मुख्य सामग्रीवर वगळा

कोण म्हणतो; भारत गरीब देश आहे


 भारत हा जगातील श्रीमंत देशापैकी एक आहेअसे जर कोणी सांगितले तर त्यावर विश्वास बसणार नाही. पण वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने नुकताच एक अहवाल जारी केला आहे. तो पाहता भारतात असलेल्या सोन्यामुळे भारत नक्कीच जगात श्रीमंत देशातील एक आहेअसे म्हणता येणार आहे. कारण जगात सर्वाधिक सोने भारतीयांकडे आहे. आकडेवारीचा विचार केल्यास भारतीयांकडे तब्बल २१,७३३ टन सोने आहे. इतर देशांच्या तुलनेत हे सर्वाधिक आहे. त्यामुळे भारतीयांना सोन्याचे किती आकर्षण आहेयाचा अंदाज येतो.

सोनं ! पिवळंधम्मकझळाळतंबावनकशी सोनं ! काळ बदललापिढय़ा बदलल्याजगणं बदललं पण सोन्याला असलेलं महत्त्व कमी झालं नाही. वस्तुतः मानवजातीला असणा-या सोने जड जवाहीर्‍यांसारख्या चकाकत्या वस्तुंच्या आकर्षणाचे रहस्य मानववंशास्त्राला अद्यापी पुर्णतया उलगडले नसावे. बाकी जगातल्या लोकांना सोन्याचे वेड नसतेच असे नाही पण त्यात संपत्ती प्रेम अधिक आहेभारतीयांच्या सुवर्ण प्रेमाचे स्वरुप आभूषण प्रेमाचे असावे. आपल्या देशात सोन्याचे वेड आणि परंपरा फार पूर्वीपासून आहे. सोने म्हणजे भारतीयांचा विशेषत: महिलांचा आवडता विषय. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतीय सोन्यावर अधिक प्रेम करतात. भारतीयांचे आणि त्यातही भारतीय स्त्री आणि त्यानंतर भारतीय अदृश्यस्रोतोद्गम सुवर्णप्रदर्शक पुरुषधनींचे ही पिवळ्या चकाकत्या धातूवर एवढे प्रेम एवढे वरचढ आहे की सोन्याच्या बाजारपेठेतील जागतीक किमतीची चढ उतार भारतातल्या लग्नांच्या मोसमावर ठरतेआणि सोन्याने तुम्हाला वेडे केले आहे टिकेनी म्हटले तरीहीभारतीयांना आपल्या पाठीवर शाबासकीची थाप पडल्यासारखे कौतुक वाटते. भारतीयांना सोनं खास प्रिय आहे यात वादच नाही. घरोघरी गृहिणी सोन्याच्या दागिन्यांची हौस जपतात. सोन्याचे दागिने पिढ्यान् पिढ्या वापरले जातातजपले जातात. लग्नासारख्या मोठ्या समारंभापासून छोट्या कार्यक्रमापर्यंत सोन्याचे दागिने घातल्याशिवाय महिलांची हौस फिटत नाही. भारतात विविध सणपरंपरा आणि लग्न समारंभात सोन्याचे दागिने विकत घेण्याची प्रथा आहे. त्यामुळे सातत्याने अनेकजण विविध कारणांनी सोन्याची दागिने खरेदी करत असतात. त्याशिवाय सोन्याचे दागिने खरेदी करणे ही सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. सोन्याच्या खरेदीकडे ग्राहकांचा नेहमीच कल राहिला आहे. सोने तारण ठेवून कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाणही भारतात मोठे आहे. त्यामुळेच त्यात समाजातील सर्वच स्तरांमध्ये सोने खरेदीकडे ओढा असल्याचे दिसून येते.

ऐतिहासिक काळापासून जागतीक व्यापारात निर्यात करण्याच्या बदल्यात भारतीय व्यापारी आणि जनतेने इतर वस्तु घेण्यापेक्षा सोने घेण्यासच प्राधान्य दिले असावे. भारतीय जनतेची सोन्याची मागणी पुर्ण करु शकेल इतपत प्रमाणात सोन्याच्या खाणी भारतात बहुधा इतिहासात सुद्धा राहील्या नसाव्याततरीही भारतीय एवढे सोने मिळवत आणि बायकांना आणि देवांना दागिन्याने मढवत कि अफगाणी लूटारुंनी भारतावर सातत्याने हल्ले केले. बाबराचे आत्मचरित्र र्रेकॉर्डेड आहे आणि तो त्यात भारतात सोन खूप आहे ते मिळवण्यासाठी भारतावर स्वारी करु इच्छित असल्याचे स्पष्ट नोंदवले आहे. अर्थात वर म्हटल्याप्रमाणे अफगाण लुटारुंचे सुवर्ण प्रेमाचे स्वरुप संपत्ती प्रेमाचे राहीले असावे. अगदी ब्रिटिश इस्ट इंडीया कंपनीच्या उत्तरार्धापर्यंत त्यांना त्यांच्या मालाचा मोबदला असो का राजे लोकांचा कर असो तो सोन्याच्याच स्वरुपात चुकवावा लागत असेआणि भारतीयांच्या सुवर्णप्रेमाने ब्रिटीशही हवालदिल होत.

जोपर्यंत भारत निर्यात अधिक होतीआयातीची गरज नव्हती तोपर्यंत चालुन गेलेवसाहत-उत्तर काळात भारताची निर्यात कमी झाली आणि इतर आयात वाढली पण त्यासोबत सोन्याची आयात सातत्याने चालत राहीली म्हणजे परदेशात विकुन निर्यातीचा पैसा मिळवून भारतीय लोक सोन्याची आयात करत होते. आजही देशात सर्वाधिक सोने हे विदेशातून आयात केले जाते. जगात वर्षाकाठी होणा-या सोने खरेदी मध्ये भारत आणि चीन हे दोन देश आघाडीवर आहेत. या दोन्ही देशांतर्फे एकूण जागतिक सोने खरेदीच्या ५७ टक्के सोने खरेदी केले जाते. भारतात एकूण सोन्याच्या आयातीपैकी ४४ टक्के सोने स्वित्झर्लंडमधून आणि ११ टक्के संयुक्त अरब अमिरातीमधून खरेदी केले जाते. २०२१-२२ मध्ये देशाची दागिने आयात ५० टक्के वाढली असून ३९ अब्ज डॉलर्सवर गेली आहे. रिझर्व बँकेने ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत डेफिसिट म्हणजे व्यापार घाटा वाढून २३ अब्ज डॉलर्सवर गेल्याचे म्हटले आहे. एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ मध्ये देशात ८४२.२८ सोने आयात केले गेले आहे. भारतात सध्या सोन्याच्या तीन खाणी आहेत - कर्नाटकाच्या हुट्टी आणि उतीमध्ये आणि झारखंडच्या हिराबुद्दिनी इथं. गेल्या काही वर्षांपासून या तीनही खाणींमधलं उत्खनन कमी झालं आहे. त्यामुळे भारताला आता सोनं आयातीवर अवलंबून राहावं लागतं. सोन्यासाठी असणारे हे परावलंबित्व लवकरच बदलणार असून सोन्याच्या उत्खन्नामध्ये आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने भारतीय सुवर्ण उद्योगाने एक भक्कम पाऊल टाकत तब्बल २० टन सोन्याच्या खोद कामाची तयारी सुरू केली आहे.

सोन्याच्या साठ्यात देशभरात वाढ होत राहिल्याने भारत जगातील सात प्रगत देशांच्या सोन्याच्या साठ्यापेक्षाही पुढे असल्याचे दिसून येत असल्याचा अहवाल वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने दिला आहे. अमेरिका (८१३३)जर्मनी (३३८२)इटली (२४५१)फ्रान्स (२४३६)रशिया (२२९८)चीन (१९४८) सिंगापूर (१२७) टन इतका सोन्याचा साठा या सातदेशांजवळ आहे. या सातही देशांच्या सोन्याच्या साठ्याची आकडेवारी एकत्र केली तरी भारतात असलेल्या सोन्याच्या साठ्याच्या आकडेवारीपेक्षा ती कमीच आहे. भारतावर कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात खर्चही वाढत आहे. यातून भारतीयांचा दरडोई कर्जाचा बोजा वाढत आहेअसे असलेतरी भारतात असलेल्या सोन्याच्या किमतीचा विचार केलातर भारतावर जेवढा कर्जाचा बोजा आहेत्या कर्जाच्या रकमेपेक्षाही सोन्यातून अधिक रक्कम मिळू शकतेएवढे देशात सोने आहेअसे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

-         -सुरेश मंत्री.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...