को रोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टेंसिंग राखणे खूप महत्वाचे झाले आहे.अशा काळात आपण घरामध्ये बंद असताना सोशल मीडिया हा समाजाशी जुडण्याचा एकमेव आधार झाला आहे.भारतात कोरोनाविरूद्ध युद्ध सुरू झाल्यानंतर अगदी सुरूवातीला अनेक महाभागांनी सोशल मीडिया मार्फत समाजात अफवा,सामाजिक व्देष निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र सरकारने याची दखल वेळीच घेतल्याने या महाभागांच्या आसुरी आनंदावर जणू पाणी फेरले गेले.सर्वांकडे सध्या खूप फावला वेळ असल्याने सोशल मीडियावर खूप लिहिल जात आहे.कोणी कोरोनावर कविता केल्या,कोणी लॉकडाऊन मधिल आपले अनुभव शेअर केले तर कोणी यापूर्वी जगात आलेल्या नैसर्गिक आपत्तींविषयी लिहिल.अशातच आता नविन ट्रेंड सोशल मीडियावर आला आहे तो म्हणजे विविध प्रकारचे चॅलेंज देण्याचा.कुणा महिलेकडे साडी चॅलेंज आहे तर कुणाकडे जोडी चॅलेंज.मग यात पुरूषही कसे मागे राहतिल बरे.त्यांच्यातल कोणी दाढी चॅलेंज देत आहे तर कोणी गॉगल चॅलेंज.दिवसभर सोशल मीडियावर असच काहीस सुरू असत.अर्थात यामागे कुणाला हानी पोहचविण्याचा उद्देश नसून केवळ आणि केवळ मनोरंजन हाच आहे.मात्र कोरोनाच्या या अभूतपूर्व संकटात सोशल मीडि...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.