काश्मीरमध्ये सरकारने केलेला घटनात्मक आणि प्रशासकिय बदल किती मोठे पाऊल आहे ही गोष्ट प्रत्येक भारतीयाच्या लक्षात आता आली असेल.५ ऑगस्टला कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तान सरकार भारताला घेरण्याच्या प्रयत्नात आहे.१४ ऑगस्टला पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती आरिफ अल्वींचे संपूर्ण भाषण यावरच केंद्रीत होते.पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी यादिवशी पाकव्याप्त काश्मीर विधानसभेत भाषण केले.ते तिथे येण्यापूर्वी अनेक केंद्रीय मंत्री अगोदरच उपस्थित होते.पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी एक पत्रकार परिषदही आयोजित केली होती.
पाकिस्तानच्या हालचालीवरून असे वाटते की,जणू काश्मीर मधून कलम ३७० हटविण्याऐवजी बलुचिस्तान,गिलगित सोबत संपूर्ण पाकव्याप्त काश्मीरच नाही तर आणखीन काही प्रदेश पाक कडून भारताने हिरावून घेतला आहे.पाकिस्तानने भारतासोबत राजकिय संबंध कमी करण्यासोबत,रेल्वे-बस सेवा बंद करणे,व्यापार ईत्यादी बंद करणे अशी पाऊल उचलून काय साधण्याचा प्रयत्न केला माहित नाही.पूर्ण पाकिस्तान या गोंधळात पडला आहे की,भारताच्या विरोधात कोण-कोणते पर्याय अवलंबता येतील.याचा निष्कर्ष हाच निघतो की,मोदी सरकारने आपला निशाना योग्य जागी लावला आहे,जेथून जम्मू-काश्मीरची वर्षानुवर्षे असलेली समस्या अनुकुल वळण घेण्याची शक्यता वाढू शकते.पाकचा क्वचितच कोणी नेता वा निवृत्त जनरल असेल ज्याने आपला उपाय सांगताना युद्धाची गोष्ट छेडली नसेल.पाकचे पंतप्रधान इमरान खान आणि राष्ट्रपती स्वत:कडून हल्ला करण्याविषयी सरळ-सरळ जरी बोलले नसले तरी दोघेही युद्ध-युद्ध बोलत आहेत.
पाकचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी म्हटले आहे की,जर भारताने पाकवर हल्ला केला तर पाककडे स्वत:ला वाचवण्यासाठी जेहाद आणि सामना करण्याशिवाय कोणताही पर्याय नसेल.त्यांनी ही धमकीही दिली की,हे युद्ध केवळ दोन देशापर्यंत सिमित राहणार नाही तर याची झळ संपूर्ण जगाला बसेल.जर पाकचे राष्ट्रपती आपल्या ७३ व्या स्वातंत्र्य दिवसाच्या मुहुर्तावर आयोजित ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी जर अशा प्रकारची भाषा बोलतात,तर पाकिस्तान मध्ये सध्या किती तणावाचे वातावरण आहे याची कल्पना येवू शकते.पाकचे नेते तेथील तरूणांना भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत.इमरान खान यांनी म्हटले आहे की,त्यांना सूचना मिळाली आहे की,ज्याप्रकारे भारताने पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोट मध्ये कारवाई केली होती त्याच प्रकारे किंबहुना त्यापेक्षा मोठी कारवाई भारत पाकव्याप्त काश्मीर मध्ये करणार आहे.जेंहा पाकचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती अशा प्रकारची भाषा बोलतात तेंव्हा पाकचे सेना प्रमुख कसे गप्प बसतील?जनरल बाजवा यांनी तर सांगून टाकले की,काश्मीरसाठी पाकचे सैन्य कोणत्याही थरापर्यंत जावू शकते.
जरा विचार करा,भारताने युद्धाची भाषा अजुनतरी केलेली नाही.३७० कलम हटविण्याचे विधेयक सादर करित असताना अमित शाह यांनी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाल किल्यावरून देशाला संबोधित करतानाही नाही.देशाच्या जनतेच्या नावाने संदेश देताना त्यांनी केवळ एक वेळा पाकचा उल्लेख केला तोही पाक कलम ३७० आणि ३५ अ मुळे जम्मू-काश्मीरमध्ये हिंसा व फुटीरतावाद पसरवित होता या संदर्भात.लाल किल्ल्यावरून तर त्यांनी पाकचा उल्लेखही केला नाही.मग पाकिस्तान मध्ये ऐवढे भय का निर्माण झाले आहे?
याचे पहिले कारण हे आहे की,एकाच घावात भारताने जम्मू-काश्मीर वरिल पाकच्या दाव्याला नष्ट केले आहे.आता केवळ पाकव्याप्त काश्मीर वरिल त्याचा दावा शिल्लक आहे.पाकच्या नेत्यांना बदललेल्या भारताची कल्पना आहे,जो उरीच्या बदल्यात सर्जिकल स्ट्राईक करतो,आणि पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोट सहित तीन दहशतवादी केंद्रांवर हवाई बॉम्ब हल्ला करतो.हाच भारत डोकलाम मध्ये तब्बल ७३ दिवसांपर्यंत खंभीरपणे उभा राहून चीनी सैनिकांना मागे हटण्यासाठी विवश करतो.पाकिस्तानला ही भीती आहे की,आपल्या भागातील काश्मीर सांभाळल्यानंतर भारत बलुचिस्तान,गिलगित सोबत संपूर्ण पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी पाऊल टाकेल.मात्र यामागे जे मुळ कारण आहे ते समजून घेणे गरजेचे आहे.
खरंतर,भारताच्या या निर्णयाने पाकिस्तानच्या राष्ट्रवादावर सरळ हल्ला केला आहे.पाकिस्तानची निर्मिती हिंदू-मुसलमान दोन वेगवेगळे देश होण्याच्या उद्देशाने झाली.विभाजनापासून पाकिस्तान मानत आला आहे की,काश्मीर मुस्लिम बहुल राज्य असल्याने त्याच्यावर त्याचा हक्क आहे.पाकिस्तानचे सर्व नेते जम्मू-काश्मीर त्यांना मिळाले नसल्याने विभाजन अर्धवट झाल्याचे सांगत आले आहेत.पाकच्या या विचाराला १९७१ मध्ये धक्का पोहचला होता मात्र हा धक्का त्याहुनही मोठा असल्याचे पाकिस्तानी मानत आहेत.दूसरीकडे बलुचिस्तान मध्ये वाढता विरोध,स्वतंत्र पख्तूनिस्तानची मागणी आणि जिओ सिंध सारख्या आंदोलनांमुळे पाकिस्तान अगोदरच त्रस्त आहे.पाकिस्तान आपल्या मुस्लिम राष्ट्राच्या विचारधारेला सिद्ध करण्यासाठी कोणत्याही थरापर्यंत जावू शकतो.
पाकव्याप्त काश्मीर मध्ये आता सभा घेतल्या जात आहेत,लोकांना भडकावले जात आहे.आमचे तरूण लढण्यासाठी तयार असल्याचे बोलले जात आहे.पाकिस्तानची ही समस्या आहे की,ज्या प्रकारचे उत्तेजनापूर्ण भाषण ते देत आहे त्याची साधी दखल सुद्धा भारत घेत नाहीय.पाकला मोदी किंवा शाह आक्रमक उत्तर कधी देतात याची प्रतिक्षा आहे,ज्याच्या आधारावर तो संपूर्ण जगाला दाखवू शकेल की,बघा हे आमच्यावर हल्ला करणार आहेत.आत्तापर्यंत त्यांना असा शब्द मिळालेला नाही.त्यामुळे पाकचा जळफळाट आणखीनच वाढला आहे.हताश पाकिस्तान काय करेल याविषयी सांगणे कठिण आहे.हा त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे.आता इमरान सरकारवर खूप मोठा दबाव आहे.मोदी सरकारने जम्मू-काश्मीर बाबत हा निर्णय घेताना सर्व बाबींचा विचार नक्की केला असेल ज्यात पाकिस्तान कडून उचलल्या जाणा-या सर्व पाऊलांनाही उत्तर देण्याचा समावेश असेल.
-सुरेश मंत्री

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा