मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

बेपत्ता महिला व मुलींची वाढती संख्या चिंताजनक, सक्षम यंत्रणा व जनजागृतीची गरज

तुम्ही देशातील कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये गेलात तर बाहेर दारावरच्या बेपत्ता असलेल्या लोकांची माहिती नजरेस पडते. मात्र, ते पाहून देशात आणि महाराष्ट्रात बेपत्ता असलेल्यांची संख्या किती मोठी आहे याचा अंदाज येत नाही. एनसीआरबीच्या एका अहवालानुसार, २०२१ या वर्षात देशातील सुमारे ४ लाख महिला तर ९० हजाराहून अधिक मुली बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा अद्यापही शोध लागलेला नाही. ही आकडेवारी जरी २०२१ ची असली तरी सद्यस्थितीत यामध्ये फारसा बदल नसून, कदाचित महिला बेपत्ता होण्यात वाढ झालेली असणार आहे. २०१९, २०२० आणि २०२१ या तीन वर्षांमध्ये मुली आणि महिला हरवण्याच्या प्रकरणांची सर्वाधिक नोंद झाली आहे. विशेष म्हणजे या तीन वर्षांमध्ये इतर राज्यांपेक्षा मुली आणि महिला बेपत्ता होण्याच्या सर्वाधिक प्रकरणांची मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये नोंद झाली आहे. बेपत्ता महिला व मुलींची ही संख्या तर डोळ्यात अंजन घालणारी आहे. महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना या नव्या नाहीत. राज्यातील विविध भागांमधून महिला अत्याचाराच्या घटना समोर येत असतात. पोलीस महिला अत्याचाराच्या घटनांवर आळा घालण्या...

हवालदिल नेते आणि गोंधळलेले मतदार

पूर्वी राजकारणाला त्यागाचे अधिष्ठान होते, आता ते भोगाचे झाले आहे. आजची राजकीय परिस्थिती अशी झाली आहे की, ‘राजकारण आणि राजकारणी’ हे दोन्ही इतके बदनाम झाले आहेत की, त्यांचा वापर शिवीसारखा होऊ लागला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या झालेली उलथापालथ जाहीरपणे हेच सिद्ध करते की, भाजप सत्त्ता उपभोगण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. शिवसेना पक्षात फुट घडवुन आणुन भाजपने सत्ता स्थापित केली असल्याची घटना ताजी असतानाच त्यात भरीस भर म्हणून राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी सत्तेत सहभाग घेतला. महाराष्ट्रातील राजकारणाला लागलेले हे अनपेक्षित वळण निश्चितच भाजपच्या छुप्या हेतुबद्दल चिंता दर्शविते. मोदींनी गेल्या नऊ वर्षात जे पेरले त्याला कोमारे फुटले आहेत. राहुल गांधींच्या खालुन वर झालेल्या पायपीटीने मोदींच्या पायाखालची वाळु घसरली आहे. बिहार आणि कर्नाटकात भाजपची पिछेहाट झाली. मोदींच्या एकहाती सत्तेच्या विरोधात अनेक प्रादेशिक नेत्यांनी हातात हात काय घेतला, मोदींची सदर थरथरताना दिसत आहे. मोदींची आश्वासने, फसलेली नोटबंदी, वाढता धार्मिक तणाव, वाढत्या दंगली, जळते मणिपुर आता राष्ट्रीय चैतन्याचे भांडवल होवून ब...

जगात उपासमारीची गंभीर समस्या

आज रोजी भूक ही जगातील प्रमुख समस्या असून, संपूर्ण जगाला भुकेच्या भीतीने ग्रासले आहे. जागतिक ते स्थानिक अन्न प्रणालीतील अतिव्यापी संकटातून जगभरातील लोकसंख्येची भुकेची पातळी गंभीर असल्याचे जगात दिसुन येते. अन्नाविना उपासमार होणा-यांच्या संख्येत झपाट्याने वाढत आहे. जगात सुमारे ७४ कोटी लोक उपासमारीचे बळी असल्याचे यूएनच्या नवीन अहवालात समोर आले आहे. म्हणजेच त्यांना अन्न अजिबात मिळाले नाही. यूएनच्या 'द स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड २०२२ रिपोर्ट’ नुसार, २०१९ नंतर लोकांचा भुकेशी संघर्ष झपाट्याने वाढला आहे. २०१९ मध्ये, जगातील ६१८ दशलक्ष (६१.८ कोटी) लोकांना उपासमारीचा सामना करावा लागला. म्हणजेच केवळ ३ वर्षात एक वेळचे अन्न मिळत नाही, असे १२.२ कोटी लोक वाढले आहेत. अहवालात असेही म्हटले आहे की, गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये जगातील ११.३% लोकसंख्येला (सुमारे ९० कोटी लोकांना) पुरेसे अन्न मिळाले नाही. अहवालानुसार, उपासमारीची स्थिती अशीच राहिली तर २०३० पर्यंत ६०० दशलक्ष (६० कोटी) लोक कुपोषणाचे बळी होतील.                     जगात...

'चांद्रयान ३' ची अवकाश भरारी

इस्रो आणि भारतातील प्रत्येक नागरिकासाठी कालचा दिवस ऐतिहासिक ठरला. कारण काल भारताचे महत्वाकांक्षी तिसरं चांद्रयान-३ मिशन लॉन्च झालं आहे. चांद्रयान-३ ने काल दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी यशस्वी उड्डाण केलं. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे अंतराळयान काल प्रक्षेपित करण्यात आलं. चांद्रयान २ चे चंद्रावर लँडींगआणि रोव्हर क्रॅश झाल्यानंतर चांद्रयान २ ही मोहीम अपूर्ण राहिली होती. परंतु आता भारताने चांद्रयान ३ मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. चांद्रयान-३ हा इस्रोच्या चंद्रमोहिमेतील तिसरा टप्पा आहे. चंद्रावर जात असलेले हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. या ठिकाणी आतापर्यंत कुठलेही यान पोहोचले नाही अशी माहिती आहे, म्हणून संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञांकरिता चांद्रयान ३ मोहीम अत्यंत महत्त्वाची व मोठी अशी ठरणार आहे. या मोहिमेत चंद्रावर सॉफ्ट लँडिंगने उतरण्याच्या प्रयत्न केला जाईल. या मिशनमध्ये सर्व प्रक्रिया चांद्रयान दोन सारखीच राहणार आहे. चंद्रावर याआधी अमेरिका चीन व रशिया हे देश गेले असून भारताला या मोहिमेत यश मिळाल्यास चंद्रावर यान उतर...

नववी ते बारावी लवकरच सेमिस्टर पद्धत

आता लवकरच इयत्ता नववी ते बारावीपर्यंत सेमिस्टर सिस्टिम लागू करण्यात येणार असून नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार (एनईपी) तिसऱ्या वर्गापासून बारावीपर्यंतचा राष्ट्रीय आराखडा (एनसीएफ) तयार झाला आहे. त्याच्या प्रकाशनाची तयारी सुरू झाली आहे. २९ जुलै किंवा त्याच्या आधी एनसीएफ जाहीर होऊ शकतो. सर्व दहा वर्गासाठी नवीन पुस्तके तयार करण्यासाठी विषयतज्ज्ञांची निश्चिती करण्यात आली आहे. एनसीएफ जाहीर होताच पुस्तके तयार करण्यासाठी समित्यांची स्थापना होईल. इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या शालेय शिक्षणात आता १५० विषयांची पुस्तके तयार केली जातील. शैक्षणिक सत्र २०२४-२५ च्या सुरुवातीच्या महिन्यांत नवीन एनईपीनुसार इयत्ता ३ रई, ६ वी आणि नववीची पुस्तके येऊ शकतात. मागील धोरण १९८६ मध्ये आले. पुस्तके २००८ पर्यंत आली. या वेळी २०२० मध्ये धोरण, २ वर्षांत प्री स्कूलची पुस्तके, बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण झाला. केंद्रीय विद्यालयांत बालवाटिका प्री-स्कूल वर्ग सुरू झाले. केव्हीएस- एनव्हीएसच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. सीबीएसई शाळांत व गुजरातमध्ये होलिस्टिक प्रोग्रेस कार्डचा पथदर्शी प्रकल्पाची चाचणीदेखील झाली...

आषाढी वारीला मिळणार जागतिक वारसा

लवकरच पंढरपूर वारीचा जागतिक वारसा यादीत समावेश होऊ शकतो. यासाठी केंद्र सरकार युनेस्कोला येत्या दोन ते तीन महिन्यांत प्रस्ताव सादर करेल. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत, इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचा वतीने हा प्रस्ताव सादर केला जाईल. वारीचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या माध्यमातून अध्ययनपर चित्रीकरण पूर्ण केले आहे. वारीशी संबंधित सर्व साहित्यही संकलित करण्यात येत असून येत्या दोन-तीन महिन्यांत पंढरपूर वारीला जागतिक वारसा दर्जा मिळावा यासाठी युनेस्कोकडे पाठवला जाईल. अशा स्थितीत पंढरपूरच्या वारीला जागतिक वारशाचा दर्जा मिळाल्यास विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बाब ठरणार आहे. पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे. साधारण तेराव्या शतकात वारीचा उल्लेख आढळतो. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो. संत तुकाराम यांची संत ज्ञानेश्वरांवर श्रद्धा होती. दर वद्य एकादशीला संत तुकाराम महाराज आळंदी येथे जाऊन माऊलींच्या समाधी समोर कीर्तन करीत असत. आजही वद्य एकादशीला कीर्तनाच...

इंग्रजी शाळा मस्त; पालक त्रस्त

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर  शिक्षणाचा प्रसार झपाट्याने झाला. ग्रामीण भागात शिक्षणाची सोय व्हावी म्हणून अनेक समाजसेवी लोकांनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा काढल्या, या मागे आर्थिक लाभ मिळवणे हा हेतू बिलकुल नव्हता. यामुळे ग्रामीण भागातील मुले शिकून उच्च शिक्षण घेवू लागली. मध्यंतरीच्या काळात इंग्रजी विषयाचा बाऊ झाला. अनेक मुले या विषयात नापास होऊ लागली. इच्छा असूनही केवळ इंग्रजीत नापास झाल्याने त्यांना पूढचे शिक्षण घेता येईना, दूसरीकडे फक्त विज्ञान शाखेतचं करिअर करता येते असा समज पालकात निर्माण झाला. या शाखेचे शिक्षण केवळ इंग्रजीतुन असल्याने त्यांना इंग्रजी महत्वाची वाटु लागली. जागतिकीकरण व खाजगीकरणाचे वारे देशात वाहू लागले. शिक्षण ही मोठी बाजारपेठ आहे हे काही उद्योगपतींच्या लक्षात आले. पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजी विषयाची असलेली भिती आणि आकर्षण याचा फायदा घेवून लाखोंची कमाई करता येईल असा तल्लख विचार त्यांच्या मनात आला, शेवटी उद्योजकच ते. येथूनचं शिक्षणाच्या बाजारिकरणाला सुरूवात झाली. शासनानेही विद्यार्थ्यांचे हित लक्षात न घेता ‘मागेल त्याला शाळा’ हे धोरण स्विकारले...