मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

विचारांचे भावविश्व : विचार मंथन

विचारमंथन हा लेखसंग्रह आहे. यामध्ये विविध विषयांवरचे एकूण ३४ लेख असून पुस्तकास प्रा.डॉ. श्रीमती शैलजा बरुरे यांची प्रस्तावना लाभलेली आहे. मुखपृष्ठ उमेश डोंगे यांचे आहे. या पुस्तकाची अनुक्रमणिका चाळल्यानंतर वाचकांच्या सर्वप्रथम लक्षात येते की, विविध विषयावरील लेखांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. लेखकाने आपल्या मनोगतामध्ये शाळेत विज्ञान शिक्षक म्हणून काम करत असताना नवीन प्रवेशित विद्यार्थिनीचे नाव "नकोशी" आहे हे पाहिल्यानंतर तिच्या जन्माची आणि तिच्या नकोशा असण्याची कथा सर्वप्रथम उजेडात आणली. शिक्षण विभागाने हा लेख प्रकाशित होताच, या मुलीच्या नाव बदलाच्या प्रस्तावास मंजुरी दिली आणि त्या विद्यार्थिनीचे नाव बदलण्यात आले. एक शिक्षक, एक स्तंभ लेखक एका विद्यार्थिनीला तिच्या नकोशा असणाऱ्या अस्तित्वाला शिक्षण विभागाच्या आणि जीवनाच्या केंद्रस्थानी आणतो. मला वाटतं लेखन, साहित्य मग ते कोणत्याही प्रकारच असो, स्तंभ लेखन, ललित अथवा वैचारिक किंवा कथा, कादंबरी, कविता या सगळ्यांचा उद्देश माणूसपण जिवंत ठेवून माणसाला जगण्यासाठी आधार देणे, कधी कधी उभारी देणं हाच साहित्याचा हेतू असतो.  भारतात...

आजचा दिशाहीन भारतीय युवक

देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्षे होवून गेली असताना या कालावधीत आज आपल्या देशाने जो विकास साधला आहे त्यात खरे योगदान कोणाचे आहे हा प्रश्न पडणे साहजिकच आहे. राजकारणी नेते, प्रशासनातील कर्मचारी, शिक्षक, मजूर, वरिष्ठ नागरिक की आणखीन कोण ? नक्कीच यापैकी कोणीच नाही. देशाच्या विकासात सिंहाचा वाटा हा वर उल्लेख नसलेल्या देशातील तरूण वर्गाचा आहे. कोणत्याही देशाची खरी संपत्ती व बलस्थान हे त्या देशातील युवक आहेत. देशातील युवकांच्या दर्जावरून त्या देशाचे भवितव्य कसे असेल हे ठरत असते. सुदैवाने लोकसंख्येच्या दृष्टीने जगात दुस-या क्रमांकावर असलेल्या या आपल्या देशात एकूण लोकसंख्येच्या २० टक्के बालक, २० टक्के वृद्ध व ६० टक्के लोकसंख्या युवक वर्गाची म्हणजेच २४ ते ४० वर्षे वयोगटाची आहे, म्हणूनच भारताला तरूणांचा देश असे संबोधले जाते. हा युवक वर्ग नेहमीच शारीरिक, मानसिक, आर्थिक व सामाजिक रूपाने सदैव सक्रीय असतो आणि असायलाही हवा. देशाच्या विकासात महत्वाचे योगदान असणा-या या युवक वर्गाची आजची स्थिती मात्र खूप चिंताजनक आहे. भारतीय युवकांची स्थिती चिंताजनक आहे असे म्हटल्यावर याचे देशावर काय परिणाम होतील हे व...

२०२३ चे स्वागत करताना...

बदल हा निसर्गाचा नियम आहे, तो सर्वांना मान्य करावाच लागतो. याच निसर्ग नियमानुसार २०२२ ला निरोप देण्याची आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याची वेळ आता जवळ येऊन ठेपली आहे. भारत शकांचा, मन्वन्तरांचा, तसेच इसवींचाही सन मोठय़ा उत्साहाने साजरा करतो. प्रारंभ म्हणजे सुरुवात! मागील चांगल्या-वाईट गोष्टींना मागे सारून नवीन होणा-या सूर्योदयासोबत नवसंकल्पांचे अवलंब करणे, आपल्यासाठी नक्की काय चांगले हे पडताळणे, सत्याची कास धरणे, हे माझ्याकडून सुटणारच नाही ह्यापेक्षा खरंच याने माझी किती हानी होते ह्याचा विचार करायला हवा. आपण नवीन वर्षात नव्या उत्साहाने कामाला लागणे म्हणजेच नवीन वर्षाचे स्वागत. नवे वर्ष आले म्हटल्यावर त्याचे स्वागत आणि त्यानिमित्ताने संकल्प करणे देखील ओघाने आलेच. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वांनी काहीना काही तरी प्लॅन्स केले असतील आणि त्याच्या बरोबरीने नवीन वर्षामध्ये काय करायचे याचा संकल्पही केला असेल.. तसे पाहता प्रत्येकाचा नववर्षाचे स्वागत करण्याचा दृष्टीकोन वेग-वेगळा असतो..पद्धती वेगळ्या असतात..हा ज्याच्या त्याच्या संतोषाचा आणि समाधानाचा भाग आहे. नववर्षाचे...

भारतीय परिचारिकांना जगभरात मागणी

एक उदात्त व्यवसाय म्हणून जगभरात ओळखला जाणारा व्यवसाय म्हणजे परिचारीकेचा व्यवसाय. हा व्यवसाय संयमाने सेवेत समर्पण करण्याची मागणी करतो. परिचारिकांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या कामाचे वातावरण आणि पात्रता पातळीनुसार बदलतात. प्राथमिक स्तरावर रुग्णांची काळजी घेणे परिचारिकांना आवश्यक असते, तर वरिष्ठ स्तरावर परिचारिकांना मनोरुग्ण, मुले, आयसीयू रुग्ण अशा विशेष गटांची काळजी घ्यावी लागते. यासाठी विशेष कौशल्ये आवश्यक आहेत. याशिवाय, नर्सिंग कर्मचारी औषधे वाटप करणे, रुग्णांचे अहवाल अद्ययावत ठेवणे, वैद्यकीय उपकरणे बसवणे, प्रशासकीय आणि इतर अनेक कामे देखील करतात. जीवन-मृत्यूशी लढा देणा-या रुग्णाची २४ तास सेवा फक्त परिचारकाच करते. भारतातही परिचारिका न थकता, न थांबता रात्रंदिवस अनेक तास रुग्णांची सेवा करतात, पण त्यांना खूप कमी पगार मिळतो. देशात प्रत्येक परिचारिकेवर ६-८ रुग्णांची जबाबदारी असते. न्याहारी, दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण वेळेवर करायला कधीच वेळ मिळत नाही. इमर्जन्सी केस असेल तर वॉशरूममध्येही जाता येत नाही. परिचारिकांना पाठदुखी, कंबरदुखी आणि पाय सुजणे हे सामान्य आहे. पण त्यांच्या पगाराबद्दल बोला...

मानवी स्थलांतराची समस्या

विविध कारणास्तव आपले राहाते घर किंवा प्रदेश किंवा अगदी आपला स्वदेश सोडून इतर परक्या प्रदेशामध्ये वास्तव्यास जाणे हा प्रकार मनुष्यप्राण्यांमध्ये अगदी इतिहासपूर्व काळापासून होत आला आहे. शास्त्रीय परिभाषेमध्ये या प्रकारास ‘स्थलांतर करणे’ असे म्हणण्यात येते. स्थलांतर’ हा माणसाच्या आजवरच्या इतिहासात कायमच महत्त्वाचा घटक राहिला आहे. अवघ्या मानव जातीचा इतिहास हा स्थलांतराचा इतिहास राहिलेला आहे. म्हणजे, दीड-दोन लाख वर्षांपूर्वी आपला पूर्वज असलेल्या आदिमानवाने अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या इर्षेपायी गुहेबाहेर पाऊल टाकलं, ते आजही थांबलेले नाही. स्थलांतराची ही प्रक्रिया मानवाच्या जन्मापासून अव्याहत सुरूच आहे. आजवरच्या इतिहासात स्थलांतराच्या या अव्याहत प्रक्रियेला चालना देणारे, रोखणारे अनेक टप्पे येऊन गेले आहेत. म्हणजेच, साधारण दहा-एक हजार वर्षांपूर्वी जेव्हा भटके जगणे टाळून माणूस शेती करू लागला तेव्हा, टोळ्यांनी स्थलांतर करणारा माणूस काही काळापुरता स्थिरावला. मग दळणवळणाची साधने विकसित होत गेली, महासाथी, युद्धे, महापूरासारख्या आपत्ती कोसळत गेल्या तशी स्थलांतराची प्रक्रिया वेगाने पुढे सरकत गेली. युरो...

सेक्सटॉर्शन पासुन सावध राहणे गरजेचे

  रा ज्यात सेक्सटॉर्शनच्या नावाखाली फसवणूक किंवा खंडणी गोळा करण्याचा प्रकार वाढला असून, या वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्रात सेक्सटॉर्शनच्या सुमारे २२९ प्रकरणांची नोंद झाली आहे. तसेच २००२ लेखी तक्रारी पोलिसांच्या ऑनलाइन पोर्टलवर प्राप्त झाल्या आहेत. अशा फसवणुकीप्रकरणी पोलिसांनी एकूण १७२ जणांना अटक केली आहे. बहुतेक आरोपी हे परराज्यातील आहेत. सेक्सटॉर्शनच्या प्रकरणात वाढ होऊ लागल्याने महाराष्ट्र सायबर पोलिसांनी पीडित व्यक्तींना आता मदतीचा हात देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे सेक्सटॉर्शन खंडणीचा फोन आल्यास घाबरून जाऊ नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. तसेच पोलिस सेक्सटॉर्शन पीडितांचे समुपदेशनही करणार आहेत. सेक्सटॉर्शनच्या या प्रकाराला तरुणच नाही तर वयस्कर व्यक्तीही सध्या बळी पडत आहेत. लैंगिक आकर्षणामुळे सेक्सटॉर्शनसारख्या गुन्ह्यात अडकणाऱ्या तरुणांची संख्या ही सगळ्यात जास्त असून यात १९ ते २७ वयोगटातील तरुणांचे प्रमाण अधिक आहे. कामाचा ताण, एकटेपणा आणि सोशल मीडियावरून होणारी घुसमट यातून मार्ग काढण्यासाठी अनेक तरुण अशा प्रकारच्या जाळ्यात आपसूक ओढले जातात. तसेच, लैंगिक आकर्षणामुळे मुलींसोबत...

महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पाऊल

सै न्य, नौदल आणि वायूसेना असे भारतीय लष्कराचे तीन भाग पडतात. लष्कराचे हे तीनही भाग अत्यंत शूर आणि बलवान सैनिक तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनले आहेत. यापैकी कोणत्याही दलात प्रवेश घेण्यासाठी अत्यंत कठोर निवड चाचणी आदींचा सामना करावा लागतो. भारतीय सैन्य दलाच्या तिन्ही शाखांत महिलांच्या प्रतिनिधित्वाबाबत एकेक निर्णय घेत आता देशाचे सैन्य दल घातक युद्धकौशल्य असणाऱ्या महिलांना आणखी एक आव्हान खुणावणार आहे. भारतीय नौदलाच्या मार्कोस आणि हवाई दलाच्या गरुडा या विशेष कमांडो पथकात महिला कमांडोंचा लवकरच समावेश केला जाणार आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या विशेष दलांमध्ये असणा-या कमांडोंना कठोर प्रशिक्षण दिले जाते. या कमांडोंवर विशेष आणि गुप्त ऑपरेशन्स करण्याची जबाबदारी असते. या कामामध्ये स्पेशल फोर्स कमांडो निपूण असतात. या कमांडोसाठी आतापर्यंत फक्त पुरुषांना परवानगी होती. पण आता भारतीय नौदल महिलांनाही कमांडो होण्याची संधी देणार आहे. मात्र त्यासाठी त्यांना अतिशय कठोर समजल्या जाणाऱ्या चाचण्यांतून यशस्वीपणे जावे लागणार आहे. भारतीय नौदलातील हा अत्यंत महत्त्वाचा आणि दुरगामी निर्णय आहे. हा ऐतिहासिक निर्णय...