६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांवर होणा-या अत्याचारात गेल्या काही वर्षांपासून वाढ होत आहे. २०२० मध्ये कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये गुन्हेगारीचा आलेख ढासळला होता. पण कोरोनानंतर पुन्हा एकदा गुन्हेगारीमध्ये वाढ होत असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालातून समोर आले आहे. २०१९ ते २०२१ या तीन वर्षांमध्ये ज्येष्ठ नागरिकांवर होणा-या आत्याचारात वाढ झाली आहे. २०२१ मध्ये महाराष्ट्रात ६१९० ज्येष्ठ नागरिकांसंबधित गुन्ह्याची नोंद झाली आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे. तर या यादीत मध्य प्रदेश दुस-या क्रमांकावर आहे. २०२१ मध्ये मध्य प्रदेशमध्ये ५२७३ गुन्हे घडले ज्यात पीडित ज्येष्ठ नागरिक आहेत. म्हणजेच मध्य प्रदेशात दररोज १४ वृद्ध गुन्ह्यांचे बळी ठरले आहेत. तेलंगणामध्ये २०२१ मध्ये १९५२ प्रकरणांसह तिस-या स्थानावर आहे. तामिळनाडूमध्ये २०२१ मध्ये १८४१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे, ज्यामध्ये पीडित ज्येष्ठ नागरिक आहेत. दरम्यान, या बहुतांश घटनांमध्ये पोलिसांनी गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या हत्येच्या प्रकरणात तामिळनाडू आघाडीवर ...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.