अर्थमंत्री निर्मला सीतारमण मोदी सरकारची दुस-यांदा सत्ता स्थापन झाल्यानंतरचा दुसरा अर्थसंकल्प लोकसभेत उद्या सादर करणार आहेत.या अर्थसंकल्पाकडे अर्थातच संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीत मोठा विजय मिळवून परत सत्तेत आलेल्या मोदी सरकारसाठी आज पर्यंतचा सर्वात कठिण आणि आव्हानात्मक असा अर्थसंकल्प म्हणून याकडे पाहिले जात आहे.मोदी सरकार अशा वेळी अर्थसंकल्प सादर करणार आहे जेंव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल मंदीकडे असल्याच्या चर्चेने जोर पकडला आहे.सर्व आकडेवारीही याकडेच संकेत करित आहे.अशात मोदी सरकारपूढे कोटयावधी भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान आहेच सोबत ढासळत चाललेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्याची जबाबदारी सुद्धा. सध्या उत्पादनापासून मागणीपर्यंत मागील दोन दशकातील सर्वात सुस्तीचा काळ आहे.काही जाणकार सध्याच्या अवस्थेला नव्वदच्या दशकातील मंदीशी जोडत आहेत.तसतर सरकारने या मंदीला अल्पकालीन म्हटले होते मात्र ही गोष्ट खरी ठरली नाही आणि परिस्थिती दिवसेंदिवस खराबच होत गेली.अशा कठिण परिस्थितीत विविध सर्व्हेक्षणातुन आलेल्या आकडेवारीने एनडीए सरका...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.