मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

अर्थव्यवस्थेला ग्रामिणचा आधार

जा गतिकीकरणामुळे मोठया प्रमाणात शहरीकरण वाढले. लोकांचे रोजगारासाठी गावाकडून शहराकडे मोठया प्रमाणात पलायन झाले. जागतिकीकरणामुळे ग्रामिण अर्थव्यवस्था धोक्यात आली होती. कोरोनाच्या या जागतीक महामारीत हिच ग्रामिण व्यवस्थाच देशाचा आर्थिक आधार बनली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर नजर ठेवणारी संस्था सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआईई) ने २१ जुनला जाहिर केलेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, कोरोनामुळे ठप्प पडलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या कामात गावं महत्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. याच संस्थेने ३ मेला आकडेवारी जाहिर करून म्हटले होते की, देशात बेरोजगारीचा दर २७.१ टक्के वाढला आहे. त्यावेळी असं वाटल होत की, देशाची ढासळती अर्थव्यवस्था सावरणे खूप कठिण होणार आहे. शेवटी अस काय झाल की, केवळ दिढ महिन्यात या संस्थेच्या अहवालाने नविन आशा पल्लवित झाल्या. ज्या गावांना देशाच्या आर्थिक मागासल्यापणाला जबाबदार धरले जायचे, त्याच गावांकडे अर्थव्यवस्थेचे तारणहार म्हणून बघितल जात आहे. सीएमआईई च्या आकडेवारीनुसार २१ जुनला देशातील बेरोजगारीचा दर घटुन तो लॉकडाऊनच्या पूर्वी एवढा ८.५ टक्के झाला आहे....

कोरोनाविरूद्ध लढाई आणि आकडयांचा खेळ

भा रतात कोरोना रुग्णांची संख्या ९ लाखाच्या पूढे गेली आहे. विशेषत: महाराष्ट्रात कोरोना बाधित रूग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. एकीकडे राहुल गांधी यांनी मोदी सरकार वर तर दूसरीकडे देवेंद्र फडणविस यांनी महाराष्ट्र सरकार वर कोरोना चाचण्या कमी असल्याने रूग्णांची संख्या कमी दिसत असल्याचा आरोप वारंवार केला आहे. दूसरीकडे केंद्र सरकार आणि संबंधित राज्य सरकारं हे युद्ध योग्यरित्या लढत असल्याच चित्र निर्माण करताहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतच ब्राझीलच्या तुलनेत उत्तरप्रदेश मध्ये कोरोनाची आकडेवारी कमी असल्याने समाधान व्यक्त केल आहे. व्यवस्थापन आणि प्रचार या दोन्ही कला आहेत. पंतप्रधानांचे हे वक्तव्य सुद्धा याचेच उत्कृष्ट उदाहरण आहे. मोदींनी आपला मतदार संघ वाराणसीच्या एनजीओ प्रतिनिधिंशी व्हिडिओ कॉन्फरंस मार्फत संवाद साधत असताना म्हटले की, ब्राझील मध्ये कोरोना विषाणू मुळे ६८ हजार मृत्यू झाले आहेत. उत्तरप्रदेशचे क्षेत्रफळ सुद्धा ब्राझिल एवढेच आहे आणि लोकसंख्याही जवळपास समान आहे. मात्र ईथे केवळ ८०० मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत. साहजिकच पंतप्रधानांच्या मतानुसार उत्तरप्रदेश मधिल कोरोनाची कमी आकडेव...

सुजाण पितृत्व

पि त्याला आपल्या मुलाचा मित्र झाल पाहिजे अस शास्त्रात लिहिल आहे. ‘प्राप्ते षोडशेवर्ष पुत्रापि मित्रवत समाचारेत’ या श्लोकाचा अर्थ पुत्र १६ वर्षाचा होताच पित्याला आपल्या पुत्राला मित्राच्या रुपात बघितल पाहिजे असा होतो. यात मुलीचा मात्र उल्लेख नाही. अर्थात भारतीय संस्कृतीत एकीकडे मुलीला देवतेचे स्थान देवून तिला महान बनवले असताना दुसरीकडे मात्र तिला मुलाच्या तुलनेत दुय्यम स्थान दिल जात ही सुद्धा परंपरेनेच चालत आलेली बाब आहे.         वर उल्लेखीत श्लोकात सांगितल्यापेक्षा उलट बाब असलेली आपल्याला दिसुन येईल. पुत्र आणि पित्यामध्ये संवादाचा अभाव बहुतांश कुटुंबात आहे. संवादाऐवजी मुलांसाठी पित्याची उपस्थिती ही भयाचे प्रतिक असते. वयात आलेला मुलगा घरात असेल तर त्याला पाहुन बाप घराबाहेर आणि बाप घरात असेल तर मुलगा बाहेर. पिता घरात असेल तर गंभीर शांतता. आई नजरेचा कटाक्ष टाकुन मुलांना शांत बसवते आणि पतीच्या सेवेला लागते. सुरूवातीपासून शहरी भागात राहणा-या आणि कामकाज करणा-या दांम्पत्याच्या कुटुंबात कदाचित दृश्य वेगळे राहत असेल मात्र ग्रामिण भागात आजही हिच स्थिती आहे. पित्याकडे कुटुंब प्...

ऑनलाईन शिक्षणाला मर्यादाच

  को रोना महामारीने अर्थव्यवस्था तर चौपट केली आहेच सोबत मानवी जीवनावर याचा वाईट प्रभाव पडला आहे. मानवी मुल्यं संकटात आहेत. या क्रूर विषाणूमुळे जगातील शिक्षण व्यवस्थाही जणू कोलमडून गेली आहे. अध्ययन-अध्यापनाच कार्य ठप्प झाल आहे. महाराष्ट्रात जून मध्ये नविन शैक्षणिक सत्राला सूरूवात तर झाली आहे मात्र शिक्षणाची मंदिरे बंदच आहेत. मग यावर पर्याय शोधण्यासाठी शिक्षण तज्ञांमध्ये विचारमंथन सुरू आहे. यावर एकच पर्याय सूचविला जात आहे तो म्हणजे ऑनलाईन शिक्षणाचा. आज विदयापिठ,शाळा,महाविदयालयांमार्फत झूम,गूगल मीट,वेबऐक्स,माईक्रोसॉफ्ट टीम सारख्या प्लॅटफॉर्मचा उपयोग विदयार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी केला जात आहे. मात्र सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, हा उपाय खरंच सर्वसमावेशक आहे का? यावर विचार मंथन करणारा हा लेख. एका अनुमानानुसार भारतात जवळपास २५ कोटी शालेय विदयार्थी आहेत.तर महाविदयालयात आणि उच्च शिक्षण घेणा-या विदयार्थ्यांची संख्या जवळपास ७ ते ८ कोटी आहे. एकूण मिळुन ३२ ते ३३ कोटी विदयार्थी आहेत. ही संख्या अमेरिकेच्या लोकसंख्येच्या बरोबर आहे. कोरोनाने या ३३ कोटी विदयार्थ्यांच्या भविष्यावर खूप  वा...

हरवलेली मानवता

नु कत्याच जगात घडलेल्या दोन घटनांनी सर्वांना विचलित केले असून मानवाच्या मानवतेवर यामुळे प्रश्नचिन्ह उभा टाकले आहे. पहिली घटना ही अमेरिकेतील आहे. एका कृष्णवर्णीयाची एका गो-या पोलीस अधिका-याकडुन गळा दाबुन हत्या केली गेली. ईथे काळ्या-गो-याच्या भेदाने मानवतेला तिलांजली दिली. दूसरी घटना ही भारताच्या दक्षिणेकडील राज्य केरळमध्ये गर्भवती हत्तीनीची फटाक्यांनी भरलेले अननस खावू घालुन झालेली हत्या आहे. एका घटनेत मानवाने मानवाची हत्या केली तर दुस-या घटनेत मानवाने मुक्याप्राण्याची.या दोन्ही घटनांनी मात्र मानवतेला काळीमा फासला आहे. अमेरिकेत वर्णभेदातुन झालेल्या या हत्येमुळे सगळीकडे संतापाची लाट उसळली. मानवतेला वाचवण्यासाठी लोक काळ्या-गो-यातील भेद विसरून रस्त्यावर उतरले. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांना बंकरमध्ये लपवावे लागले. मात्र स्फोटकांनी भरलेली अननस खाल्ल्याने झालेल्या स्फोटामुळे हत्तीनीला झालेल्या वेदना कुणाच्या लक्षात येतील? भारतात सोशलमीडिया आणि प्राणी अधिकारवादी यांच्यात हा चर्चेचा मुद्दा बनला आहे. एकीकडे आपण जागतीक पर्यावरण दिवसाच्या निमीत्ताने पर्यावरण वाचवण्याचा दिखावा करत होत...

कोरोना: आव्हान दुहेरी आणि संधी मात्र कमी

को रोनाच्या महामारीपासून बचावासाठी केलेले लॉकडाऊन संपल्यानंतर देशात सर्वात गंभीर आर्थिक संकट येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जीडीपी शून्याच्या खाली जाईल अशी भीती आहे.बेरोजगारीचा विस्फोट होण्याची शक्यता आहे. यादरम्यान मोदी सरकारने २० लाख कोटींच्या मदतीचे पॅकेज घोषित केले. यानंतर अनेक जाणकार आणि विरोधी पक्षांनी यावर टिका केली. त्यांच अस म्हणन होत की,या पॅकेजमुळे प्रभावितांना तात्काळ दिलासा मिळणार नाही. ही रक्कम सरळ-सरळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाली पाहिजे. मोदी सरकारने मात्र अस न करता दुसरा मार्ग निवडला आहे. देशात लॉकडाऊन घोषित केल्यानंतर केंद्र सरकारने सुरवातीला सरळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात काही रक्कम जमा केली. हे मोठे पॅकेज जाहिर करताना मात्र मोदींनी आपल्या अनुभवाचा अतिशय प्रभावीपणे उपयोग या संकटातुन बाहेर निघण्यासाठी केल्याच त्यांच्या निकटवर्तीयांच म्हणन आहे. ही दिर्घकाळ चालणारी लढाई असुन दूरदृष्टी ठेवून आखलेल्या या पॅकेजमुळे देश पुन्हा नविन भरारी घेईल अस त्यांचे निकटवर्तीय मानतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी घेतलेल्या काही बैठकांमध्ये...

कोरोना योद्धयांवरिल हल्ले चिंताजनक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला केलेल्या आव्हानानुसार देशातील जनतेने २२ मार्चला स्वयंफुर्तपणे कडकडीत जनता कर्फ्यू पाळला होता.याच दिवशी सायंकाळचे पाच वाजताच अगदी छोटया-छोटया वस्त्यांपासून मोठया शहरांपर्यंत देशात एक अद्भुत दृश्य पहायला मिळाले होते.संपूर्ण देश टाळया-थाळ्या आणि शंखांमधुन निघणा-या स्वरांनी निनादुन गेला होता.हे संगीत होत की,गोंगाट हे सांगण अवघड आहे मात्र यातुन देशाची अखंडता दिसुन आली.याच दिवसापासून देशात जागतीक महामारी कोविड-१९ विरूद्ध युद्ध छेडले गेले जे आजपर्यंतही सुरूच आहे.कोविड-१९ विरूद्धच्या या युद्धात पहिल्या पंक्तीत उभ्या असणा-या कोरोना वारियर्ससाठी हा शंखनाद त्या टिळया सारखा होता जो पत्नी,माता आणि बहिण युद्धावर जाणा-या वीर सैनिकाच्या मस्तकावर लावून निरोप देतात.फरक मात्र एवढा होता की,हे योद्धे केवळ शस्त्रहीन नव्हते तर कवचहीन सुद्धा होते.देशाला कोरोना विरूद्धच्या लढाईत जिंकुन दयायचच या आवेशात केवळ जनतेच्या प्रेरणेच पाठबळ घेवून हे खंदे सैनिक लढाईवर निघाले.  मात्र ही विडंबना आहे की,या टाळ्यांचा स्वर लुप्त झालाच नव्हता की आरोग्य कर्मचारी आणि पोलीस यांच्याबरोब...