मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

लोक काय म्हणतील ?

आ पल्याला माहित आहे का , सर्वात मोठा रोग कोणता आहे ? हा रोग म्हणजे लोक काय म्हणतील ? प्रत्येक माणसाची दोन रुपे असतात , एक त्याचे खरे रुप ज्याला तो फक्त स्वत: जाणतो आणि दुसरे रुप जे तो लोकांसाठी जगतो. पहिले रुप हे बालवयातच उत्पन्न होते. ज्यात ना कशाची चिंता असते , ना भिती. या वयात काहीही करण्याची तयारी असते. काही तरी नविन शिकण्याची ईच्छा आणि उमेद असते. पण व्यक्ती जस-जशी मोठी होत जाते तस-तशे स्वत:च्या विचारांचे दमन व्हायला सुरुवात होते आणि हळू-हळू लोक आपले विचार थोपवायला सुरुवात करतात. काळाच्या ओघात व्यक्तीचे बालपणीचे पहिले रुप कुठेतरी लुप्त होते आणि दुसरे रुप उदयाला येते जे लोकांच्या विचारानूसार असायला हवे. मग ती प्रत्येक वेळी वागताना , बोलताना एकच विचार करायाला लागते , लोक काय म्हणतील ? कधी-कधी तर लोकांच्या काही म्हणायच्या अगोदर व्यक्ती स्वत:च लोक काय म्हणतील ? हे ठरवते. मी कोण आहे , मला काय हव , मी काय बनू ईच्छीतो हे सगळ विसरून लोकांच्या मतानूसार जगायला सुरुवात करते. आपल्यातील ९० टक्के लोकांना यामुळे कधी जीवन जगण्यातील ख‌-या आनंदाला तर कधी मोठया यशाला मुकावे लागते. मी अशा अ...

लोकप्रतिनिधी आणि त्यांची शैक्षणिक पात्रता

लोकप्रतिनिधी आणि त्यांची शैक्षणिक पात्रता राजकारणात नेहमी सुधारणेची चर्चा करणारे लोक मात्र ज्या-ज्या वेळी उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेचा विषय निघतो त्या-त्या वेळी बचावात्मक पावित्रा घेताना दिसतात.त्यांचे असे म्हणने असते की , लोकप्रतिनिधींसाठी शैक्षणिक पात्रतेची अट घालणे हे घटनेच्या विरोधात आहे यामुळे गरीब , आदिवासी , मागास लोकांवर अन्याय होईल.या साठी ते भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंचे उदाहरण देतात.त्यांनी संविधान सभेत बोलताना सांगितले होते की , ज्या निरक्षर लोकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वत:चे सर्वस्व झोकून दिले त्यांना शैक्षणिक पात्रतेची अट घालून निवडणुक लढवण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही. जवाहरलाल नेहरुंच्या या मताशी कोणीही सहमत असेल , पण त्यांचे हे मत आत्ताच्या परिस्थितीशी निश्चितच जुळत नाही.त्या काळी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे स्वातंत्र्य सैनीक आज कुठे निवडणुक लढतायत ? १९४७ ची तत्कालीन देशाची परिस्थिती आणि २०१७ च्या परिस्थितीत बराच फरक आहे.त्या काळी देशात शिक्षणाचा म्हणावा तेवढा प्रसार झाला नव्हता.देशातील बहुतांश जनता ही निरक्षर होती....

शोध ‘ रेंचो ’ चा

शोध ‘ रेंचो ’ चा नुकतेच इन्स्पायर अ‍ॅवार्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन दि.६ ऑक्टोंबर ते ८ ऑक्टोंबर या कालावधीत जयभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय , गढी ता. गेवराई येथे संपन्न झाले.या विज्ञान प्रदर्शनात जिल्ह्यातील एकूण ४९६ शाळांनी सहभाग घेतला होता.या पैकी एकूण ४७ उपकरणांची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात आयोजीत करण्यात आलेले हे सर्वात मोठे विज्ञान प्रदर्शन असेल कदाचित. मी ही विज्ञान प्रेमी असल्यामुळे शक्य असेल तेंव्हा विज्ञान प्रदर्शनाला भेट देत असतो , साहजिकच या ठिकाणीही मी भेट देवून विज्ञान प्रदर्शन पाहण्याचा आनंद घेतला.या प्रदर्शनामागचा मूळ उद्देश आणि वास्तविकता मांडण्याचा मी इथे प्रयत्न केला आहे.                  इन्स्पायर हा केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा उपक्रम आहे.गुणवंत विदयार्थ्यांना कमी वयातच विज्ञानाकडे व वैज्ञानिक संशोधनाकडे आकर्षित करणे हा या मागचा उद्देश आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी मानवी संसाधने निर्मा...

सोशल मिडियाचा वापर आणि सामाजिक भान

आजकाल सोशल मिडियाचा उपयोग फक्त एक मनोरंजन म्हणून नाही तर ही एक गरज झाली आहे.फेसबुक , ट्विटर , इंन्स्टाग्राम , व्हाट्स अप्प , गुगल प्लस , ब्लॉग , पिंटरेस्ट अशा प्रकारची अनेक प्रकारची संधीस्थळे आपल्याला आपली मतं व्यक्त करण्यासाठी आता उपलब्ध आहेत. सोशल मिडियाचा ही आपल्याला इंटरनेट क्रांती झाल्या नंतर मिळालेली म्हत्वपूर्ण देण आहे.या मार्फत संपूर्ण विश्व एका धाग्यात बांधले जावू शकते.इथे आपण आपली मतं , आपले विचार मांडू शकतो , भलेही साधारणत: आपले विचार बाहेर कुणी गांभीर्याने ऐकत नसतील मात्र ईथे तुमचे विचार वाचून त्याला पसंदी देणारे किंवा आपले प्रतीमत देणारे काहीजण तरी मिळतात.इतरांना आपण केलेल्या सदकार्याची माहिती पोस्ट करून प्रेरणा देवू शकतो. सोशल मिडियाचा हे समाज-जागृती चे सशक्त माध्यम ठरू शकते. सोशल मिडियाने आपले महत्व वेळोवेळी सिद्ध केले आहे.मग ती देशातील निवडणूक असो , विदेशी भूमीवर केलेले आंदोलन असो किंवा व्यक्तीगत ब्रँडींग असो.पोस्ट , लाईक , फॉलो , काँमेंट ,. शेअर हे शब्द जे काही काळापूर्वी लोकांना माहित नव्हते ते आता लोकांच्या चांगले अंगवळणी पडले आहेत. एका अभ्यासानूसार २०१४ मध...

नकोशी

न विन शैक्षणिक वर्षाची सुरुवात नुकतीच झाली होती. मी शाळेत नविन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची ओळख करुन घेत होतो. प्रत्येक जण आपली ओळख करुन देत होता. एका विद्यार्थीनीने आपले नाव  ‘ नकोशी’ असल्याचे सांगितले. हे नाव ऐकताच माझ्या मनावर एकप्रकारे आघातचं झाला. व दिवसभर माझ्या मनात विचार येवू लागला , व “का बरे तिचे नाव नकोशी ठेवले असेल  ?  इतर दूसरे चांगले नाव तिच्या पालकांना का नाही सुचले ?”               दुस‌‌-या दिवशी मी तिला बोलावून तिची कौटुंबीक माहिती जाणून घेतली. तिला दोन मोठ्या बहिणी होत्या ,  तिचा क्रमांक तिसरा होता. तिसरीही मुलगीच झाल्याने तिच्या घरातील काहींनी तिचे नामकरण संस्कार करण्याअगोदरच तिला ‘नकोशी’   म्हणुन हाक मारायला सुरुवात केली होती. तिच्या आई-वडिलांची परवानगी न घेता घरातील एका वडिलधा-याने तिचे नाव शाळेत प्रवेश देताना नकोशी असेच टाकले होते. मी विचार केला  ‘ आता हि लहान आहे म्ह्णून तिला या नावा मागचा हेतू कळत नाही मात्र हि मोठी झाल्यावर हिच्या मनावर किती आघात होईल ? आपण ...