आ ता वयस्क काय आणि लहान मुले काय सगळ्यांच्या जीवनातील मोठा वेळ आता इंटरनेटवर जात आहे. आपण सोशल मीडियावर केलेल्या एखाद्या पोस्टला मिळालेल्या भरपूर लाईक्स बघून एवढे खुश होतो की जणू आपल्याएवढा जगात कोणी आनंदी नाही याविपरीत जर कमी लाईक्स मिळाल्या तर आपण एवढे नाराज होतो की जणू आपल्यावर प्रेम करणारा या जगात कोणीच नाही. हे इंटरनेटचे अती प्रेम आता एका मानसिक आजारामध्ये रूपांतरीत होत आहे. आपण आपल्या वास्तविक जीवनात आनंदी राहण्याऐवजी इंटरनेटच्या आभासी जगात आनंद शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्या आसपास लाखो गेगा बाइट्स माहिती सतत येत आहे. व्हाट्सअॅपवर तर दिवसाला हजारो मेसेज येवून धडकतात. यापैकी कोणती माहिती खरच माझ्यासाठी आहे आणि कोणती नाही आपण हे निश्चितच करू शकत नाहीत. आपण हेही निश्चित करू शकत नाहीत की , यासूचनांपैकी किती सूचनांना आपल्या जीवनात महत्व द्यायचे आहे. लहान-सहान कामासाठी आपण ते अधिकच सोपे जावे म्हणून जसे अवजारं काढायचो तस आज छोट्या-छोट्या गोष्टीसाठी इंटरनेटवर जातो यातून जीही माहिती मिळते त्या माहितीला आपण ब्रम्हवाक्य मानायला लागतो. आपल्या पोटात सतत वेदना होत आहेत...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.