मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे महिन्यात सूर्य आग ओकणार, अशी घ्या काळजी

ब्लूमबर्गच्या २०२२ च्या अहवालानुसार आशियातील देशांना यावर्षी विक्रमी उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागणार आहे. जागतिक पातळीवरील गव्हाच्या पुरवठ्यावर उष्णतेच्या लाटांचा परिणाम झाला आहे.   थायलंड आणि बांगला देशातील तापमानातही सातत्याने वाढ होत आहे. चीनच्या युनान प्रांतात तर उष्णतेमुळे दुष्काळ पडला आहे.   देशातील विविध भागांत सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट नोंदवली जात आहे. दरम्यान , मे महिन्यात देशातील अनेक भागात तीव्र उष्णतेची शक्यता आहे.   राज्यात मे महिन्यात कमाल तापमान अधिक राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात काही प्रमाणात उन्हाची झळ कमी बसणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.   हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार , मे महिन्यात कोकणात सरासरीपेक्षा कमाल तापमान अधिक राहणार आहे. विदर्भातील काही ठिकाणी देखील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. विदर्भात एक-दोन जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज असून महिन्यातील दोन दिवस सर्वाधिक उष्ण राहण्याचा अंदाज आहे.      ...

एटीएम पासून ते जीएसटी पर्यंत, १ मे पासून होतील हे ४ मोठे बदल

  एप्रिल महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे. सोमवारपासून नवीन महिन्याची सुरुवात होत आहे. १ मे पासून अनेक क्षेत्रात   बदल   दिसून येतील. त्याचा परिणाम तुमच्या खिशावर पडेल. गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल होऊ शकतो. वस्तू आणि सेवा करांपासून   ते म्युच्युअल फंडासंबंधीच्या नियमात बदलाचे वारे आहे. १ मे रोजी तुमच्या मोबाईलवरील कॉल आणि एसएमएस संबंधी सर्वात फायदेशीर बदल होत आहे. त्यामुळे तुमची नकोशा कॉल्सपासून सूटका होणार आहे. आता कॉल आणि फसवणुकीच्या एसएमएसच्या जाळ्यात कोणी अडकणार नाही.                      जीएसटी नियमांत बदल १ मे पासून व्यापारांना , व्यावसायिकांना जीएसटीमध्ये मोठा बदलाची पूर्तता करावी लागणार आहे. आता १०० कोटी रुपयांहून अधिकची उलाढाल असणाऱ्या कंपन्यांसाठी हा नियम आहे. त्यानुसार , या कंपन्यांनी व्यवहाराची पावती सात दिवसांत इनवॉयस रजिस्ट्रेशन पोर्टलवर   अपलोड करणे आवश्यक आहे. हा नियम अनिवार्य करण्यात आला आहे. अजून यासाठी कालावधी निश्चित करण्यात आला नाही. एटीएम बाबत मोठा बदल देशातील सर्वात मोठी सरकारी बँकेत...

आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची संधी

भा रतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण ने १० वर्षांपेक्षा अधिक जुन्या आधार कार्ड धारकांना त्यांची माहिती अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. तसेच ५ आणि १५ वर्षांनंतर सुद्धा आधार कार्डमध्ये बदल करणे गरजेचे आहे. आधार केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण केल्यास तुम्हाला कमीत कमी ५० रुपये शुल्क द्यावे लागते. आधार कार्डमध्ये चुकीची माहिती असेल , नावात , पत्त्यात , लिंगात चूक झाली असेल तर ती आता तुम्हाला सहज दुरुस्त करता येईल. केंद्र सरकारने   आधार कार्ड अपडेट   करण्याची मोफत संधी दिली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण   नागरिकांकडून ही माहिती अद्ययावत करण्यासाठी कोणतेच शुल्क आकारणार नाही. आता ऑनलाईन आधार कार्ड अपडेटसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही. १४ जून २०२३ पर्यंत ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.   घरबसल्या करा बदल UIDAI च्या डिजिटल इंडिया इनिशिएटिव्ह अंतर्गत myAadhaar पोर्टलवर https://myaadhaar.uidai.gov.in तुम्हाला मोफत आधारकार्ड अपडेट करता येईल. कागदपत्रे अपलोड करता येईल. पोर्टलवर ओळखीचा पुरावा आणि रहिवासाचा पुरावा टाकून आधार कार्ड दुरुस्त करता येईल. या गोष्...

पावसामुळे आता रद्द होणार नाही क्रिकेट सामना

पावसामुळे अनेक   क्रिकेट सामन्यांमधील षटकं कमी केली जातात.   तर काही वेळा   अनेक   क्रिकेट   सामने रद्द होतात. अशावेळी   दोन्ही संघांना प्रत्येकी १ पॉइंट वाटून दिल्याने पॉइंट्सटेबलचं गणितही बिघडतं. पावसामुळे सर्व समीकरणं बदलतात. यामुळे उत्साहाने स्टेडियममध्ये सामना पाहायला आलेल्या क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड  सुद्धा होतो. मात्र आता असं काहीच होणार नाहीये.   यासाठी एक तंत्रज्ञान विकसित   झालयं. या तंत्रज्ञाना चा वापर केल्यास आता सामना रद्द होणार नाही. यामुळे कितीही पाऊस पडला तरी नो टेन्शन. ही पद्धत नक्की काय आहे , आणि पावसानंतरही सामना कसा खेळवण्यात येणार , हे आपण जाणून घेऊयात.                                                      पाऊस पडल्याने आऊटफिल्डवर परिणाम होतो. याआधी स्टेडियमच...

अंगावर शहारे आणणारा चित्रपट 'द केरळा स्टोरी'

ए क चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. 'द केरळा स्टोरी' असं या चित्रपटाचं नावं आहे. ' द केरळा स्टोरी’ या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे . या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. ' द केरळा स्टोरी ' हा चित्रपट केरळ राज्यातील अतिशय गंभीर विषयावर बेतला आहे. केरळ राज्यातून तरुण मुली , महिला बेपत्ता होण्याच्या घटना आजही घडतच आहेत. केरळ राज्यातून बेपत्ता झालेल्या ३२ , ००० मुली आणि महिलांचं नेमकं काय झालं , त्या कुठं गेल्या यामागचं सत्य या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे.   ५ मे रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार , २००९ मध्ये केरळ आणि मँगलोरमधून सुमारे ३२ हजार हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचं अपहरण करण्यात आलं होतं. या मुली लव्ह जिहाद’ला बळी पडल्या. त्यांना बळजबरीने इस्लाम धर्म स्वीकारायला लावलं होतं. त्यांच्यापैकी बहुतांश मुलींना नंतर सीरिया , अफगाणिस्तान आणि इतर भागात पाठवलं गेलंय. या मुली पुन्हा घरी परतल्याच नाहीत , असं सांगण्यात येतं. केरळमध्ये मुलींची कशी फसवणूक केली जाते , कसं त्यांचं ब्रेनवॉश केलं जातं. हिजाब घ...

चंद्रावर संसार थाटण्यासाठी चीनची लगीनघाई

कवींच्या कल्पना विश्वास आणि मुलांच्या परीकथांमध्ये चंद्राला विशेष स्थान आहे. चंद्रावर राहण्याचे मानवाचे स्वप्न लवकरच पूर्ण आहे. कारण येत्या पाच वर्षात चीन चंद्रावर घर बांधणार आहे. विशेष म्हणजे यासाठी चंद्रावरची माती वापरुन विटा बनवल्या जाणार आहेत. चंद्रावर सातत्याने संशोधन सुरु आहे. यामुळे दीर्घकालीन चंद्र संशोधनासाठी येथे लूनर बेस उभारणे गरजेचे आहे. चंद्रावर लूनर बेस बनवण्याची चीनची योजना आहे. चंद्राच्या मातीपासून विटा बनवण्यासाठी एक टीम 'चायनीज सुपर मेसन्स' नावाचा रोबोट तयार करत आहे. चंद्रावर पाणी नाही. तसेत येथे गुरुत्वाकर्षण देखील काम करत नाही. चंद्रावर वारंवार भूकंप आणि भयंकर वैश्विक किरणोत्सर्ग होत असतात. अशा परिस्थितीत चंद्रावर लूनर बेस विकसीत करताना संशोधकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. चीन अशा विशिष्ट मोहिमेवर काम करत आहे, जी यशस्वी ठरल्यास हा देश अंतराळ संशोधनात अग्रस्थानी असेल. येत्या दशकात चीनची अंतराळ संशोधनातील कामगिरी अत्यंत महत्त्वपूर्ण असेल.  चंद्रावरील मानवी तळ कसा असेल याची कल्पना कितीही केली असली तरी वस्तुस्थिती मात्र अगदी पायाभूत आहे. चंद्रापर्यं...

दरडोई उत्पन्नातील वाढी सोबत आर्थिक विषमता दूर करायला हवी

भारत जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. येत्या काही वर्षात जगातील तिस-या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून स्थान मिळवण्याचे स्वप्न आपण पाहत आहोत. मात्र, त्याच वेळी देशातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देणारी आकडेवारी समोर आली आहे. जगातील १९७ देशांमध्ये दरडोई उत्पन्नाच्या यादीत भारत १४२ व्या स्थानांवर आहे. धक्कादायक बाब म्हणजे जगातील आणि आफ्रिकेतील गरीब देशांच्या तुलनेतही भारताचे दरडोई उत्पन्न कमी आहे. अंगोला, वानुआतु आणि साओ टोम प्रिन्सिप या छोट्या देशांचे दरडोई उत्पन्नही भारतापेक्षा जास्त आहे. अंगोलाचे दरडोई उत्पन्न ३२०५ डॉलर, वानुआतुचे ३१८८ डॉलर, साओ टोम प्रिन्सिपचे २६९६ डॉलर आणि आयव्हरी कोस्टचे २६४६ डॉलर आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली. जगातील मोठी अर्थव्यवस्था समजल्या जाणा-या देशांत भारताचे दरडोई उत्पन्न अतिशय कमी आहे. अमेरिकेसोबत तुलना करता एका भारतीयाचे दरडोई उत्पन्न हे अमेरिकन नागरिकांपेक्षा ३१ पटीने कमी आहे. अमेरिकेत दरडोई वार्षिक उत्पन्न ८०,०३५ डॉलर इतके आहे तर भारतीयाचे दरडोई वार्षिक उत्पन्न २६०१ डॉलर इतके ...