मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जगावर मंदीचे सावट

कोरोनाच्या संकटाच्या झळा संपूर्ण जगभर बसल्या आहेत. त्यातून आता जग सावरत असतानाच जागतिक मंदीचे सावट घोंगावताना दिसत आहे. एक तर बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. त्यात अनेक ठिकाणी नोकर कपातीवर भर दिला जात आहे. त्यात मोठ-मोठ्या कंपन्याही मागे नाहीत. त्याचा जबर फटका सहन करण्याची वेळ लोकांवर आलेली आहे. त्यामुळे आगामी काळात मंदीचे सावट घोंगावण्याची भीती व्यक्त होत आहे. जगभरातल्या विविध देशातल्या केंद्रीय बँका वेगाने व्याजदर वाढवत आहेत. हे पाहता २०२३ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत जाऊ शकते. मंदीच्या भीतीने नोकरदार वर्गामधली भीती आणखीनच वाढली आहे. कारण कोरोना काळात ज्या पद्धतीने कर्मचाऱ्यांना कामावर काढून टाकण्यात आलं, पगार कमी करण्यात आले हे सगळं त्यांच्या डोक्यातून गेलेलं नाही. आर्थिक पॅकेजच्या नावावर प्रचंड उधळपट्टी, चीनमध्ये कोव्हिड प्रतिबंधामुळे सप्लाय चेन व्यवस्थेवर झालेला परिणाम, रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमती यामुळे खाद्यान्नाच्या किमती दशकातील सर्वाधिक इतक्या झाल्या आहेत. परिणामी अमेरिकेची केंद्रीय फेडरल बँक, बँक ऑफ इंग्लंड, जपानची केंद्रीय...

कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय दुर्दैवी

शिक्षण विभागाने राज्यातील शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालकांना ० ते २० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा किती आहेत आणि संबंधित शाळा बंद करण्याबाबत कार्यवाही कोणत्या स्तरावर सुरु आहे? याचा आढावा घेण्यास सांगितलं आहे. यालाच अनुसरून जिल्हानिहाय अतिरिक्त शिक्षक असतील, तर त्या शिक्षकांची माहिती द्यावी आणि अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत काय कार्यवाही केली, याबाबत विचारणा केली आहे. त्याचप्रमाणे २८ ऑगस्ट २०१५ च्या निर्णयानुसार जिल्हानिहाय विद्यार्थी संख्या; तसेच संच मान्यतेनुसार मंजूर शिक्षक, शिक्षकेतर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदांबाबत विचारणा केली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक आणि शिक्षकेतर पदांच्या संख्येवर निर्बंध येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे चित्र आहे. मिळालेल्या आदेशानुसार ज्या-त्या जिल्ह्याच्या शिक्षण अधिका-यांनी याबाबत माहिती संकलन करण्यास सुरुवात केली असून प्रत्येक जिल्ह्यात अशा शाळांची संख्या मोठी असल्याचे समोर येत आहे. शिक्षण विभागाकडून जरी याबाबत माहिती संकलित करण्यात येत असली तरी या शाळा बंद करण्याबाबत अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. शिक्षण विभागाच्या आधीच्या निर्णयानुसार प...

महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिक सर्वात कमी सुरक्षित

 ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांवर होणा-या अत्याचारात गेल्या काही वर्षांपासून वाढ होत आहे. २०२० मध्ये कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये गुन्हेगारीचा आलेख ढासळला होता. पण कोरोनानंतर पुन्हा एकदा गुन्हेगारीमध्ये वाढ होत असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालातून समोर आले आहे. २०१९ ते २०२१ या तीन वर्षांमध्ये ज्येष्ठ नागरिकांवर होणा-या आत्याचारात वाढ झाली आहे. २०२१ मध्ये महाराष्ट्रात ६१९० ज्येष्ठ नागरिकांसंबधित गुन्ह्याची नोंद झाली आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे. तर या यादीत मध्य प्रदेश दुस-या क्रमांकावर आहे. २०२१ मध्ये मध्य प्रदेशमध्ये ५२७३ गुन्हे घडले ज्यात पीडित ज्येष्ठ नागरिक आहेत. म्हणजेच मध्य प्रदेशात दररोज १४ वृद्ध गुन्ह्यांचे बळी ठरले आहेत. तेलंगणामध्ये २०२१ मध्ये १९५२ प्रकरणांसह तिस-या स्थानावर आहे. तामिळनाडूमध्ये २०२१ मध्ये १८४१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे, ज्यामध्ये पीडित ज्येष्ठ नागरिक आहेत. दरम्यान, या बहुतांश घटनांमध्ये पोलिसांनी गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत.   ज्येष्ठ नागरिकांच्या हत्येच्या प्रकरणात तामिळनाडू आघाडीवर ...

हॉकीचे जादूगार : मेजर ध्यानचंद

 आज २९ अॉगस्ट हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. ह्याच दिवशी भारताचे राष्ट्रपती  खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करतात. आज संपूर्ण देश हॉकीच्या इतिहासातील सर्वाधिक उत्कृष्ट खेळाडू मेजर ध्यानचंद यांची आठवण काढत आहे. ब्रिटीशांच्या राजवटीत गुलामांचे जीणे जगणाऱ्या भारताला जगज्जेतेपदाच्या सिंहासनावर बसवणारे मेजर ध्यानचंद यांची कर्तबगारी कोणत्याही अव्वल देशभक्तापेक्षा कमी नव्हती. १९२८, ३२ व ३६ या पाठोपाठच्या ऑलिम्पिकमध्ये हॉकीतील सुवर्ण पदकांची हॅट्ट्रिक भारताने साजरी केली, त्यात मेजर ध्यानचंद यांचा सिंहाचा वाटा होता. त्या तीन ऑलिम्पिकमध्ये भारताच्या १०१  गोलापैकी ३८ गोल तर चक्क ध्यानचंदने लगावलेले. हॉकीतील या जादूगाराविषयी लिहावं-बोलावं तितकं थोडकच. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे २९ ऑगस्ट १९०५ मध्ये ध्यानचंद यांचा जन्म झाला.त्याचं मूळ नाव “ध्यान सिंग” आहे. परंतु ते रात्री उशीरापर्यंत हॉकीचा सराव करायचे म्हणून त्यांच्या मित्रांनी त्यांना रात्रीच्या चंद्राची उपमा देऊन त्यांचं ध्यानचंद हेच नाव...

भारतात चित्ता पुन्हा धावणार

  चित्ता  पृथ्वीतलावरचा अत्यंत वेगवान समजला जाणारा हा प्राणी आहे . शिकारीमागे  तो  ताशी १२० किलोमीटरच्या वेगाने धावतो. त्याचा  वेग थक्क करणारा असाच आहे. जेव्हा  तो  शिकारीचा पाठलाग करतो तेव्हा त्याला कॅमे-यात टिपणं अवघड होवून बसतं. कारण त्याच्या शरीराच्या हलचाली अत्यंत वेगवान असतात. वन्यजीव अभ्यासकांच्या मते चित्यांसाठी गवताळ प्रदेश पोषक मानला जातो. चित्ता हा प्राणी सिंह, वाघ, बिब ट्या या प्राण्यांप्रमाणेच फेलिडो अर्थात मार्जारकुळातील असल्याचं काही वन्यजीव अभ्यासकांच म्हणनं आहे. तर काही वन्यजी व अभ्यासकां ना ते मान्य नाही. ए केकाळी चित्त्याचं वास्तव आफ्रिका आणि भारतीय उपखंडातील सपाट भुभागावर होतं. भारतात मुघलांच्या काळात देखील चित्ते मुबलक प्रमाणात होते. १६ व्या शतकात मुघल बादशाह जहांगीर यांच्या काळात जगात पहिल्यांदाच चित्ता पाळण्यात आला. आपल्या काळात एकूण १० , ००० चित्ते होते आणि त्यापैकी १००० आपल्या दरबारात होते, अशी नोंद जहांगीर यांचे वडील अकबर यांनी केली आहे. तर मुघल सम्राट अकबरकडे ९ , ००० पेक्षा जास्त चित्ते होते. ऐतिहासिक नोंदीनुसार छत...

सुपरस्टार राजेश खन्ना

 बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचा आज स्मृतीदिन आहे. राजेश खन्नाचं नाव इतिहासात नोंदलं गेलं आहे ते १९६८-७६ या कालावधीतल्या त्याच्या अशक्य अशा यशामुळे. राजेश खन्ना यांनी एकामागोमाग एक असे सलग १५ हिट सिनेमे दिले होते. यानंतर प्रत्येक दिग्दर्शक आणि निर्मात्याला राजेश यांच्यासोबतच काम करायचं होतं. सिनेमात राजेश खन्ना असणं हीच गोष्ट तो सिनेमा हिट करण्यासाठी पुरेशी होती. या काळात रोमान्सला एक नवी ओळख देणारे राजेश खन्ना होते. पुढेही त्याने सुपरहिट चित्रपट दिले, नाही असं नाही. पण ही वर्षं फिरून पुन्हा आली नाहीत. वैभवाचे दिवस सरले तरी राजेश खन्ना पुन्हा सामान्य माणूस होऊच शकला नाही. मनाने तिथंच राहिला. चित्रपट उद्योग बदलला. प्रेक्षक बदलले. अमिताभ बच्चन नावाच्या नव्या वादळाने जुने हिशेब उधळून टाकले. राजेश खन्ना मात्र अखेरपर्यंत पुनरागमनाचे प्रयत्न करत राहिले. राजेश खन्ना यांचा जन्म २९ डिसेंबर १९४२ मध्ये पंजाबमधील अमृतसर येथे झाला. त्यांचं मूळ नाव जतीन खन्ना असं होतं. त्यांच्या वडिलांचे नाव होते लाला हिरानंद आणि आईचे नाव होते चंद्रानी खन्ना. त्यांचे वडील लाला हिरानंद एम. सी. हायस्कू...

पाकिस्तानही श्रीलंकेच्या वाटेवर ?

 आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतील परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी  देश सोडून पलायन केल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. भारताकडून श्रीलंकेला शक्य ती मदत केली जात आहे. श्रीलंकेपाठोपाठ आता पाकिस्तानही दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असल्याची बातमी आहे. पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीबाबत जगातील आघाडीच्या रेटिंग एजन्सींनी इशारा दिला आहे. फिचकडून १७ देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये पाकिस्तान, ट्युनिशिया, घाना, इथिओपिया, ताजिकिस्तान, अर्जेंटिना, बेलारूस इत्यादी देशांचा समावेश आहे. एजन्सीने जारी केलेल्या अहवालात पाकिस्तानच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे दिवाळखोर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानची सद्य आर्थिक परिस्थिती पाहून असे वाटते की, तोही श्रीलंकेच्या वाटेवर जात आहे. श्रीलंकेतही या परिस्थितीची सुरुवात परकीय चलनाच्या साठ्यात घट झाल्यापासून झाली. यानंतर रेटिंग एजन्सींनी तेथील रेटिंग कमी केले. त्यामुळे श्रीलंकेतील गुंतवणुकीवर परिणाम झाला. एवढेच नाही तर सहज कर्ज मिळणे बंद झाले. सध्या श्रीलंकेचा महागाईचा दर ५०...