ज न्म आणि मृत्यू या दरम्यानच्या काळाला आपण आयुष्य असे म्हणतो. आजकाल माणसाचे जीवन किती धकाधकीचे झाले आहे. रहदारीच्या त्रासापासून कौटुंबीक अडचणींपर्यंत मानवी जीवन हे ताणतणावाने भरले आहे. प्रत्येक जण सुखाच्या शोधात धावतो आहे मात्र सुख हे शोधून मिळत नसत. शिक्षणातील वाढत्या स्पर्धेमुळे बालपण हरवून गेल आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात अभ्यासाचा ताण सहन करावा लागत आहे. वर पालकाच्या अपेक्षांचे ओझे आहे . थोडे मोठे झालो नाहीत की करिअर बनवण्याचा ताण आणि नंतर कौटुंबीक जबाबदारी. आयुष्य कधी सरत जावून म्हातारपण आल हेच कळत नाही. आयुष्यात काहीतरी जगायच राहून गेल असं नंतर प्रत्येकाला वाटायला लागत पण गेलेला काळ कधी परत येत नाही. आयुष्याची सुरुवात होते ती बालपणापासून. आपल मुल ३ वर्षाच झाल की त्याच्या पालकांना त्याच्या भवितव्याची चिंता वाटायला लागते. आपल मुल जगाच्या वाढत्या जिवघेण्या स्पर्धेत टिकायला हवं ही प्रत्येक पालकाची अपेक्षा असते. यात काही गैर ही नाही. मात्र इथे त्याच्या बालपणाचा बिलकुल विचार केला जात नाही. फक्त त्याने आपल्या अपेक्षा पूर्ण करायला हव्यात. त्याला नेमक काय हवयं...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.