मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

चीनची आर्थिक नाकेबंदी आवश्यक

सध्या भारत आणि चीन यांच्यात डोकलामवरून तणावाचे वातावरण आहे.चीन सरकार आणि तेथील सरकारी वृतपत्राने धमकी दिली आहे की , भारताने आपले सैन्य डोकलामवरून हटवावे अन्यथा युद्धास तयार रहावे.चीनच्या अशा प्रकारच्या धमक्या आणि भारतीयात त्याच्याप्रती वाढत्या तिरस्कारामुळे भारतात चीनी वस्तूंबद्दल बहिष्काराची स्थिती निर्माण झाली आहे.३० जुलैला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे प्रत्यक्ष नाव न घेता सणांमध्ये स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचे जनतेला आव्हान केले आहे.त्यांनी म्हटले आहे की , भारतातील मातीपासून बनलेल्या मुर्त्या आणि दिवे यांचा वापर केल्याने गरिबांना रोजगार मिळेल.साहजिकच त्यांचा रोख चीनकडे होता.सध्या आर्थिक मंदीतून जात असलेल्या चीनची आर्थिक नाकेबंदी केली तरच चीनची खुमखुमी उतरेल. दरवर्षी रक्षाबंधन , गणेशोत्सव , दिपावलीच्या दरम्यान चीन मधून हजारो कोटींचा माल भारतात आयात केला जातो.भारतात चीनी वस्तूंना त्या स्वस्त असल्याने मोठया प्रमाणावर मागणी आहे.चीनी वस्तूंच्या वाढत्या मागणीमुळे या वस्तूंची निर्मीती करणारे स्वदेशी उदयोग संकटात सापडले असून हळू-हळू ते लयाला जात आहेत.डोकलाम विवादावरून च...

निसर्गाशी खेळ

एकीकडे आपले नेते पर्यावरणावर आधारित खूप छान भाषण देतात.वृक्षारोपण कार्यक्रमाला हजर राहतात.दूसरीकडे जंगलाचे प्रमाण कमी होत चालले आहे.पर्यावरणाच्या बाबतीत आपल्यात एवढी जागरूकता आली आहे की , आपण पर्यावरण रक्षण म्हणून कोरफडीचे झाड लावत आहोत.शाळांमध्ये पर्यावरणावर आधारित अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.यामुळे चित्रकलेमधील स्पर्धा वाढली आहे.पर्यावरणावरिल आधारित संकटाने आपली सांस्कृतीक वाढ निश्चितच झाली आहे मात्र पर्यावरणावरिल संकट निश्चितच दूर झालेले नाही. काही दिवसांपूर्वी आपण एक बातमी ऐकली किंवा वाचली असेल.अंटार्क्टिका मधील लार्सन सी आईस शेल्फ हा प्रचंड हिमखंड मुख्यभूमी पासून वेगळा झाला आहे.शेल्फ हिमखंडाच्या त्या भागाला म्हणतात जो पाण्यावर तरंगतो.या घटनेमुळे जगभरातील शास्त्रज्ञ चिंतीत झाले आहेत.या हिमखंडाची लांबी ५८०० वर्ग किलोमीटर आहे.यात दोन दिल्ली शहर सामावू शकतात.जो हिमखंड वेगळा झाला आहे तो किना-यापेक्षा ११०० फुट मोठा आहे.हे आईस शेल्फ हजारो वर्ष जूने आहेत.हा हिमखंड का वेगळा झाला हे निश्चित सांगता येत नाही.मात्र या मागे जागतिक तापमानात होत चाललेली वाढ हे कारण असू शकते.जगा...

बिहारमधील राजकिय नाटय

बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा गेल्या बुधवारी २६ जुलैला राजीनामा दिला.बिहारमधिल आरजेडी , जेडीयू व काँग्रेसची सत्तेतील २० महिन्यांची महाआघाडी तुटली.लागोलग दूस-याच दिवशी म्हणजे गुरूवारी २७ जुलैला नीतीश कुमार यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली . या राजकिय नाटयामुळे बिहारमध्ये जेडीयू आणि भाजपा युतीचे सरकार सत्तेत आले.भाजपाचे सुशिल मोदी यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.नीतीश यांनी शुक्रवारी विधानसभेत आपले बहुमतही सिद्ध केले.बिहारमधील हे राजकिय नाटय अगोदरच ठरलेले होते , मात्र हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला की , हे सर्व नैसर्गिकरित्या घडत आहे.जनतेला अस वाटाव की , नीतीश यांनी भ्रष्टाचाराच्या विरूद्ध बिगुल वाजवले आहे.ईकडे नीतीश कुमार यांनी राजीनामा दिला नाही की , तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून भ्रष्टाचाराच्या विरूद्ध लढाई मध्ये सहभागी झाल्याबद्दल नीतीश कुमारांचे अभिनंदन केले.देशातील जनता निश्चितच एवढी राजकिय मुर्ख नाही . हा नरेंद्र मोदी आणि नीतीश कुमार यांच्यातील पूर्वनियोजीत कट होता हे आता जनतेच्या समोर आले आहे.भाजपालाही फक्त नीतीश य...

भाजपाची दुटप्पी भुमिका

                    केंद्रातील वर्तमान एनडीए सरकारला सत्तेत येवून ३ वर्षे होवून गेली आहेत.भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा आणि भाजपाच्या अन्य नेत्यांनी दावा केला आहे की , मोदींचे सरकार यापूर्वीच्या यूपीए सरकारच्या तुलनेत अधिक चांगले आणि स्वच्छ प्रतिमा असलेले सरकार आहे.मागील तीन वर्षात मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही.काळ्या धनाच्या प्रश्नापासून नोटबंदीपर्यंत सरकारने केलेल्या कामाबद्दल बोलून या नेत्यांनी केंद्रातील एनडीए सरकार भ्रष्टाचार मुक्त असल्याचे ठासून सांगितले आहे.या नेत्यांनी पुन्हा एकदा म्हटले आहे की , मागील सरकारवर लागलेल्या सर्व भ्रष्टाचाराच्या आरोपांचा मोदी सरकार तपास करेल आणि आरोपींना कायदयानूसार शिक्षाही मिळवून देईल.या नेत्यांनी मोदी सरकारच्या बाबतीत केलेला हा दावा काही अंशी खराही आहे , मात्र मागील सरकारवरिल आरोपांच्या तपासासंदर्भातील या नेत्यांच्या विधानावरून काही प्रश्नही निर्माण झाले आहेत.सीबीआय आणि ईडी सारख्या तपास संस्थांमार्फत निष्पक्...

मोबाईलचे युग

त्यावेळी   मी महाविद्यालयात शिकत होतो. मोबाईलचे दूरसंचार क्षेत्रात नुकतेच पदार्पण झाले होते. क्वचितच कुणाच्यातरी हातामध्ये नोकियाचा मोठा मोबाईल हॅन्डसेट दिसायचा. लोकांना त्या कडे बघून कुतुहल वाटायचे. त्याकाळी फक्त कॉल करण्याचे नाही तर कॉल आला तरी कमीत-कमी एका कॉल मागे जवळपास ८ रुपये मोजावे लागायचे. असं वाटायच की फोन नाही बिल येत आहे. व त्यामुळे आत्ता सारख कोणी मोबाईलवर जास्त वेळ बोलत नसे , फक्त कामापूरतेच थोडक्यात बोलत असत. व साहजिकच मोबाईल खूप महागडे आणि कॉलचे दर ही खूप असल्याने याचा वापर करणे सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेरचे होते . कुणाकडे मोबाईल असणे हे त्याकाळी खूप प्रतिष्ठेचे लक्षण समजले जायचे. कुणी जर संपर्कासाठी आपला मोबाईल नंबर देवू केला तर लोकांच्या भुवया उंचवायच्या. आज स्थिती अशी आहे की , लोक आपला मोबाईल नंबर व्हिजिटींग कार्डवर टाकून वाटत आहेत. आज मोबाईलवर मोठ-मोठे लोक सहज उपलब्ध होतात , जसे की ते आपल्या चोविस तास सेवेत आहेत. यात अंतर एवढेच आहे की , यापैकी काही लोक ज्यांच्याकडे त्यांचे काम आहे , त्यांचेच फोन उचलतात आणि त्यांच्याकडे ज्यांचे काम आ...