मुख्य सामग्रीवर वगळा

जायभायवाडीकरांना सलाम


नुकताच सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा निकाल जाहीर झाला.धारूर तालुक्यातील जायभायवाडी या छोटयाश्या गावाला राज्यातून विभागून दूसरा क्रमांक मिळाला.बालेवाडी,पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.पाणी फाऊंडेशनकडून १५ लाख आणि शासनाकडूनही १५ लाख असे ३० लाख रूपयांचे बक्षीस जायभायवाडीला मिळाले आहे.सगळे गाव एकजुट झाले तर गावाचा विकास कसा साधता येतो हे या वाडीने दाखवून दिले आहे.या यशामुळे केवळ धारूर तालुक्याचीच नाही तर बीड जिल्हयाची मान उंचावली आहे.
गेल्या वर्षी अभिनेता आमीर खानच्या पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेची घोषणा झाल्यानंतर इतर तालुक्यांसोबत धारूर तालुक्याने सुद्धा सहभागी होण्याचे निश्चित केले.तालुक्यातील कोळ पिंपरी,व्हटकरवाडी,आम्ला या गावांनी या स्पर्धेत सुरवातीला आपला सहभाग नोंदविला होता.जायभायवाडी हे धारूर पासून १५ किमी अंतरावर असलेले छोटेशे पण निसर्गरम्य गाव.या वाडीची लोकसंख्या अवघी २१३ आणि माणस मात्र प्रचंड सकारात्मक.चारही बाजूंनी डोंगराने वेढलेल्या या गावात प्रवेश करताच एक वेगळीच उर्जा जाणवते.वाडीतील बहुसंख्य लोकांचा व्यवसाय शेती आहे.मात्र येथील अधिकाधिक शेती ही डोंगराळ असल्याने वहीती क्षेत्र खूप कमी आहे.जी शेती आहे ती निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे.प्यायलाच पाणी उरत नाही तर शेतीचा विषय सोडाच.शेती फक्त खरीपापूरतीच.अनेक गावांना शाप असलेला टँकर देखील इथल्या दुर्गम आणि डोंगराळ परिस्थितीमुळे गावात येवू शकत नाही.गावात कोणतीही बस येत नाही.हिवाळा आणि उन्हाळा भयाण दुष्काळ.शेती उत्पन्न अत्यल्प असल्याने सप्टेंबर-ऑक्टोंबर पासून जोपर्यंत साखर कारखाने चालू आहेत तोपर्यंत येथील ९९ टक्के ग्रामस्थ पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात उसतोडीला जातात.गावात ४ थी पर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे.चौथीनंतरच्या पूढील शिक्षणासाठी येथील मुलांना ४ किमी पायपीट करित जावे लागते.त्यामुळे अनेक मुले आपले पूढील शिक्षण सोडून देतात.त्यामुळे गावात उच्च शिक्षीत तरुणांची संख्या बोटावर मोजण्याईतकी आहे.कारखान्याच्या हंगामाच्या काळात गावात असतात ती फक्त शाळेत जाणारी मुलं आणि त्यांना सांभाळणारी वयोवृद्ध माणसं.
               स्वत:च्या गावात उत्पन्नाचे कसलेही साधन नसल्याने ही भीषण परिस्थिती दरवर्षी यायची.पाऊस आला की एकदम पडायचा आणि सगळ पाणी वाहून जायच.या वाहून जाणा-या पाण्याचा वेगही प्रचंड असायचा कारण सर्व बाजूंनी डोंगर आहे.याच वेगाने वाहून जाणा-या पाण्यात गेल्या वर्षी गावातील रुख्मिणबाई जायभाय यांचा दुर्देवी मृत्यू झाला होता.म्हणजे पाणी असायच तेंव्हा पूरासारखी स्थिती आणि नसेल तेंव्हा दुष्काळ.येथे शाळेत कार्यरत असलेले शिक्षक गव्हाणे यांनी या स्पर्धेत गावचा सहभाग नोंदविण्याची कल्पना गावक-यांसमोर मांडली आणि त्यांना सहभागी होण्यासाठी प्रेरीत केले.या गावचे रहिवाशी असलेले डॉ.सुंदर जायभाय वडवणी येथे आपला वैदयकीय व्यवसाय करतात.स्पर्धेच्या ४५ दिवसांच्या काळात आपला उत्तम चाललेला दवाखाना पूर्णपणे बंद ठेवून आणि तालुक्याच्या ठिकाणी असलेल घर सोडून ग्रामस्थांना सहकार्य करण्याची तयारी त्यांनी दर्शविली. जायभायवाडीकर या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविण्यास तयार झाले.
अचंबित सुरूवात

दिलेल्या शब्दाप्रमाणे डॉक्टरांनी वाडीत ६० दिवस मुक्कम ठोकला.स्पर्धेचे प्रशिक्षण,गावक-यांची जागृती,हायड्रोमार्करने मार्किंग अशी एक न अनेक कामे डॉक्टरांनी निष्णातपणे पार पाडली.स्पर्धेला सूरुवात होण्यापूर्वी डॉ.सुंदर जायभाय व इतर चार जण जल संधारणाचे काम कसे करायचे याचे प्रशिक्षण पाणी फाउंडेशनकडून घेवून आले.यानंतर प्रत्यक्ष कामाला सूरूवात झाली.यातील काही काम यांत्रीक पध्दतीने तर बरेचशे काम हे श्रमदानातून करावयाचे होते.स्पर्धा सूरू होण्याच्या आदल्या दिवशी श्रमदानाची घोषणा करण्यात आली.प्रत्यक्ष स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सकाळी सात वाजता फक्त २५ जणांना बघून हे लोक थोडे नाराज झाले.पहिल्याच दिवशी ही परिस्थिती तर पूढे काय असा विचार करत असतानाच रांगाच्या रांगा डोंगराकडे येताना दिसल्या.पहिल्याच दिवशी २०० लोक हजर राहिले.सुरूवातच जोरदार झाल्याने गावाने मागे वळून पाहिल नाही.सर्व ग्रामस्थ मिळून स.६ ते १० व संध्या.४ ते ६ नियमीत श्रमदानाला सूरूवात झाली.
धर्मराजची जिद्द
कामाला वेग आला असतानाच अघटीत घडलं.श्रमदानात सर्वात आघाडीवर असलेल्यापैकी एक आणि सर्वांकडून काम करून घेण्याची जबाबदारी असलेल्या धर्मराज नावाच्या तरूणाला एका बैलाने अक्षरश: तुडवल.सगळ्या चेह-यावर आणि शरीरावर जखमा झाल्या.काम तर दूर,चालतानाही येत नाही अशी परिस्थिती.नाकावर,डोक्यावर मिळून असे सहा टाके पडले.डॉक्टरांनी १५ दिवस हालचालही करण्यास मनाई केली.गावासमोर खूप मोठ संकट उभा टाकल.अंथरूणाला पाठ लागली तरी छाती संकटाचे घाव झेलायला तयार होती.मनगटातली रग कायम होती.तिस-या दिवशी धर्मराज श्रमदानासाठी हजर झाला.गावाप्रती जबाबदारीची जाणिव आणि तळमळीमुळे हे शक्य होवू शकल.त्याची ही भावना एखादया सीमीवर लढणा-या सैनिकापेक्षा वेगळी नव्हती.
           सूरूवातीचे काही दिवस काम दिशाहिन झाले असताना पाणी फाउंडेशनचे मराठवाडा समन्वयक शेख इरफान व संतोष शिनगारे यांच्या मार्गदर्शनातून कामाला योग्य दिशा मिळाली.यांत्रिक पद्धतीने काम करण्यासाठी लागणा-या जेसीबी आणि पोकलेन मशिन्स ज्ञानप्रबोधिनी आणि भारतीय जैन संघटनेने मोफत पुरवल्या.शेख इरफान,संतोष शिनगारे आणि ज्ञानप्रबोधिनीचे प्रसाद चिकशे,अभिजीत जोंधळे यांनी येथे चालणा-या कामाला सतत भेटी देवून गावक-यांच्या सतत बैठका घेतल्या.

                     वचिष्ठ जायभाय यांनी केली कमाल
स्पर्धेच्या काळात अडचणींवर मात करत पूढे जाणा-या अनेक जिद्दी लोकांची नविन ओळख गावाला झाली.स्पर्धा अंतीम टप्प्यात आली असताना पोकलेन चालकाच्या हलगर्जीपणा मुळे  कामाच टार्गेट पूर्ण करण कठिण होत चालल होत.आता काय करायच हा प्रश्न आ वासून उभा राहिला.या समस्येवर तात्पुरता तोडगा म्हणून पोकलेन चालवण्याचा कसलाही पूर्वानूभव नसताना ४० वर्षाचे वचिष्ठ जायभाय यांनी धडपडत पोकलेन चालवायला घेतल आणि काय आश्चर्य,पूढचे १०-१२ दिवस मशिनच काम पूर्ण होईपर्यंत वचिष्ठ डोंगरावरून खाली उतरलेच नाहीत.आंघोळ,जेवण सर्व काही मशिन जवळच.त्यांच्या या प्रयत्नांमुळे कुठेही न थांबता काम करत राहण्याच बळ इतरांना मिळाल हे निश्चित.
स्पर्धेच्या शेवटच्या १२ दिवसात श्रमदान करणा-यांचा उत्साह वाढवण्यासाठी मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार ठेवण्यात आले.दररोज दिवसभरात सर्वात जास्त काम करणा-या जोडीला ११००/- रुपये प्रमाणे बक्षीस देण्यात आले तर १२ दिवसात सर्वात जास्त श्रमदान करणा-या जोडीच्या एका मुलाचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च ज्ञानप्रबोधिनीने उचलायचे.८ एप्रिल ते २२ मे या ४५ दिवसांच्या कालावधीत माती नाला बांध,कमपारमेंट बल्डींग,शेततळे,नाला खोलीकरण,विहीर पुनर्भरण,सलग समपातळी चर,सिमेंट नाला बांध दुरुस्ती,वृक्षारोपण खड्डे अशी किती तरी कामे पाणी फाउंडेशनने ठरवून दिलेल्या उद्दीष्टांपेक्षाही जास्त करण्यात आली.

‘‘ स्पर्धेच्या दरम्यान गावात एकही गुन्हा घडला नाही,भांडणं झाली नाहीत.गुडघे दुखी,कंबरेचे आजार कुठच्या कुठे पळाले.लोकांच्या तब्येती सुधारल्या.औषधांशिवाय आजार बरे झाले’’ डॉ.सुंदर जायभाय सांगत होते.
पत्रकार अनिल महाजन यांचे मोलाचे योगदान
यांत्रीक कामासाठी लागणा-या जेसीबी आणि पोकलेन जरी ज्ञानप्रबोधिनी आणि भारतीय जैन संघटनेने उपलब्ध करून दिल्या तरी यासाठी प्रती दिवस लागणारा पन्नास हजार रुपये प्रमाणे डिझेल खर्च गावक-यांनी करायचा होता.अगोदरच दारिद्रय असलेल्या गावक-यांना हा खर्च करणे अशक्य होते.मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव पत्रकार अनिल महाजन यांनी गावक-यांना सोबत घेवून विविध क्षेत्रातील मान्यवरांची भेट घेतली आणि बराच आवश्यक निधी जमा करून दिला तर गावक-यांनी काही लोकवाटा यात टाकला.महाजन यांनी स्पर्धेच्या काळात सतत जायभायवाडीला भेट देवून गावक-यांना मार्गदर्शन केले.सामान्यत: अनेक गावे राजकारणामुळे गटा-तटात विभागलेली असतात,त्यामुळे गावचा विकास होत नाही.महाजन यांनी गावक-यांना श्रेयवादापासून दूर ठेवण्याचे,त्यांच्यात एकजुट कायम ठेवण्याचे काम केले.स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी मी त्यांच्या सोबत जायभायवाडीला भेट दिली होती.त्यावेळी त्यांची वाडीच्या विकासाबद्दल असलेली तळमळ मी बघितली होती.काहीही करून वाडीने स्पर्धेत नाव कमावले पाहिजे या दृष्टीने ते सतत प्रयत्न करत होते.स्पर्धा संपल्यानंतर परिक्षणासाठी गावात राज्यस्तरीय टीम येणार होती.त्यांना मार्गदर्शक म्हणून गावक-यांनी जागोजागी बॅनर्स लावले होते.मात्र आदल्या दिवशी अचानक सोसाटयाचा वारा सुटल्यामुळे सर्व बॅनर्स फाटली.डॉ.जायभाय यांना काय करावे ते सुचेना.ते महाजन यांच्याकडे आले.महाजन यांनी तात्काळ यंत्रणा कामाला लावून रातोरात बॅनर्स लावून दिली.यापुढेही जायभायवाडीच्या शैक्षणिक आणि कृषी विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.
 या वर्षी अत्यल्प पाऊस होवूनही जायभयवाडीने जणू हिरवा शालू पांघरला आहे.इथे पडणारा पावसाचा थेंब न थेंब आता जमीनीत मुरत आहे.स्वातंत्र्याच्या ७० वर्षात जायभायवाडीचे नाव कुठल्याही वर्तमानपत्रात आल नव्हत.अशा नावाच गाव धारूर तालुक्यात आहे हेही लोकांना माहित नव्हत.अशा जायभायवाडीने आपला कणखरपणा दाखवत वॉटर कप स्पर्धेत राज्यातून द्वितीय क्रमांक पटकावून अनेक गावांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.जायभायवाडीकरांच्या या जिद्दीला सलाम.



अ.क्र.
मृदा व जलसंधारण उपचाराचे नाव
नियोजित
आराखडा
व एकक

झालेले काम घनमीटर

झालेले काम
संख्येत
होणारा पाणीसाठा
लीटर

मनुष्यबळाची कामे

यंत्राची
कामे
०१
सांडपाण्याचा शोष खड्डा
४३

४८
१५५४९००
४८

०२
वृक्ष लागवडी करिता खड्डे
२१३

६०५

६०५

०३
सलग सम पातळी चर

२६४८

२६४८०००
२६४८

०४
अवघड दगडी बांध

३८४
२५
३८४०००
३८४

०५
माती नाला बांध
५५३६३.८७
५५३६३८७०

५५३६३.८७
०६
कमपारमेंट बल्डिंग

३६४३

३६४३०००

३६४३
०७
शेततळे
१३०७३
१३०७३०००

१३०७३
०८
नाला खोलीकरण

८७९६

८७९६०००

८७९६
०९
विहीर पुनर्भरण



१०
मातीनाला बांध दुरुस्ती

१८२२

११
सिमेंट नाला बांध दुरुस्ती

१४१७५०

१२
पाझर तलाव दुरुस्ती

७५०००००

१३
जला बचतीची
साधने
२ हे.

७.२० हे.



१४
जल बचत म्हणी





१५
खोल समपातळी चर

२५६१४

२५६१४०००

२५६१४
एकूण




११८७२०३४२




-सुरेश मंत्री

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...