मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

कोरोनाची लस कधी उपलब्ध होणार?

कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे.या महामारीने लाखो लोकांना संक्रमीत केले असून जवळपास दोन लाखांच्या वर लोकांना आतापर्यंत आपला जीव गमवावा लागला आहे.हा विषाणू नविन असल्याने कोरोनावर निश्चित औषध ही उपलब्ध नाही ना लस.प्रचलित औषधांच्या साहयाने लक्षण आधारित उपचार केल्याने अनेकजण या भयंकर आजारातून बरे झाले आहेत.संपूर्ण जग या महामारीने त्रस्त असल्याने जगाची नजर कोरोनाच्या लसीकडे लागली आहे.कोरोनावरिल लस कधी उपलब्ध होईल? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.याचाच आढावा घेणारा हा लेख. कोरोनावर लस विकसित करण्यासाठी जगातील विविध प्रयोगशाळांमध्ये दिवस-रात्र युद्ध स्तरावर काम सुरू आहे.या वेळी जवळपास ३५-४० प्रयोगशाळांमध्ये कोरोना लसीवर काम सुरू आहे.काही लसींची चाचणी प्राण्यांवर केली जात आहे तर काही लसींची सरळ-सरळ मानवावर.संपूर्ण जगाला कोरोना प्रतिरोधक बनवणे वा त्यांच्यात रोगप्रतिकारक क्षमता निर्माण करणे हे खूप कठिण काम आहे.एक लस तयार करण्यासाठी अनेक वर्ष लागतात मात्र सध्याच्या स्थितीची गंभीरता पाहून अनेक औषध कंपन्यांनी सरकारी संस्था,सामाजिक संस्था आणि औषध नियमन संस्थांची मदत घेवून आपला शेडय...

कोरोना विरूद्ध युद्धात सोशल मीडियाचे आव्हान

को रोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टेंसिंग राखणे खूप महत्वाचे झाले आहे.अशा काळात आपण घरामध्ये बंद असताना सोशल मीडिया हा समाजाशी जुडण्याचा एकमेव आधार झाला आहे.भारतात कोरोनाविरूद्ध युद्ध सुरू झाल्यानंतर अगदी सुरूवातीला अनेक महाभागांनी सोशल मीडिया मार्फत समाजात अफवा,सामाजिक व्देष निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र सरकारने याची दखल वेळीच घेतल्याने या महाभागांच्या आसुरी आनंदावर जणू पाणी फेरले गेले.सर्वांकडे सध्या खूप फावला वेळ असल्याने सोशल मीडियावर खूप लिहिल जात आहे.कोणी कोरोनावर कविता केल्या,कोणी लॉकडाऊन मधिल आपले अनुभव शेअर केले तर कोणी यापूर्वी जगात आलेल्या नैसर्गिक आपत्तींविषयी लिहिल.अशातच आता नविन ट्रेंड सोशल मीडियावर आला आहे तो म्हणजे विविध प्रकारचे चॅलेंज देण्याचा.कुणा महिलेकडे साडी चॅलेंज आहे तर कुणाकडे जोडी चॅलेंज.मग यात पुरूषही कसे मागे राहतिल बरे.त्यांच्यातल कोणी दाढी चॅलेंज देत आहे तर कोणी गॉगल चॅलेंज.दिवसभर सोशल मीडियावर असच काहीस सुरू असत.अर्थात यामागे कुणाला हानी पोहचविण्याचा उद्देश नसून केवळ आणि केवळ मनोरंजन हाच आहे.मात्र कोरोनाच्या या अभूतपूर्व संकटात सोशल मीडि...

आपली परंपरा आणि क्वारंटाईन

जगात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे.त्यामुळे संपूर्ण जगच जणू काही ठप्प झालय.उपचारापेक्षा प्रतिबंध हाच चांगला उपाय म्हणून जगातील सगळे लोक आपापल्या घरात बसले आहेत.अर्थात प्रत्येकाने स्वत:ला क्वारंटाईन केल आहे.कोरोना महामारी सोबत क्वारंटाईन हा शब्द जो काही काळापूर्वी आपल्याला माहित नव्हता तो सगळीकडे प्रचलित झाला आहे.नव्या पिढीसाठी क्वारंटाईन ही पद्धत नवखी असेल मात्र जगात हिचा वापर फार पूर्वी पासुन होत होता,अगदी आपल्या भारतीय संस्कृतीत सुद्धा.आपल्या परंपरेत संक्रामक रोगांपासून वाचण्याचा योग्य आणि खात्रीशीर उपाय स्वत:ला दूस-यांच्या शारीरिक संपर्कापासून वेगळे ठेवणे हाच राहिला आहे.रोगी आणि निरोगी,दोघांना रोगापासून बचाव आणि आपले आरोग्यहिताच्या दृष्टीने एक उपाय म्हणून क्वारंटाईन मान्यताप्राप्त आहे. विज्ञानाच्या भाषेत प्रतिबंध हा उपचारापेक्षा योग्य पर्याय आहे.कोरोनावर तर सध्यातरी कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नसल्यामुळे केवळ प्रतिबंध हाच उपचार आहे.त्यामुळेच जगातील जवळपास ९० देश मागिल अनेक दिवसांपासून लॉकडाऊन आहेत.रस्ते निर्मनुष्य आहेत,प्रत्येकाने स्वत:ला क्वारंटाईन केल आहे.भारतीय जीवनशैलीत हजार...

कोरोनाचे जगासमोर आव्हान

जग काही काळासाठी ठप्प होणार आहे का?जगातील अनेक देशांना जगाशी असलेला संपर्क तोडावा लागेल का?जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना आजाराला जागतिक महामारी घोषित केले आहे.या अगोदर स्वाईनफ्ल्युला महामारी घोषित करण्यात आले होते.या विषाणुच्या संसर्गाने अनेक देशातील नागरिक बाधित झाले असुन नजिकच्या काळात याचा ताण आरोग्य व्यवस्थेवर पडणार आहे.या आजाराचा फटका शेअर बाजार,अनेक व्यवसाय,सार्वजनिक उत्सवांना बसला असून या विषाणुने जगासमोर मोठे आव्हान उभा केले आहे. कोरोनामुळे चीनपेक्षा इटलीमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.ईथे १२,४६२ लोक कोरोनाने संक्रमित आढळले आहेत,८२७ लोकांचा मृत्यू झाला आहे.संपूर्ण ईटलीमध्ये टाळेबंदी सारखी अवस्था झाली आहे.६ कोटी लोकांना एप्रिल पर्यंत घराबाहेर निघण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.त्यांना घरातच रहावे लागेल.औषध आणि किराणा दुकाने सोडुन इटलीमध्ये सर्वकाही बंद आहे.जगाची आठवी अर्थव्यवस्था असणा-या इटलीतील दोन महत्वाची शहरं सेंट्रल मिलान आणि पीसा शहरांची स्थिती बघितली तर याचा अंदाज येतो की, ६ कोटी लोकांवर प्रतिबंध लागल्यानंतर तेथील रस्त्यांवर काय परिणाम झाला आहे.तेथील शाळा,महाविद्यालयं,...

राष्ट्रीय प्रश्नांपासून पाठ फिरवणारे प्रादेशिक पक्ष

मागिल काही दिवसात दिल्ली आणि काही अन्य विधानसभा निवडणूकांचे निकाल जर बघितले तर हे प्रश्न निर्माण होतात की,काँग्रेसचे स्थान प्रादेशिक पक्षांनी घेतले आहे?भाजपाचा सामना करण्यासाठी प्रादेशिक पक्ष अधिक सक्षम आहेत का आणि त्यांना निवडणूकीच्या मुद्दयांची अधिक चांगली माहिती आहे?लोकांनी आता काँग्रेसची साथ सोडली आहे?गांधी परिवाराची जादू आता संपली आहे?काँग्रेसने कधीच प्रादेशिक पक्षांना किंमत दिली नाही.एक काळ असा होता ज्यावेळी काँग्रेसला संपूर्ण देशात मोठा जनाधार होता.आता याच काँग्रेसला प्रादेशिक पक्षांचा आधार घ्यावा लागत आहे.काँग्रेसचे स्थान आता भाजपाने घेतले आहे का?नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या सुरूवातीलाच काँग्रेसने जणू आपला पराभव स्विकारला होता.तिला तिथे सलग दूस-यांदा एकही जागा जिंकता आली नाही.भाजपाने मात्र शेवटपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले.भाजपा कुठे जिंकत आहे तर कुठे तिला मोठया पराभवाला सामोरे जावे लागत आहे.मात्र ती देशातील अधिकाधिक राज्यात लढताना दिसत आहे.भारतीय राजकारणात झालेला हा खूप मोठा बदल आहे. राजकारणाच्या रणांगणात अनेक रथी-महारथी आले आहेत,जे रस्त्यावर येवून लोकांसाठ...

जीवनशैली बदलण्याची गरज

    उ र्जेचा काटकसरीने उपयोग करण्यासाठी आयोजित अनेक आतंरराष्ट्रीय परिसंवाद फक्त औपचारिकता म्हणून आयोजित केले जातात. जगातील कोणताही असा देश नाही जो आपल्या वाट्याचा विकास थांबवु ईच्छित नाही. कोणीही कार्बन उत्सर्जनावर अंकुश लावू ईच्छित नाही. आजही जगातील सर्वात मोठा उर्जेचा स्त्रोत औष्णिक उर्जा हाच आहे. कमीत-कमी पूढील दोन-तीन दशक तरी आपण कोळशाला पर्याय शोधु शकणार नाही. यामुळेच आपण आतापर्यंत पॅरीस अथवा क्योटा मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करू शकलो नाहीत.                       आज जगात एकुण उर्जेच्या ४२ टक्के उर्जा कोळशापासुन मिळवली जाते. खरंतर जगात मागील काही वर्षात कोळशाच्या वापरात कमी आली आहे. जागतीक आकडेवारीनुसार २०१० मध्ये कोळशावर झालेला खर्च १३४ अरब डॉलर होता तर २०१८ मध्ये ८० अरब डॉलरचा खर्च झाला. भारतात मात्र हे चित्र बदलले नाही. भारतात २०१० मध्ये कोळशावर झालेला खर्च ६ अरब डॉलर तर २०१८ मध्ये तो वाढुन ८ अरब डॉलर झाला. चीनने मात्र याबबतीत खूप तत्परता दाखवली आहे. तिथे २०१० मध्ये कोळशावर ५० अरब डॉलर...

अर्थसंकल्पापूढील आव्हाने

अर्थमंत्री निर्मला सीतारमण  मोदी सरकारची दुस-यांदा सत्ता स्थापन झाल्यानंतरचा दुसरा अर्थसंकल्प लोकसभेत उद्या सादर करणार आहेत.या अर्थसंकल्पाकडे अर्थातच संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीत मोठा विजय मिळवून परत सत्तेत आलेल्या मोदी सरकारसाठी आज पर्यंतचा सर्वात कठिण आणि आव्हानात्मक असा अर्थसंकल्प म्हणून याकडे पाहिले जात आहे.मोदी सरकार अशा वेळी अर्थसंकल्प सादर करणार आहे जेंव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल मंदीकडे असल्याच्या चर्चेने जोर पकडला आहे.सर्व आकडेवारीही याकडेच संकेत करित आहे.अशात मोदी सरकारपूढे कोटयावधी भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान आहेच सोबत ढासळत चाललेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्याची जबाबदारी सुद्धा. सध्या उत्पादनापासून मागणीपर्यंत मागील दोन दशकातील सर्वात सुस्तीचा काळ आहे.काही जाणकार सध्याच्या अवस्थेला नव्वदच्या दशकातील मंदीशी जोडत आहेत.तसतर सरकारने या मंदीला अल्पकालीन म्हटले होते मात्र ही गोष्ट खरी ठरली नाही आणि परिस्थिती दिवसेंदिवस खराबच होत गेली.अशा कठिण परिस्थितीत विविध सर्व्हेक्षणातुन आलेल्या आकडेवारीने एनडीए सरका...