मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

आपण सगळेच प्रेमाचे हत्यारे

अ नुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या प्रेम संबंधाची परिणीती लग्नामध्ये झाली या गोष्टीला जास्त दिवस झाले नाहीत..त्यांच्या लग्नाची चर्चा संपूर्ण देशात त्यावेळी मोठया उत्साहाने होत होती. त्यांची पहिली भेट ते लग्नापर्यंतच्या प्रवासाची चर्चा सगळ्या न्यूज चॅनल , वर्तमानपत्रे  आणि सोशल मीडियावर घडवून आणली जात होती.आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या लग्नाच्या स्वागत सभारंभाला हजेरी लावून या नवविवाहित दांपत्याला भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.या जोडीचा एक-एक फोटो प्रेमाच्या यशस्वीतीचे उदाहरण म्हणून बघीतले जावू लागले. मात्र याच्या काही दिवसानंतर आणि वैलंटाइंस दिवसाच्या अगोदर अंकित नावाच्या तरूणाची दूस‌-या धर्माच्या मुलीसोबत प्रेम करण्याचा गुन्हा केल्यामुळे खुलेआम हत्येची बातमी येते तिही देशाची राजधानी दिल्लीत घडलेली.एकीकडे आपला समाज प्रेमाचा आनंद साजरा करतो तर दूसरीकडे याच प्रेमाला सहन करू शकत नाही हा किती विरोधाभास आहे. याचा अर्थ असा की , प्रेम चित्रपटात , सेलीब्रेटीजचे किंवा इतर कुणाचे असेल तर ते चांगले वाटते मात्र आपल्या कुटुंबात त्याने आपले पाय पसरू नयेत. आपल्या घराचा उ...

बाहेर सगळेच वाघ असतात पण घरात .......

सं कट कधीच सांगून येत नाही.ज्या गोष्टींबाबत कधी आपल्या पूर्वजांनीही कधी विचार केला नसेल त्याही अचानक संकटात येतात. जगात वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत त्याप्रमाणे संकटेही वेगवेगळ्या प्रकारची असतात हे आपल्याला विसरून चालणार नाही.सरळ शब्दात सांगायचे झाल्यास जग हे नानाविध संकटांनी आणि त्यांचा सामना करणा-या शूर-विरांनी भरलेले आहे.नुकतेच काहीं दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधिशांनी पत्रकार परिषद घेवून त्यात ज्याप्रकारे लोकशाही संकटात असल्याची आशंका व्यक्त केली त्यामुळे मला सुद्धा नैतीक बळ मिळाले आहे की , मी सुद्धा माझ्या वैवाहिक जीवनातील संकटांबाबत काही गोष्टी आपल्यासमोर ठेवू ईच्छीतो. या जगात मी काही एकटा पति नाही जो या संकटाला झेलत असेल. जवळपास सर्व प्रकारचे पति या संकटाला झेलत रोजचे जीवन जगत , मरत व्यतीत करीत आहेत.माझे हे वैयक्तीक मत आहे की , वैवाहिक जीवनातील अडचणी संकटापेक्षा वेगळ्या नाहीत. या संकटाची तलवार सतत डोक्यावर लटकत असते.पति होण्याच्या नात्याने या संकटाला मी रोज कसे तोंड देतो हे माझे मलाच माहित. पहिल्यांदा मलाही वाटत होते की , वैवाहिक जीवनात आनंद ही आनंदआहे....

पुन्हा ‘पंचफूलाची’ पुनरावृत्ती होईल ?

प द्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. सेंसॉर बोर्डाने अनेक बदल सुचवून या चित्रपटाच्या प्रदर्शनास मान्यता दिली होती,एवढेच नाही तर पद्मावती नावात बदल करून पद्मावत असे ठेवण्यात आले मात्र यानंतरही चार राज्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा हवाला देवून या चित्रपटावर बंदी लादली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने कायदा व सुव्यवस्था राखणे ही संबंधीत राज्यांची जबाबदारी असल्याचे सांगून या चित्रपटाच्या प्रदर्शनास हिरवा कंदील दिला.करणी सेना आणि अन्य काही संघटनांनी आपला विरोध तिव्र केल्यानंतर देशातील नेत्यांनी या गरम तव्यावर भाकरी भाजणे सुरूच ठेवले आहे. भावी निवडणूका लक्षात घेवून काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यात या चित्रपटावर बंदी लादण्याची जणू स्पर्धाच लागली होती. सोमवारी राजस्थान आणि मध्यप्रदेश सरकारांनी तसेच करणी सेना आणि क्षत्रीय महासंघ यांनी सुद्धा सर्वोच्च न्यायालयात यावर पुर्नविचार याचिका दाखल केली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आता पून्हा पंचफूला सारखे प्रकरण तर होणार नाही ना याची भीती आहे. मागील चार महिन्यात या चित्रपटा...

चालू वर्ष मोठया राजकिय घडामोडींचे

मो दी सरकारचे पुढील काही महिन्यात चार वर्ष पूर्ण होतील. २०१९ मध्ये लोकसभा निवडणूका होणार असल्याने २०१८ वर्ष संपताच निवडणूक वर्षाची उलटी गिनती सूरू होईल. अशात निश्चितच काही लोकप्रिय निर्णय मोदी सरकारकडून घेतले जातील.जी लोक आजही भारतीय राजकारणाच्या भविष्याचा अंदाज यापूर्वीच्या हिट फॉर्म्युल्यांच्या आधारावर घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या पदरी मोठी निराशा पडेल. वेगाने बदलणा-या समाजाला राजकिय विश्लेषक आणि पत्रकारांपेक्षा राजकिय नेते आता जास्त समजून घेत आहेत. जनतेला काय हव आणि काय नाही हे त्यांना चांगले माहित आहे.काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा आता राहुल गांधींच्या खांदयावर आहे.बदललेल्या परिस्थितीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये एकमेकांवर मात करण्यासाठी चालू वर्षात स्पर्धा लागलेली दिसेल.लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने या वर्षी मोठे राजकिय युद्ध पहायला मिळेल हे मात्र नक्की. पूढील वर्षी मिजोराम, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून कोणते लोकप्रिय निर्णय घेतले जातील याचे उत्तर नरेंद्र मोदी यांनी प...

केवळ शाळेमुळे मुलं घडतात ?

म ला   हे बघून आश्चर्य वाटते की , लोक कस सहजरित्या आपल्या निष्पाप मुलांचे बालपण , त्यांची संवेदनशिलता आणि जिज्ञासा हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण मुलांना मशिन बनवण्यासाठी , एका व्यवस्थेचा भाग बनवण्यासाठी किती उत्सुक आहोत. अशा व्यस्थेचा भाग तयार करून देण्यासाठी आपल्या सरकारने जागो-जागी कारखाने तर खोलून ठेवलेच आहेत , ज्यांना हुकूमशाही आणि भांडवलशाही प्रवृत्तीचे लोक मोठया तत्परतेने चालवित आहेत. अशा कारखाण्यांत व्यवस्था जशाच तशी ठेवण्यासाठी आपले डोळे बंद करून चालणारी मोठी खेप तयार केली जात आहे. मी ठोसपणे सांगू शकतो की , सध्याची ही शिक्षण व्यवस्था कधीच असा समाज तयार करू शकत नाही ज्याच्यात मानवता , रचनात्मकता आणि प्रगतीशिलता असेल आणि मला असे वाटते की , आपण या समस्येला सध्या तोंड देत आहोत. आपण निष्पाप बालकांच्या को-या मनावर कट्टरता , अवैज्ञानिकता आणि असा अभ्यासक्रम लादत आहोत ज्याचा त्यांच्या भविष्याशी काही एक देणे-घेणे नाही. त्यांची ईच्छा आणि परवानगीशिवाय आपण असा अभ्यासक्रम छापत चाललो आहोत. भूछत्रा सारख्या जागो-जागी उगवलेल्या या शाळांमध्ये बालकांकडून त्यांचे स्...

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पद्मावती विवाद

‘पद्मावती’ चित्रपटावरून सूरू असलेला वाद आता शिगेला पोहचला असून , चित्रपटातील कलावंतांना जीवे मारण्याच्या तसेच हात-पाय तोडण्याच्या धमक्या विविध संघटनांकडून मिळत आहेत.अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या युवा शाखेने अभिनेत्री दीपिका पदुकोनला जीवंत जाळणा-यास एक कोटीचे बक्षीस जाहीर केले आहे तर हरयाणातील भाजपाच्या एका नेत्याने दीपिका पदुकोन व दिग्दर्शक संजय लीला भन्सालींचे शिर कापणा-यास दहा कोटींचे बक्षिस देवू अशी घोषणा करीत अभिनेता रणवीर सिंगचे पाय तोडण्याची धमकी दिली आहे.दूसरीकडे या वादग्रस्त चित्रपटातील काही दृष्यांवर आक्षेप घेत ती काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.अदयाप या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळालेले नसल्याने यात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला.या वादाच्या पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. कोणी याला राजपूतांचा अपमान म्हणत आहे तर कोणी हिंदूंचा.दूसरीकडे कोणी असा तर्क लावत आहेत की , हिंदू धर्म एवढा कमजोर नाही की , कोण्या एका चित्रपटामुळे तुटेल.या संबंधी एक बाब महत्वाची आह...