से ल्फी काढण्यात जेवढी मजा आहे तेवढेच त्याचे चांगले-वाईट परिणामही आहेत. याचा प्रत्यय वारंवार होणाऱ्या घटनांमुळे येत असतो. वैयक्तिक जीवनात अनेकांनी सेल्फीमुळे आपला जीव गमावला आहे. मागे सेल्फी काढण्याच्या नादात गोसेखुर्द धरणाच्या कॅनॉलमध्ये बुडून दोन सख्ख्या भावंडांचा करुण अंत झाला. हे दोघे भाऊ स्वातंत्र्य दिनानिमित्त धरणावर फिरायला आले होते. सेल्फी काढताना पाय घसरलेल्या एका भावाला वाचवताना दुसऱ्यालाही प्राण गमवावे लागल्याची माहिती आहे. सेल्फीच्या वेडापायी जीव धोक्यात घालण्याचे प्रमाण सर्व वयोगटांमध्ये असले तरी ते तरुणांमध्ये अधिक प्रमाणात आहे. सेल्फीचा धोका सरकारनेही ओळखला आहे , ही यातील सकारात्मक बाब म्हणावयास हवी. खुद्द वैद्यकीय क्षेत्रानेच या वेडाला मानसिक आजार म्हटले आहे त्यामुळे या संदर्भात शाळा , महाविद्यालयांच्या पातळीवर प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत आपसुकच अशा काही नकारात्मक गोष्टींची आव्हाने समोर येत राहतील , त्यांना सामोरे जाण्याची तयारीही ठेवलीच पाहिजे. भारतातील सव्वाशे कोटी लोकांपैकी ८० कोटी लोकांकडे मोबाईल फोन आहे आणि मोबाईलचा वापर कॅमेर...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.