आ पण सर्वांची धडपड ही दोन वेळची भाकर मिळवण्यासाठी चालू असते. ही भाकर मिळवण्यासाठी एखादा व्यवसाय , नौकरी करावी लागते किंवा रोजगार मिळवावा लागतो. अर्थातच ही सोय आपल्या गावातच होते असे नाही त्यामुळे आपले पोट भरण्यासोबतच जीवनमान उंचावण्यासाठी मला किंवा आपल्यापैकी अनेकांना आपल घर , गाव , शहरच नाही तर देश सुद्धा सोडावा लागला आहे. हि परिस्थिती केवळ आजची नाही तर मानव विकासाच्या प्रक्रियेत ही यात्रा सतत सुरू आहे. पोटासाठी लोक हसत-हसत विस्थापितांच जीवन निवडतात अस म्हटल्यास वावग ठरणार नाही. माझे चुलते , भाऊ आणि अनेक स्वकियांनी भाकरीच्या शोधात आपल घर सोडल , त्यांचा निवासाचा पत्ता बदलला आणि जो जिथ गेला तिथलाच होवून राहिला तोही कायमचाच. ही वास्तविकता मानवी गरज आणि विकासाचा अभिन्न अंग झाली आहे. या गोष्टीला कोणीच नाकारणारही नाही. भाकरीचा शोध ही अशी बाब आहे ज्याला कोणी दूर्लक्षित करू शकत नाही. ही भाकर कुठे मिळेल याचा अंदाज सूरूवातीला कोणीच करू शकत नाही. हे काळच निश्चित करतो की आपल्याला कोठे जावे लागेल.आपला जन्म कुठे...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.