विकसीत जगतावर सध्या रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे या विकसीत राष्ट्रांवर मंदीचे सावट असून अनेक देशात महागाईने उच्चांक मोडीत काढले आहेत. अशा काळातही भारतीय अर्थव्यवस्था मात्र गतीने पुढे सरकत आहे. अलीकडच्या काळात भारताची आर्थिक वाढ झपाट्याने झाली आहे. भारताची दरडोई वाढ चीनच्या तुलनेत केवळ एक चतुर्थांश आहे. माञ योग्य धोरणांमुळे भारताचा विकास दर भविष्यात ७ टक्क्यांच्या वर असू शकतो. भारताची अर्थव्यवस्था चीनच्या तुलनेत खूप वेगाने वाढेल. यामुळे आगामी काळात भारत एक मजबूत आर्थिक शक्ती म्हणून उदयास येईल. रुपयाच्या आंतरराष्ट्रीय स्वीकृतीची व्याप्ती वाढवून, आर्थिक स्थिरतेचा आधारही वाढेल. जागतिक पातळीवर भारतीय रुपया कालांतराने प्रमुख चलनांपैकी एक बनू शकेल. म्हणजे येत्या काही काळात जगभरात भारतीय रुपया खणखणणार आहे. एकूणच कालांतराने डी-डॉलरायझेशनची प्रक्रिया होईल. भारत एक मोठा देश आहे आणि देशातील बहुतांश लोकसंख्या तरुण आहे. उत्तम शिक्षण आणि कौशल्य असलेले येथील तरुण भारताला एका मजबूत विकासाकडे नेऊ शकतात. अनेक आव्हानाचा सामना करत असताना भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर ...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.