मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

कोण म्हणतो; भारत गरीब देश आहे

  भा रत हा जगातील श्रीमंत देशापैकी एक आहे ,  असे जर कोणी सांगितले तर त्यावर विश्वास बसणार नाही. पण वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने नुकताच एक अहवाल जारी केला आहे. तो पाहता भारतात असलेल्या सोन्यामुळे भारत नक्कीच जगात श्रीमंत देशातील एक आहे ,  असे म्हणता येणार आहे. कारण जगात सर्वाधिक सोने भारतीयांकडे आहे. आकडेवारीचा विचार केल्यास भारतीयांकडे तब्बल २१ , ७३३ टन सोने आहे. इतर देशांच्या तुलनेत हे सर्वाधिक आहे. त्यामुळे भारतीयांना सोन्याचे किती आकर्षण आहे ,  याचा अंदाज येतो. सोनं ! पिवळंधम्मक ,  झळाळतं ,  बावनकशी सोनं ! काळ बदलला ,  पिढय़ा बदलल्या ,  जगणं बदललं पण सोन्याला असलेलं महत्त्व कमी झालं नाही.   वस्तुतः मानवजातीला असणा-या सोने जड जवाहीर्‍यांसारख्या चकाकत्या वस्तुंच्या आकर्षणाचे रहस्य मानववंशास्त्राला अद्यापी पुर्णतया उलगडले नसावे. बाकी जगातल्या लोकांना सोन्याचे वेड नसतेच असे नाही पण त्यात संपत्ती प्रेम अधिक आहे ,  भारतीयांच्या सुवर्ण प्रेमाचे स्वरुप आभूषण प्रेमाचे असावे. आपल्या देशात सोन्याचे वेड आणि परंपरा फार पूर्वीपासून आहे.   सोने म्हण...

ज्येष्ठांना आता केंद्राचा आधार

  भारतात वृद्धांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात अलिकडे ज्येष्ठ नागरिकांची आबाळही होत आहे. त्यामुळे अनेकांचा जगण्याचाही प्रश्न निर्माण होत आहे. अशावेळी ज्येष्ठांना आरोग्य विषयक आणि मानसिक आधार देणे गरजेचे असते. त्यामुळे वृद्धांना अधिकाधिक सुविधा देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी केंद्र सरकारने जोरदार मोहीम सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून केंद्र सरकारने सर्वच राज्यांकडून ज्येष्ठांशी संबंधित सुविधांची योजनांबद्दल सूचना मागविल्या आहेत. यामध्ये ज्येष्ठांना अधिकाधिक आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न राहणार असून , प्रत्येक जिल्ह्यात एक वृद्धाश्रम उभारण्याचीही केंद्र सरकारची योजना आहे. आगामी काळात केंद्र सरकार त्यादृष्टीने प्रयत्न करणार आहे. कुटुंबात मिळणाऱ्या सोयी सुविधा , आधुनिक उपचारपद्धती , वैद्यकीय सुविधा , राहणीमान , सकस आहार व आरोग्याविषयी जागृती निर्माण झाल्यामुळे आयुर्मानात वाढ होत आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे तरुण वर्ग व्यवसाय , नोकरीनिमित्ताने ग्रामीण भागातून शहराकडे व एका शहरातून दुसऱ्या शहराकडे स्थलांतरित होत आहे. त्यामुळे स्थलांतराच्या वाढत्या प्र...

महागाईचा भडका त्यावर गॅस सिलेंडर दरवाढीचा तडका

  पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेचे महागाईने कंबरडे मोडले आहे. गेल्या काही महिन्यांपासून देशात महागाई प्रचंड वेगानं वाढताना दिसत आहे. महागाईने उच्चांक गाठला आहे. परिणामी केंद्र सरकारला देखील टीकेचा सामना करावा लागत आहे. अशातच महागाई कमी होण्याऐवजी परत एकदा वाढल्याचं दिसत आहे. पेट्रोल-डिझेल , खाण्यापिण्याच्या , वापरायच्या अनेक वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे . आता खिशाला भोकं नाही तर वणवाच लागल्यासारखे होत आहे. आरबीआयने महागाई वाढल्यामुळे काही दिवसांपूर्वीच अचानक मीटिंग घेत रेपो रेट वाढविले होते. यामुळे लोकांनी घेतलेल्या कर्जावरील व्याजदर वाढणार आहेत. २२ मार्चपासून सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत आहे. सर्वसामान्य नागरिक पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईचा सामना करत असताना नुकतीच एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. घरगुती वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसचे दर हजाराजवळ गेले आहेत. आता सिलेंडरचे वाढलेले दर सर्वसामान्यांचा खिसा रिकामी करण्यासाठी पुरेसे आहेत. आधीच कोरोना महामारीमुळे ...