महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिर प्रवेशासाठी मंदिर प्रशासनाने नियमावली तयार केली होती. तुळजाभवानी मंदिरात अंगप्रदर्शन करणारे वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना नो एन्ट्री केली होती. अंगप्रदर्शन, उत्तेजक, असभ्य, हाफ पॅन्ट, बर्मुडाधारकांना मंदिरात प्रवेश नाही. कपडे परिधान करण्याचा नियम फक्त महिलांसाठीच नाही तर हा नियम पुरुषांसाठीसुद्धा लागू केला होता. भारतीय संस्कृती व सभ्यतेचे भान ठेवण्याचे मंदिर संस्थांनने आवाहन केले होते. तुळजाभवानी मंदिर संस्थानने मंदिर परिसरात याबाबतचे फलक लावले होते. संस्थानच्या या निर्णयाचे मंदिरातील पुजारी आणि स्थानिक भाविकांनी स्वागत केले होते. परंतु काही जणांनी विरोधही केला.
गुरुवारी दुपार नंतर वेस्टर्न कपडे किंवा तोडके कपडे असणाऱ्या कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. परंतु यानंतर समाजातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला. तुळजाभवानी मंदीर संस्थानने भाविकांच्या ड्रेस कोडवरून यु टर्न घेतला आहे. तो निर्णय मागे घेतला असून बॅनर काढले आहेत. मंदिर प्रशासनाने अवघ्या ७ तासात आपली भूमिका बदलत निर्णय मागे घेतला आहे. मंदिरात आता भाविकांना कपड्याच्या कोणत्याही निर्बंधा शिवाय प्रवेश दिला जात आहे. आता मंदिरात जातांना कोणतेही निर्बंध नसणार आहे.
.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा