मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

माझा लेखन प्रवास

  आपलं संपूर्ण आयुष्य दूस-यांची उणी-दूणी काढण्यात , त्यांच्यातील कमतरता शोधण्यात जात. स्वत:ला मात्र आपण फार कमी ओळखतो , त्यामुळे आपल्यात असलेली सुप्त कौशल्ये स्वत: आपल्याला माहित नसतात. काहीसं असच माझ्या बाबतीत झाल. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अगदी ११ वी पासून मी पत्रकारीतेला सुरूवात केली. दै. लोकप्रश्नला धारूर तालुका प्रतिनिधी म्हणून सहा वर्षे काम केल. पूढे मात्र शिक्षणासाठी आणि नंतर नोकरीसाठी गाव सोडाव लागल आणि पत्रकारीता मागे सुटली. शिक्षक म्हणून काम करित असताना शाळेत नव्याने आलेल्या नकुशाच नाव बदलण्याचा प्रस्ताव मी कार्यालयामार्फत शिक्षण विभागाकडे पाठवला. मात्र अनेक महिने लोटुनही शिक्षण विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद भेटत नव्हता. तेंव्हा परत एकदा माझ्यातील पत्रकार जागा झाला आणि स्वानुभवातून लिहिलेला ‘नकुशा’ हा लेख साकार झाला. हा माझा पहिला लेख दै. झुंजार नेता मध्ये प्रकाशित झाल्यानंतर या दैनिकाचे तत्कालिन कार्यकारी संपादक अशोक देशमुख यांनी मला फोन करून लेखाची प्रशंसा केली सोबत पूढे लेखन सुरू ठेवा अशी सूचना केली. मी हो-नाही म्हणत जरा कचरतच होकार दिला खरा पण पूढे जमेल का न...

नव साहित्यिकांना नव साहित्य चळवळीचा मार्ग सापडला

नव साहित्यिकांच्या साहित्यप्रज्ञेचा शोध घेण्याच्या आणि त्यांच्या सृजनशिलतेला मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एका नविन साहित्य चळवळीची सुरूवात येत्या ३१ मेला भूम येथून होत आहे. राष्ट्र्माता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून भूम येथील शंकरराव पाटील महाविद्यालय आणि साहित्य संघाच्या संयुक्त विद्यमाने यादिवशी पहिल्या एकदिवसिय जिल्हास्तरिय साहित्य संमेलनाचे आयोजन शंकरराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील असे नवोदित साहित्यिक ज्यांना अद्याप कुठलेही व्यासपिठ आपले साहित्य सादर करण्यासाठी भेटलेले नाही, त्यांना आपले स्वरचित साहित्य सादरीकरणाची संधी याठिकाणी भेटेलच सोबत या साहित्यिकांना अनुदान स्वरूपात, मोफत स्वरूपात किंवा सवलतीच्या दरात प्रकाशन संस्था उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न साहित्य संघाच्या माध्यमातून केला जाणार आहे. या संमेलनास नवोदित साहित्यिकांचा तसेच रसिक श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळेल यात शंका नाही. पत्रकार व लेखक शंकर खामकर यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या या संमेलनरूपी रोपट्याचे नजिकच्या काळात वटवृक्षात र...

श्रीलंकेसाठी भारत ठरतोय ‘संकटमोचन’

 मागील काही महिन्यांपासून श्रीलंका आर्थिक संकटात आहे. अन्नधान्य, इंधनाची भीषण टंचाई आहे. देशात नवीन सरकार आलं आहे. मात्र, तरीही श्रीलंकेतील आर्थिक संकट जैसे थे आहे. श्रीलंका अद्यापही देशावरील कर्ज फेडण्यासाठी सक्षम नसल्यानं इतिहासात पहिल्यांदाच देशाचा कर्जबुडव्यांच्या यादीत समावेश झाला आहे. क्रेडिट रेटिंग एजन्सी मूडीजच्या म्हणण्यानुसार, या शतकात प्रथमच आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील एखाद्या देशाने कर्ज भरण्यात चूक केली आहे. परिस्थिती वाईटाकडून वाईटाकडे गेली आहे. पेट्रोलने भरलेले जहाज समुद्रकिना-यावर उभे आहे, पण पेट्रोलने भरलेल्या जहाजाचे पैसे देण्यासाठी त्यांच्याकडे अमेरिकन डॉलर नाहीत. याव्यतिरिक्त मागील मालाचे आणखी ५.३ कोटी डॉलर्स देणे बाकी आहे. त्याचवेळी देशभरातील लोक पेट्रोलसाठी रांगेत उभे आहेत. आर्थिक संकटात असलेल्या श्रीलंकेच्या या कठिण काळात भारत संकटमोचन म्हणून धावला आहे. भारताने श्रीलंकेला मदतीचा हात दिला आहे. श्रीलंकेत पेट्रोलचा मोठा तुटवडा आहे. भारताने सोमवारी ४० हजार मेट्रिक टन पेट्रोल श्रीलंकेला पाठवले आहे. श्रीलंकेतील राजकीय अस्थिरतेमागे चीनच्या कर्जाचा सापळा हे एक महत्त्वा...

ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची दुरावस्था

भारतात बहुसंख्य लोकसंख्या ग्रामीण भागात आहे. आजपर्यंत ग्रामीण व्यवस्थेला बळकटी आणण्याच्या दृष्टीने ब-याच योजना राबविल्या गेल्या. परंतु अजूनही या भागाचा विकास म्हणावा तसा झालेला नाही. अजूनही ग्रामीण भागात मूलभूत प्रश्नांचा सामना करावा लागतो. त्यात आरोग्याच्या दृष्टीने ग्रामीण भाग पिछाडीवर आहे. अन्न , वस्त्र आणि निवारा याप्रमाणेच आरोग्य हा देखील नागरिकाचा मुलभूत हक्क असतो आणि त्यासाठी लोककल्याणकारी सरकारने नियोजनबद्ध कार्यक्रम आखावा लागतो. अशा कार्यक्रमांसाठी आणि योजनांसाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद करावी लागते. आज आपला देश सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी जीडीपीच्या फक्त १.२५% खर्च करतो. ब्रिक्स गटातील इतर देशांचा हा आकडा ब्राझिल ९.२% , साउथ आफ्रिका ८.१% , रशिया ५.३% आणि चीन ५% असा आहे. आपला शेजारी भूतान २.१% आणि श्रीलंका १.६% हेही आपल्या पुढे आहेत. सार्वजनिक आरोग्यासाठी खर्च करण्यात आपण जगात खालून ५ वे म्हणजे १५४ वे आहोत. साहजिकच सर्वांगिण आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक असणा-या गोष्टी पूर्णत्वास जात नाहीत. जनतेच्या आरोग्याचा कळवळा आणत सरकारने गाव पातळीवर प्राथमिक आरोग्य केंद्र उभारल...

प्लास्टिकपासून रस्ते निर्मिती

  र स्ते डांबरापासून ,  सिमेंट काँक्रिटपासून तयार केले जातात.   डांबर ,  जो प्रत्येकाला परिचित आहे ,  त्यात शेल ,  कोळसा आणि तेल यांसारख्या खनिजांपासून मिळवलेल्या रेव ,  वाळू आणि बिटुमन यांचा समावेश होतो.   ही सर्व संसाधने वर्षानुवर्षे अधिकाधिक कमी होत आहेत ,  अधिकाधिक महाग होत आहेत.   त्यामुळेच डांबर ,  सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करण्यासाठी येणारा खर्च अधिक असतो. हे रस्ते दीर्घकाळ टिकतही   नाहीत.   मात्र लवकरच देशात टायर आणि प्लास्टिकचे रस्ते दिसू लागतील.   त्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात दोन-तीन स्क्रॅपिंग सेंटर उघडण्याची सरकारची योजना   आहे. देशभरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा निर्माण होत असतो. गेल्या काही वर्षांत प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. भारतात दररोज २५ , ९४० टन प्लास्टिक कचरा तयार होतो. हा कचरा ४ , ३०० हत्तींच्या वजनाएवढा आहे.   त्यापैकी सुमारे ४० टक्के कचरा जमवलाही जात नाही अथवा त्यावर पुनर्वापरासाठी प्रक्रियाही केली जात नाही ,  त...