मुख्य सामग्रीवर वगळा

'द केरळ स्टोरी' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर डंका

 

द केरळ स्टोरी’ हा चित्रपट ५ मे रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वी त्यावरून बराच मोठा वाद निर्माण झाला होता. अजूनही काही राज्यांमध्ये या चित्रपटाला विरोध केला जात आहे. मात्र या वादानंतरही चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी जवळपास १६.६० कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत हा चित्रपट ५० कोटींचा टप्पा सहजरित्या गाठू शकेल, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक वर्तवत आहेत.  ज्या ज्या चित्रपटावरून वाद निर्माण झाला किंवा ज्याला प्रदर्शनाआधीच विरोध करण्यात आला, त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केल्याचा बॉलिवूडचा इतिहासच आहे. याआधी विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबाबतही हेच घडलं होतं. इतकंच नव्हे तर शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटानेही वादानंतर तुफान कमाई केली होती. त्यामुळे ‘द केरळ स्टोरी’लाही वादाचा फायदा झाल्याचं म्हटलं जातंय.

 'द केरळ स्टोरी' विरोधात काल चेन्नईत निदर्शन झालं.  सिनेमाच्या निर्माते, कलाकार आणि दिग्दर्शकाविरोधात तमिलर पार्टीच्या कार्यकर्त्यांनी स्कायवॉक मॉलजवळ विरोध प्रदर्शन केले. हे बघताच सुरक्षेच्या कारणास्तव थिएटर मालकांनी स्क्रीनिंग थांबवली. या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बेलानी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाला प्रचारकी म्हणणाऱ्यांना अभिनेत्री अदा शर्माने ट्विट करत सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘..आणि जे काही लोक ‘द केरळ स्टोरी’ला अजूनही प्रचारकी चित्रपट असं म्हणत आहेत, अनेक भारतीय पीडितांकडून घटना ऐकूनही असं काही घडलंच नाही असं म्हणत आहेत.. त्यांना माझी नम्र विनंती आहे की गुगलवर फक्त दोन शब्द सर्च करावेत. ISIS आणि ब्राइड्स हे दोन शब्द गुगलवर सर्च करा, कदाचित गोऱ्या मुलींच्या अकाऊंटवर सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला खऱ्या वाटतील आणि आपला भारतीय चित्रपट खरा आहे याची प्रचिती येईल’, असं तिने लिहिलं आहे.

या चित्रपटाची ३ दिवसातील कमाई

शुक्रवार – ८ कोटी रुपये

शनिवार – ११.२२ कोटी रुपये

रविवार- १६.६० कोटी रुपये

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...