मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मढयावरच लोणी

को विड-१९ महामारीची दुसरी लाट सध्या देशात सुरू आहे. दिवसागणिक रूग्णसंख्येत वाढ होतच आहे. सोबत मोठया प्रमाणावर रेमडिसिविर इंजेक्शन्स, ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा जाणु लागला आहे. महत्वाचा प्रश्न हा आहे की, खरंच असा तुटवडा आहे की आणखीन काही ? खरंच रेमडिसिविर इंजेक्शन्स वा फैबी फ्लूच्या टॅबलेटस उपलब्ध होत नाहीत का? कोण म्हणत उपलब्ध होत नाही, फक्त आपल्याला याची किंमत चुकवावी लागेल. काही दिवसांपूर्वी माझ्या एका परिचितांचा फोन मला आला, त्यांना रेमडिसिविर इंजेक्शन पाहिजे होते. गयावया करून म्हणाले, काहीही करून उपलब्ध करून द्या. मी त्यांना समजावुन सांगितल की, नियमानूसार हे इंजेक्शन त्यांना संबंधित रूग्ण उपचार घेत असलेल्या कोविड हॉस्पीटलच देवु शकते. त्यांनी सांगितल- हॉस्पीटलवाल्यांनीच सांगितलय, बाहेरून जुगाड लावायला. काही घंटयांनंतर ते रेमडिसिविर इंजेक्शनच जुगाड बाहेरून लावण्यात यशस्वी झाले, म्हणाले- ब्लॅक मध्ये मिळालं.     हीच अवस्था ऑक्सिजन सिलेंडरच्या बाबतीत आहे. काही ठिकाणी दहा-दहा हजार रुपयांना एक-एक सिलेंडर मिळत असल्याच माझ्या ऐकण्यात आलय. पाहिजे असेल तर पैसे देवुन घेवुन जा आणि आपल्...

प्राणवायूचा तुटवडा

को रोना विषाणूच्या दुस-या लाटेने सध्या देशात थैमान घातले आहे. गुरूवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात एका दिवसात आत्तापर्यंतचे सर्वाधिक ३.१४ लाखाहून अधिक  रूग्ण आढळले तर २९०४ जणांचा बळी गेला. या महामारीला सुरूवात झाल्यापासून एखाद्या देशात इतक्या मोठया संख्येने नवीन रूग्ण सापडल्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे. यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढून १,५९,३०,९६५ इतका झाला आहे तर मृतांचा आकडा १,८४,६५७ इतका झाला आहे. सलग ४३ व्या दिवशी कोरोना रूग्णवाढीचा आलेख कायम राहिल्याने अ‍ॅक्टिव्ह रूग्णसंख्या वाढून २२,९१,४२८ इतकी झाली आहे. या वाढत्या रूग्णवाढीमुळे साहजिकच ऑक्सिजनची मागणी सुद्धा वाढत चालली आहे. देशात सर्वाधिक रूग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तर महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागल्याने, राज्य सरकार केंद्राच्या पाया पडायलाही तयार आहे पण महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनचा पुरवठा करावा अशी मागणी गुरूवारी केली. यावरून हा प्रश्न खूप गंभीर असल्याचे लक्षात येते मात्र, देशातील उपलब्ध प्राणवायूच्या वितरणाचे योग्य नियोजन केले तर यावर स...

भारतीय स्त्रीयांचे मानसिक आरोग्य

  सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. यात शारीरिक आजारांसोबत मानसिक आजारांचे वाढलेले प्रमाण ही चिंताजनक बाब आहे. नैराश्य , ऑटिझम , डायमेंशिया , बायोफ्लोर , डिप्रेशन , न्यूरोटीक , स्क्रिझोफेनिया असे न माहीत असलेले आजार जडतात. त्यामुळे या सर्व मानसिक आजारांबाबत माहिती आणि जनजागृती आणखी वाढली पाहिजे. ही जागरूकता काही अंशी घडत असली तरी स्त्रियांमधील मानसिक आजारांकडे मात्र पूर्णत: दुर्लक्ष होताना दिसत आहे. सध्याची महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची स्थिती चिंताजनक म्हणावी अशी आहे. आपल्याच लोकांकडून होणा-या अमानवीय वर्तनामुळे स्त्रियांच्या मानसिक आरोग्याची फार मोठी हानी होत असलेले सध्याचे चित्र आहे.  ‘ जागतिक आरोग्य संघटने’च्या म्हणण्यानुसार भारतामध्ये दर पाच महिलांपैकी एक महिला तर दर १२ पुरुषांपैकी एक पुरुष मानसिक आजाराला बळी पडतो. यावरून मानसिक आजाराच्या बाबतीत महिलांचे प्रमाण चिंताजनक असल्याचे स्पष्ट दिसून येतेय. संपूर्ण राष्ट्रीय आरोग्याचा विचार करता महिलांचे आरोग्य या घटकाला त्यामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे हे नाकारून चालणार नाही. म...

आता तरी गांभीर्याने घ्या....

  दे शात कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे.मुंबईसारख्या एकट्या शहरातुन दररोज दहा हजारांच्या पूढे, महाराष्ट्रातुन ५७ हजार पेक्षा जास्त आणि भारतात  एक लाखाच्या पूढे दररोज कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. गेल्या चार दिवसांत सर्वाधिक केसेस भारतात आढळत आहेत. जो अमेरिका दररोज आढळणा-या कोरोना केसेसच्या प्रकरणात एकेकाळी सर्वाधिक पूढे होता त्याला आता आपण खूप मागे टाकले आहे. दररोज वाढत जाणा-या कोरोना बाधित रुग्ण संख्येबरोबरच मृत्यूदरही त्याच प्रमाणात वाढला आहे. अनेक ठिकाणी स्मशानात जागा शिल्लक नाही. अंबाजोगाई मध्ये एकाच चितेवर आठ कोरोना बाधितांना डाग दिल्याची बातमी ताजी असतानाच काल अहमदनगर मध्ये तब्बल ४२ कोरोना बाधितांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यातुन आपण  कोरोनाची भयानकता लक्षात घ्यायला हवी. महाराष्ट्रामुळे कोरोना विरुद्ध युद्धात भारत पिछाडीवर गेल्याचा आरोप केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी नुकताच केला आहे. आरोप-प्रत्यारोप हा राजकारणाचा भागही असेल कदाचित, आपण सर्वसामान्य नागरिकांनी मात्र नियमांचे पालन केले नाही तर याची फार मोठी किंमत आपल्याला आणि पर्यायाने देशाला चुकवावी ...

सरकारी शाळांबाबत सरकारचीच अनास्था

                मा गील आठवड्यात हरियाणा मधील १०५७ प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. खूप प्रयत्न करूनही या शाळांची पटसंख्या २५ च्या पुढे जात नसल्याचे कारण यासाठी पुढे करण्यात आलं आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेमध्ये समायोजित करण्यात येईल अस शिक्षण विभागाने म्हटल आहे.                        कोरोना महामारीच्या आपत्कालिन परिस्थितीमुळे राज्य सरकारपुढे उभ्या राहिलेल्या आर्थिक संकटाचे कारण पुढे करुन महाराष्ट्रातील १० पटसंख्येखालील ४,६९० शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने २०२० मध्ये घेतला होता. यापैकी १,७१४ शाळा कोकणातील आहेत. राज्याच्या तुलनेत ही टक्केवारी ३६ टक्क्यांहुन जास्त आहे. एकट्या उत्तर प्रदेश मध्ये थोड्या थोडक्या नाही तर तब्बल ३५ हजार शाळा अशाच प्रकारे समायोजित करण्यात आल्या आहेत हे येथे लक्षात घेण्यासारखे आहे.  उत्तराखंड मध्ये जवळपास सातशे सरकारी शाळांना कुलुप लावण्यात आले. इथेही तोच राग शिक्षण विभागाने आवळला होता जो आत्ता हरियाणा मध्ये...

क्रिडा क्षेत्र कोरोनाच्या सावटाखाली

        भा रतासोबत संपूर्ण जगात कोविड-१९ महामारीला सुरुवात होवुन एक वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे. या दरम्यान या महामारीने संपूर्ण क्रिडा क्षेत्राला सुद्धा ठप्प केले होते. या महामारीचा प्रभाव कमी झाल्यानंतर खेळाडू परत मैदानात उतरले होते मात्र जगात काही ठिकाणी या महामारीची दुसरी आणि काही ठिकाणी तीसरी लाट सुरू झाल्यामुळे परत एकदा याचा परिणाम खेळ आणि खेळाडूंवर होत आहे. काही स्पर्धा परत एकदा रद्द करण्यात आल्या आहेत तर काही स्पर्धांमधुन खेळाडूंना माघार घ्यावी लागत आहे. याच ताज उदाहरण मुष्टियोद्धाचे आहे. मागील आठवड्यात स्पेनच्या कैस्टेलियोन मध्ये झालेल्या ३५ व्या बोक्साम आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताच्या तीन मुष्टियोद्ध्यांना अंतिम फेरीत पोहचल्यानंतरही कोरोनामुळे रजत पदकावर समाधान मानावे लागले होते. अॉल्मपिकसाठी क्वालीफाय केलेला आशिष कुमारचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यासोबत एका रुममध्ये राहणारे मोहम्मद हुसामुद्दीन आणि सुमित सांगवानला सुद्धा अंतिम फेरीतुन माघार घ्यावी लागली. असं मानलं जात की, या खेळाडूंच सुवर्ण पदक जिंकण पक्क होत. केवळ मुष्टियोद्धेच नाही तर...

सिनेमा बदलतोय

    न विन चित्रपटांच्या लॉन्च आणि रिलीजच्या सतत होणाऱ्या घोषणांतुन हे स्पष्ट आहे की, कोविड-१९ च्या जागतिक महामारीच्या या कठिण काळातही भारतीय चित्रपट समुदायातील लोक सक्रिय राहिले. टाळेबंदीमुळे संपूर्ण जग ठप्प पडले असताना मिळालेल्या फावल्या वेळात भावी काळातील तयारीचे नियोजन त्यांनी केले. याच कारणाने सिनेमागृहे शंभर टक्के क्षमतेने सुरू झाल्यामुळे, कोरोनावरील लस आल्यामुळे आणि थोडाफार प्रमाणात चित्रपटांचे शुटिंग सुरु झाल्यामुळे उत्साहित झालेल्या चित्रपट निर्मात्यांनी आपल्या नविन चित्रपटांच्या लॉन्च आणि रिलीजच्या तारखांच्या घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. महामारीमुळे कोरड्या झालेल्या मनोरंजनाच्या मैदानात या घोषणांच्या पावसामुळे दर्शकांसाठी लवकरच चित्रपटांचे पीक बहरेल. महत्त्वाचे म्हणजे यावेळी ओटीटीच्या रुपाने नवीन बटाईदार सुद्धा उपस्थित असेल. मागिल वर्षी पन्नास टक्के क्षमतेने चित्रपटगृहे चालवण्याची परवानगी मिळाल्यानंतरही चित्रपट बाजारात हालचाल झाली नाही. चित्रपटगृहे तर सुरु झाली मात्र दर्शक व चित्रपटांची तंगी राहिली. आता मात्र स्थिती सामान्य होताना दिसत आहे. मागिल महिन्यातच चित्रपट ...