला होता. जवळपास गेल्या ३० दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. शनिवारी लतादीदींची प्रकृती पुन्हा बिघडली. कोरोनाची लागण झाल्यापासून २८ दिवसांहून अधिक कालावधीनंतर अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. फक्त देशच नाही, तर जगभरातील चाहत्यांना या बातमीने सुन्न केले आहे. लतादीदींच्या निधनाने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.  ल ता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदूरला झाला. मंगेशकर कुटुंबाचा पूर्वीपासूनच संगीताशी संबंध राहिला आहे. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर स्वतः गाणं गात आणि ते एक नाट्यकंपनी चालवायचे, तसंच अनेक विद्यार्थ्यांना ते संगीत शिकवत असत. परंतु, आपल्याच घरात इतकी सांगि...

वेदना घुंगरांच्या...

  स ध्या देश कोरोनाच्या तिस-या लाटेचा सामना करीत असुन कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गर्दीच्या ठिकाणी जमू नये,गर्दी टाळा अ शा शासनाच्या सुचना असल्याने अनेक ठिकाणच्या यात्रा रद्द होत आहेत . ज्या गावात तमाशाचे कार्यक्रम होते त्या गावातील यात्रा रद्द झाल्याने व राज्य शासनाने रात्रीची संचारबंदी घोषित केल्याने तमाशाचे कार्यक्रम सुद्धा होऊ शकणार नाहीत . जर ग्रामदैवतांच्या यात्रा, जत्रा सुरू झाल्या नाहीत तर लोकनाट्य तमाशा फडमालक व कलाकार यांच्यावर अधिकच उपासमारीची वेळ येणार आहे. समाजाचे प्रबोधन व मनोरंजन कर णारी तमाशा ही कला महाराष्ट्राची लोक कला म्हणून ओळखली जाते. वर्षातील आठ महिने गावोगावी फिरून ही कला सादर केली जाते. दस - या पासून तमाशाचा वर्षाचा हंगाम सुरू होत असतो. गुढीपाडव्यापर्यंत गावोगावी तंबूत तिकिटे लावून तमाशाचे खेळ हो तात . मार्च, एप्रिल, मे या कालावधीत महाराष्ट्रभर गावोगावी यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. पाडव्यानंतर गावोगावच्या जत्रांमध्ये तमाशा होतो. स्थानिक संयोजकांच्यावतीने गावातील यात्रेकरूंसाठी मनोरंजन व्हावे य...