आधुनिक जगात लोकशाहीचा तीव्र गतीने विकास झाला आहे. मीडिया ही लोकशाहीची सशक्त संस्था आहे.रेडिओ,टि.व्ही,वर्तमानपत्र यासारख्या सर्व जनसंपर्क माध्यमांचा समावेश मीडियात होतो.कोणत्याही देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक गतिविधिंचे प्रतिबिंब आपल्याला मीडियात दिसत असते.मीडिया हा लोकांचे विचार आणि दृष्टीकोनाला प्रभावित करत असतो.अनेक देशात झालेल्या सामाजिक आणि राजकीय क्रांत्यांमध्ये मीडियाची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे.भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात केसरी, मराठा यासारख्या वर्तमानपत्रांनी इंग्रजांविरूद्ध लोकजागृती करण्याचे काम केल्याचे दिसून येते. अण्णा हजारे यांनी लोकपालसाठी दिल्लीच्या रामलीला मैदानावर जेंव्हा आंदोलन केले होते तेंव्हा या आंदोलनाला लोकांचा मोठा पाठिंबा मिळवून देण्यात मीडियाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मीडियाच्या लोकशाहीतील या सशक्त आणि महत्वपूर्ण भूमिकेमुळेच ब्रिटनचे प्रसिद्ध राजकीय विचारवंत आमण्ड बर्क यांनी मीडियाला लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाची उपाधी दिली.
लोकशाही देशात जिथे विचारांची अभिव्यक्ती आणि विचार स्वातंत्र्य घटनेने प्रदान केले आहेत तिथे या विचार स्वातंत्र्याचा अतिशय योग्य उपयोग पध्दतीने जर कुणाकडून उपयोग केला जात असेल तर तो मीडियाद्वारेच.मीडियाचे देशातील काना-कोप-यात घडणाऱ्या अगदी लहान-सहान घटनांवर लक्ष असते त्यामुळे मोठ-मोठे सत्ताधारीही मीडियाचा अवमान करण्याचे धाडस करित नाहीत.सदयस्थितीला मीडियाद्वारे देशातील फक्त सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडींची माहिती मिळत नाही तर विदेशात घडणाऱ्या घटना आणि त्यामुळे बदलत्या सामाजिक मूल्यांची माहिती ताबडतोब मिळते.मीडिया हे लोकशाहीचे सशक्त माध्यम असल्याने लोक आपले विचार, इच्छा,विरोध, टिका सर्वकाही मीडियाद्वारेच व्यक्त करतात.दूस-या शब्दात सांगायचे झाल्यास मीडिया हे लोकांना आपले विचार व्यक्त करण्यासाठी लाभलेले एक सशक्त व्यासपीठ आहे.मीडिया हा समाजाचा आरसा आहे.
मीडिया लोकांच्या तक्रारींच्या आधारे शासनाच्या चुकीच्या धोरणांवर जबरदस्त प्रहार करण्याचे काम करित आला आहे. मीडियामुळेच शासन किंवा सत्ताधा-यांना लोकांची नेमकी नस पकडणे सोपे जाते.लोकशाहीत जनमताला अनन्यसाधारण महत्त्व आहे.हे जनमत निर्माण करण्याची जबाबदारी मीडियाचीच आहे.सरकारची धोरणे किंवा शासकीय योजनांवर मत व्यक्त करून किंवा टिका करुन नेमकी वास्तविकता लोकांसमोर ठेवण्याची जबाबदारी मीडियाची आहे. सरकारची धोरणे जी सामान्य व्यक्तिच्या डोक्याबाहेरची आहेत ती अतीशय सोप्या भाषेत समजावून सांगण्याचे काम मीडियाचे आहे.मीडिया हे शासन आणि जनता यामध्ये दुवा म्हणून काम करत आले आहे.मीडियामुळेच जगात घडणा-या अनेक घटनांची अद्यावत माहिती आपल्याला सोप्या भाषेत मिळते.मीडियामुळेच देश किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील चर्चा, परिसंवाद किंवा वादविवादामध्ये भाग घेण्याची संधी उपलब्ध होत आहे.
आज मीडिया जगातील कोणत्याही काना-कोप-यात घडणाऱ्या घटनेचे मोठयाप्रमाणावर कवरेज करित आहेत त्यामुळेच जगातील कोणताही हुकूमशहा किंवा सरकार जनतेपासून वास्तविकता लपवून ठेवू शकत नाही.मीडियामुळेच कोणतीही सरकार जनतेच्या अधिकारांची दडपशाही करु शकत नाही.आजच्या भ्रष्ट वातावरणात मीडियाची भूमिका आणि जबाबदारी निश्चितच लोकशाहीच्या इतर तीन स्तंभापेक्षा जास्त आहे.
भारतात मीडियाला मोठ्या प्रमाणावर स्वतंत्रता आणि अधिकार प्राप्त आहेत त्यामुळे मीडियाला आपली जबाबदारी विसरून चालणार नाही.मीडियाला आपल्या अधिकारांचा उपयोग करताना याचे भान ठेवले पाहिजे की,त्यांच्याद्वारा प्रकाशित अथवा प्रसारित कोणत्याही बातमी किंवा लेखामुळे देशाची एकता, अखंडता, शांतता बाधित होणार नाही. मीडियाने कोणताही पूर्वग्रहदूषितपणा किंवा पक्षपात न करता जनतेसमोर वास्तविकता मांडली पाहिजे.हे निर्विवाद सत्य आहे की, मीडिया हे लोकशाही आणि मानव अधिकारांचे रक्षण करण्याचे काम करते. एक जबाबदार मीडिया देशात कायदा सुव्यवस्था तसेच राष्ट्रीय एकता आणि अखंडता अबाधित ठेवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावू शकते. साहजिकच लोकशाहीत मीडियाची स्वतंत्रता अबाधित असणे आवश्यक आहे.मीडियाला सुद्धा अधिक कुशलतेने देशाच्याप्रती असणारी आपली जबाबदारी लक्षात ठेवून देशाच्या विकासात आपले अमूल्य योगदान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
-सुरेश मंत्री, धारूर
मो.नं-9403650722

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा