मुख्य सामग्रीवर वगळा

केरला स्टोरीने पठाणला पछाडले

द केरळ स्टोरी या चित्रपटावरुन वाद तर सुरुच आहे. राजकीय पक्षाच्या आक्षेप आणि चित्रपटाला बंदी घालण्याची मागणी, काहींचा पाठिंबा तर काहींचा कट्टर विरोध मात्र वादासोबत चित्रपटाची कमाई देखील तितकीच जोराने सुरु आहे. पहिल्या दिवसापासून चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. चित्रपटाला रिलिज होऊन दहा दिवस झाले असले तरी हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तयार करत आहे.

पहिल्या वीकेंडमध्ये धमाकेदार कमाई केल्यानंतर द केरळ स्टोरीने दुस-या वीकेंडलाही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. द केरळ स्टोरीच्­या कमाईत दुस-या रविवारी म्हणजेच १० व्या दिवशी २३ कोटींच्या आसपास कमाई झाली. यासह, द केरळ स्टोरीची एकूण कमाई आता १३५.९९ कोटी रुपयांवर गेली आहे. तर दुसरीकडे शाहरुखचा सुपरहिट चित्रपट पठाण ज्याने बॉक्स ऑफिसवर १००० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाचा रेकॉर्डही द केरळ स्टोरीने मोडला आहे. शाहरुख खानच्या पठाणने १० व्या दिवशी देशभरातील सर्व भाषांमध्ये केवळ १४ कोटींची कमाई केली आहे, तर द केरळ स्टोरीने १० व्या दिवशी यापेक्षा ९ कोटी जास्त कमाई केली आहे.

                     सुदीप्तो सेन यांनी निर्मीत आणि दिग्दर्शित केलेली द केरळ स्टोरी या चित्रपटाची कथा ३ गैर-मुस्लिम महिलांभोवती फिरते ज्यांचे ब्रेनवॉश करून दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यास भाग पाडले जाते. अभिनेत्री अदा शर्मा हीची यात प्रमुख भुमिका आहे. आधीच्या चित्रपटानं तिला जितकी ओळख मिळवुन दिली नाही तितकी प्रसिद्धी तिला केवळ द केरळ स्टोरीने दिली आहे. या चित्रपटाने तिला वेगळीच ओळख निर्माण करुन दिली आहे. चित्रपटात अदा शर्मा व्यतिरिक्त योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...